Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अर्चना कुलकर्णी ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. खूप पाऊस पडत होता… दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती.. मी माझ्या कार्यालयात दुपारचा चहा घेत घेत, टेबलावरची पत्रे पाहत होते. त्याच वेळी टेलिफोन खणखणला. रिसिव्हर उचलून मी बोलू लागले, “हॅलो…!” “नमस्कार मॅडम…! मी, भाटे. समीर भाटेचा डॅडी बोलतोय. मॅडम, अकरावीचे क्लासेस सुटले का?” “हो, केव्हाच सुटले. का हो, काय झालं?” “समीर अजून आला नाही घरी म्हणून…!” “मित्राकडे गेला असेल. येईल लवकरच. काळजी नका करू. तो घरी आल्यावर मला कळवा मात्र.” मिस्टर भाटेंना धीर देऊन मी रिसिव्हर खाली ठेवला. समीर भाटे…! मी आठवू लागले, आणि आठवले. त्याचे असे झाले, साधारण जुलैचा दुसरा आठवडा होता तो. अकरावीच्या…
चंद्रशेखर माधव सुमारे 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी एमसीएम झालो ना त्या वेळची. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, प्रभात रोडला. तिथे माझा एका मित्र फॅकल्टी म्हणून नोकरीला होता. त्याच सुमारास मी पास-आऊट झालेलो असल्यामुळे आणि एकूणच सी लँग्वेज तसेच फॉक्स प्रोमध्ये माझं प्रभुत्व असल्यामुळे, मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवण्यात आलं. हळूहळू मी तिथं रुळलो. तिथे नितीन नावाचा एक मॅनेजर होता. तोच ती इन्स्टिट्यूट पूर्णपणे सांभाळायचा. सांगताना मात्र इन्स्टिट्यूट माझी आहे, असं सांगायचा. इन्स्टिट्यूटचे तीन डायरेक्टर होते. त्यातले दोन अमेरिकेला असायचे, एक डायरेक्टर होता पुण्यातच! पण तो मनुष्य कधी फारसं लक्ष घालायचा नाही, म्हणजे अक्षरशः महिना-महिना इन्स्टिट्यूटमध्ये यायचा सुद्धा नाही.…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) आजपर्यंतच्या आयुष्यात वाचनातून आणि वर्तनातून एक बाब माझ्या लक्षात आली आहे की, कोणताही देश, संस्कृती, धर्म असले तरी, नैतिक वर्तनाची मूल्ये समानच असतात. जरी नावे, विवेचन पद्धती भिन्न असली तरी शिकवण एकच असते. जपानमधील ‘यामाबुशी’ पंथातील बौद्ध भिक्षूंच्या प्रशिक्षणात शीर्षकातले दोन शब्द महत्त्वाचे मानतात. ‘उकितामो’ म्हणजे शुद्ध मराठीत ‘मी खुल्या मनानी स्वीकार करतो’… जेव्हा आव्हानात्मक अडचण येते तेव्हा जर ती तुम्हाला दूर करता येत असेल तर करा, अन्यथा म्हणा उकितामो. जसे इंग्लिशमध्ये ‘When stuck up in a situation, change it and if you can’t, face it fearlessly’. मी अपघातात जखमी झालो, मेंदूत…
मित्रमैत्रिणींनो, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! खरंतर, आपण कोणाला भेटलो, फोनवर बोलणं झालं की, निरोप घेताना किंवा देताना एक मॅनर्स म्हणून ‘टेक केअर’ (Take Care) म्हणायची पद्धत रूढ झालीय. काही मनापासून म्हणणारे आहेत, तर काही सवयीने म्हणणारे आहेत. माहीत नाही, पण कधी-कधी कोणाचं टेक केअर ऐकलं की मनापासून बरं वाटतं. कदाचित, ते कोणीतरी म्हणावं, अशी अपेक्षा काही कारणाने आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. आता एखाद्या आजारी व्यक्तीला आपण भेटायला गेलो आणि त्या व्यक्तीला Take care म्हटलं म्हणून तो स्वत:ची काळजी घेणार का? तर नाही. हे दोन जादुई शब्द (magic words) आहेत, समोरच्या व्यक्तीला मानसिक उभारी देण्यासाठी! एखादी व्यक्ती अशीही असू शकते, जी म्हणेल,…
प्रमोद मनोहर जोशी पुराणकाळापासून ते आज तागायत स्त्रीला नटण्याचं आणि आरशात आपली प्रतिमा न्याहाळण्याचं वेड आहे .आज माझी याच विषयावरची कविता आहे. सजून धजून बघते मी गं आरशात प्रतिमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा II धृ II श्रावणसरीच्या शतधारांनी सचैल मुक्त नाहले ऊन हळदीचे उटणे म्हणूनी सर्वांगी लाविले उजळून आले जसा घनतमी बहरून ये चंद्रमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा II1II नितळ मुलायम मुखकमलावरी लेप चंदनी दिला सौभाग्याचे लेणे भाळी सिंदूर तो लाविला आणि कपाळी हळूच लाविली चंद्रकोर कुंकुमा बिंब पाहूनी प्रतिबिंबित ते खुलला मुखचंद्रमा। II2II तलम रेशमी कचपाशाची वेणी तिपेडी रुळे हळूच त्यावरी हसूनी बघती निशिगंधाची फुले…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी जोडीदाराला, भागीदाराला अथवा प्रतिस्पर्धी असल्यास त्याला योग्य तो मान द्या. हाताखालच्या माणसांना सांभाळा. छान, सुंदर रुचकर पदार्थ खायचा योग आहे, खाऊन तृप्त व्हा. लहान मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा. वृषभ रास सट्टा बाजार, शेअर मार्केट यांच्याकडे मन आकर्षित होत असले तरी, संयम बाळगा. कर्मचारी असल्यास कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. स्त्रियांनी तब्येतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. जोडीदाराने याबाबतीत स्त्रीला पूर्ण सहयोग करणे अपेक्षित आहे. मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा थकवणारा असू शकतो, पण कष्टाला मागे राहू नका. विवाहित स्त्रियांची माहेर आणि मुले यात थोडी रस्सीखेच…
मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला. भाग – 2 वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत…
सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा, त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. मागील भागात आपण 25 शक्तिपीठांची माहिती घेतली होती. आता उर्वरित 26 शक्तिपीठे…. हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे 26. उज्जयनी शक्तिपीठ : उज्जैन, क्षिप्रानदी तट, मध्य प्रदेश; उजवी कुशी. शक्ती – हरसिद्धी / मंगला / चंडिका, भैरव – मांगल्य / कपिलाम्बर 27. मणिवेदिका शक्तिपीठ : पुष्कर, राजस्थान;…
यश:श्री भाग 1 कला, साहित्य अशा अनेक माध्यमांमध्ये मोराचे आकर्षण पाहायला मिळते. अगदी प्राचीन काळापासून विविध कलांमध्ये मोराचे महत्त्व अधोरेखित होते. शिल्पकलांमध्येही त्याची झलक दिसते. अनेक प्राचीन मंदिरांमधील कलाकुसरेत मोराचे दर्शन घडते. दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिल्पकलांप्रमाणेच चित्रकलेतही मोर पाहायला मिळतो. डॉ. जगदीश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचीन काळातील मोराच्या चित्रात विविधता आढळते आणि त्याचे स्थान अत्युच्च असे आहे. आदमगडच्या गुहेमध्ये (होशंगाबाद) मोराचे जे अत्यंत विशाल चित्र आहे, त्या चित्रावरून त्याला त्यावेळी असलेल्या विशेष महत्त्वाची…
चंद्रशेखर माधव साधारणपणे मार्च महिन्यात आंब्यांचा सीझन सुरू होतो. आमच्या लहानपणी, सुमारे 1985 ते 1990 या काळात, कॉलनीत एक मध्यमवयीन महिला डोक्यावर जुन्या पद्धतीची वेलींपासून विणून बनवलेली मोठी टोपली घेऊन आंबे विकायला येत असे. नऊवारी साडी, कपाळावर मोठ्ठं गोल कुंकू. कमरेला चंची अडकवलेली असा पारंपरिक वेश केलेल्या मावशींचा आवाज अगदी भारदस्त होता. एक हाक दिली की, शेजार शेजारच्या दोन इमारतींच्या अगदी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत आवाज पोहोचलाच म्हणून समजा. भर दुपारी उन्हाच्या वेळी “आंबे….. हॅप्पुस” अशी हाक आली की आमची आई “आल्या वाटतं…. शेखर, जा बरं, काय भाव आहे विचार,” असं हमखास सांगे. तिने हे वाक्य म्हणताच, मी लगेच बाहेर पळत…
