Author: Team Avaantar

डॉ. किशोर महाबळ माहिती संकलन हा ज्ञानप्राप्तीमधील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन उत्तम होण्यासाठी त्या विषयाबद्दल माहिती मिळविणे अतिशय गरजेचे असते. याच माहितीचे नंतर वर्गीकरण, विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. याच असंख्य निष्कर्षांमधून त्या विषयाचा विकास होत जातो. माहिती जेवढी अचूक तेवढी ती उपयुक्त ठरते. म्हणून, अचूक माहिती गोळा करणे अत्यावश्यक ठरते. माहिती कशी गोळा करायची, ती कशी नोंदवायची, याचे शास्त्र विकसित झाले आहे. माहिती संकलन शास्त्राचे काही प्राथमिक धडे शालेय स्तरावरच सर्व विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. कोणत्याही विषयाची अचूक माहिती ही त्या विषयाचे विविध भाग-उपविभाग समजून घेण्यास उपयुक्त ठरते. माहिती जितकी जास्त मिळेल आणि अचूकतेने नोंदविली…

Read More

अध्याय आठवा जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अळंकार होती ॥173॥ इयें दोन्ही जैसीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूंचां ठायी ॥174॥ तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥175॥ जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥176॥ पाहें पां तरंग होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥177॥ नातरी आटतियें अळंकारी । नाटतें कनक असे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तणावपूर्ण असेल. मात्र संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखाल. कोणाच्याही सल्ल्याने फसून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. योग्य कामांवर तुमची ऊर्जा केंद्रित करा, ती वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करा. प्रलंबित आर्थिक बाबी पूर्ण होण्याची शक्यता आहे. वृषभ – नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायातही चांगला नफा मिळेल. जुने कौटुंबिक वाद मिटतील असे दिसते. मुलांना दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. वडिलांना बाहेर सहलीला घेऊन जाऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खटला तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे. मिथुन -…

Read More

यश:श्री हत्ती या प्राण्याबद्दलचे कुतूहल कायमच अबालवृद्धांना असते. त्यामुळेच सर्कस असो वा (हत्ती असलेला) चित्रपट सर्वांचे लक्ष हत्तीवरच असते आणि चर्चाही हत्तीचीच होते. दिसायला जरी अजस्त्र असला तरी, त्याला माणसाळवले जातं. जंगली हत्ती माणसाळवता येतो आणि त्याला पाळीव बनविण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. त्यांना माणसाळवताना हुशार आणि तज्ज्ञ माहुतांना बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. हत्तीला जिथे बांधून ठेवले जाते, ती जागा तसेच दोरखंड पाहून त्याला अतिव…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी, खुसखुशीत कटलेट अन् पडवळाची कोशिंबीर करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय आठवा शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥162॥ तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥163॥ पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥164॥ हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥165॥ कैसें थोरिवेचें मान पाहें पां । तो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥166॥ एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वसंत पंचमी / श्री पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. चांगला परतावा मिळविण्यासाठी पैसे हुशारीने गुंतवा. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करीअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. कलात्मक बुद्धिमत्तेचा नीट वापर केल्यास फायदेशीर ठरेल.​​ आरोग्याच्या काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. वृषभ – वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्हीकडे आज यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. परदेशातील व्यापाराने जोडलेल्यांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल. मिथुन – आज कोणतेही अडथळे तुमची प्रगती रोखू शकणार नाहीत. व्यावसायिक आव्हानांचा तुमच्यावर परिणाम होणार…

Read More

डॉ. विवेक वैद्य संध्याकाळ संपत आलेली… तो तिची वाट पाहत तयार होऊन बसलाय… ती येते घाईघाईत… त्याच्याकडे ‘सॉरी’ या अर्थाने बघते… म्हणते, “शॉवर घेऊन येते.” तो मान डोलावतो. ती तयार होऊन येते. “आज जरा साधीच साडी नेसली, मऊ स्पर्शाची, भरजरी नको आणि मोजकेच दागिने घातले… खूप गरम होतय ना म्हणून!” “Relax. मी कुठे काही म्हटलंय? कदाचित, दिवसभर खूप काम केल्याने होत असेल गरम…” त्याचा स्वर समजदारीचा! “हो रे. आज अजिबात फुरसत नव्हती… करू तयारी?” “मी करून ठेवलीय तयारी… नेहमीप्रमाणे!” तो मिश्किलपणे म्हणतो. ती लाडीक कटाक्ष टाकते. “बरं मॅडम, आज दिवसभरात तुमच्याशी बोलणे नाही झाले, तुम्ही बिझी असल्याने… पाडव्याचे काय गिफ्ट…

Read More

मयुरेश गोखले आपल्या नवऱ्याचं किंवा प्रियकाराचं आपल्याकडे लक्षच नसतं, असं म्हणणाऱ्या सर्व महिलांना आणि लक्ष नसलेल्या पुरुषांना समर्पित… ती नेहमी म्हणते, तुझं माझ्याकडे लक्षच नसतं… आणि ते बरोबरच आहे. माझं खरंच लक्ष नसतं तिच्याकडे! अगदी सुरुवातीपासून म्हणजे ती मला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हापासून कधीच लक्ष नव्हतं माझं तिच्याकडे… पहिल्या भेटीत खूप बोलली, पण माझं लक्षच नव्हतं! कारण, ती बोलत असताना तिच्या हलणाऱ्या कानातल्याकडे बघत बसलो मी… एकदा एका तलावाच्या काठी मावळतीचा सूर्य आमच्याकडे पाहात होता आणि ती पण सूर्याकडे बघत काहीतरी बोलत होती… माझं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे! कारण, तिच्या डोळ्यांत दिसणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब इतकं बोलकं होतं की, त्या डोळ्यांत…

Read More

माधवी जोशी माहुलकर गरमागरम वाफाळलेले ऑयस्टर मोमोज, सोबत टोमॅटोची तीळ आणि लसूण घातलेली चटणी ही डिश माझ्या मुलीने आमच्या समोर ठेवली, तेव्हा मला खरंच तिला शाबासकी द्यावी लागली. इतके सुंदर टेस्टी व्हेज-मोमोज तिने स्वतःची पद्धत आणि प्रमाण वापरून तयार केले म्हणून तिचे कौतुक करणे आवश्यक होते. तिची स्वतःची ही ऑयस्टर मोमोजची रेसीपी मी खाली दिलीच आहे आणि सोबत मोमोज बद्दलची थोडी माहिती सुद्धा! मोमोज ही भारताची डिश नाही. ती तिबेटची डिश आहे. नेपाळवरून आलेल्या या डिशने भारतातील स्ट्रीट फूडमध्ये आपली जागा तयार केली. असं म्हणतात की, तिबेटच्याही आधी मोमोज चीनमध्ये बनवले जायचे. मात्र, हे बनविण्याची पद्धत वेगळी होती. मोमोजचा खरा…

Read More