Author: Team Avaantar

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् । मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥16॥ तोचि जाणिवेचा उदयो जरी होये । तरी मुदल वेदु मीचि आहें । आणि तो विधानातें जया विये । तो ऋतुही मीचि ॥265॥ मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटें पांडवा । तोही मी गा ॥266॥ स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥ होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें । आणिक हुतक जें जें । तेही मीचि ॥268॥ पिताSहमस्य जगतो माता धाता पितामह: । वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्सामयजुरेव च ॥17॥ पैं जयाचेनि अंगेसंगें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे टीम अवांतर ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला. एम.ए., पीएचडी, मास्टर ऑफ ड्रामॅटिक्स अशा पदव्या संपादन केलेल्या डॉ. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 23 नाट्य महोत्सवांचे आयोजन केले होते. 200 पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या याचे शिक्षण दिले. सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर रेशीमगाठी आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पैंजण अशा दोन चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या. ‘प्रतिकार’ हे त्यांचे एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले.…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 3 माझ्या आई-वडिलांना मामा-मामींना आता माझ्या लग्नाची घाई झाली होती. मला लग्नाचा फारसा उत्साह नव्हता. विजयावर मनापासून प्रेम केले होते. त्यामुळे तिची जागा दुसऱ्या कोणाला तरी, देण्याची तयारी नव्हती. परंतु मामा-मामी, आई यांची धडपड सुरू होती. पुण्यात सुद्धा अनेक डॉक्टर्स मला जावई करण्यासाठी धडपडत होते. शेवटी पुण्याचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ देशपांडे यांची मुलगी अनिता हिच्याशी माझे लग्न ठरले. अनिता ही स्त्रीरोग तज्ज्ञ होती. आपल्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होती. डॉक्टरी व्यवसायाबद्दल इतरांपेक्षा वेगळे विचार असलेल्या माझ्यासारख्या डॉक्टरने प्रथितयश डॉक्टरांच्या मुलीशी लग्न करावे की, न करावे, अशा विचारात मी होतो. मी अनिताची भेट घेऊन माझे विचार तिला…

Read More

कामिनी व्यवहारे उडीद हे उत्तम पौष्टिक खाद्य आहे. उडदाची शिजविलेली डाळ मातेला दुग्धवर्धक असते. तिच्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. तिच्यात फॉस्फोरिक आम्लही असते. उडदाचे पीठ डोसा, इडली, वडा आणि पापड बनविण्यासाठी वापरतात. अशा पदार्थांमध्ये पांढरे उडीद (साल काढलेले) वापरतात. पंजाबात तुरीच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ जास्त प्रमाणात खातात. पंजाबी अन्नपदार्थांत तिचा जास्त वापर होतो. साल असलेल्या उडीद डाळीची आमटी देखील खूपच स्वादिष्ट असते. साहित्य हेही वाचा – Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का? कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप…

Read More

डॉ. विवेक वैद्य ये हुकुमत, ये दौलत, ये शोहरत, हमेशा नहीं रहते… ये घर बदलते रहते हैं… आणि हे सर्व गमावल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्वभावात नक्कीच फरक पडतो. पण हे कायम असूनही काही व्यक्ती बदलतात, त्याचे कारण वय असावे का? की आणखी काही? कारण अलीकडेच घडलेले दोन प्रसंग… मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो, तेव्हा आम्हाला एक प्राध्यापक होते. खूप रागीट. वर्गात त्यांना थोडीही कुजबूज सहन व्हायची नाही. विद्यार्थ्यांना वाटेल ते बोलायचे. अगदी गाढव पण म्हणायचे. त्यामुळे साहजिकच ते विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय होते. पण तो काळ शिक्षकांना उलटून बोलण्याचा नव्हता. मुले पाठीमागून तक्रारी करायचे, पण सरांसमोर निमूट बसायचे. शिक्षण संपल. गावी परत आलो. सर…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥ ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥254॥ पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥ कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले । आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥ तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥257॥ अगा हे जेव्हडी…

Read More

दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात नफा होईल. कीर्ति, मान आणि सन्मानात वाढ होईल. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल, परंतु कुटुंबातील काही सदस्यांचे वर्तन निराशाजनक असेल. आज आहाराची काळजी घ्या अन्यथा पचन बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटेल. जोडीदाराचे आरोग्य हे देखील चिंतेचे एक कारण बनेल. वृषभ – तुमच्या योग्य निर्णयामुळे व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. योजनेनुसार काम केल्याने यश मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. काळजीपूर्वक वाहन चालवा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल.…

Read More

प्रणाली वैद्य भाग – 13 निशा पुन्हा म्हणाली… “कोणी विचारलं की म्हणायचं, माझे क्लास आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, मी जाऊ शकत नाही. आणि हो… त्या आराध्यासारखा गोंधळ घालायचा नाही. तिनं किती गुण मिळवलेत ते कौतुकाचं नाही…” “तिचं मार्क मिळवणं तेवढंच सगळ्यांना दिसतंय. पण काही दिवस थांब… तू काय आहेस, हे सगळ्यांना दाखवून दे!” अन्वी शांत होती, पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. तिच्या मनात एक कट तयार होत होता… आराध्या जणू तिच्या आयुष्यावर सावलीसारखी पसरलीय, आणि आता ती सावली पुसून टाकण्याची वेळ आली होती… त्या रात्री, खोलीच्या चार भिंतींमध्ये एक बिघडलेली विचारधारा खोलवर रूजत होती… आणि भविष्यात एक वादळ नक्कीच…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे असे म्हणतात की, तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते… एका गावात एक छोटे कुटुंब रहात होते. नवरा, बायको आणि त्यांच्या सुमन आणि मीनल या दोन मुली. दोन्ही मुली शाळेत जात होत्या. मुली खूप हुशार असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत त्यांना यश हमखास मिळत होते. वडिलांना खूप पगार नव्हता, पण आईने कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. एकेदिवशी शाळा तपासणीसाठी काही अधिकारी शाळेत आले. अधिकारी प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाबरोबर बोलत होते, प्रश्न विचारत होते. गावातील काही बड्या लोकांची मुलं पण या शाळेत शिकत असल्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर असलेले इतर कर्मचारी त्या मुलांची आवर्जून ओळख करून देत होते. ही…

Read More

माधवी जोशी माहुलकर कोणाच्या रंगरुपावर जाऊ नये, कारण ते काही कोणाच्या हातात नसतं! व्यक्तीमधले गुणविशेष पाहावे, चांगले गुण असतील तर ते निश्चितच दखलपात्र ठरतात. माझ्याकरिता माझ्या घरकाम करणाऱ्या बायका महत्त्वाच्या व्यक्ती आहेत! गेल्या 14 वर्षांपासून माझ्या घरी एक बाई कामाला आहे, त्यामुळे ती आता आमच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे! खरंतर, पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या घरी कामाला आली, तेव्हा तिला महिन्यावारी घरकामाला बोलावण्याचे माझे काही निश्चित नव्हते. तिला मी केवळ डस्टिंगकरिता बोलावले होते. डस्टिंग करायचे काम म्हणजे काय असतं, हे देखील तिला माहीत नव्हतं! उलट तिला ते काम शिकवताना माझीच अवस्था “आ बैल (नव्हे गाय) मुझे मार…” अशी झाली होती. परंतु…

Read More