Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी दर्श अमावस्या कंकणाकृती सूर्यग्रहण (भारतात दिसणार नाही) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकेल. प्रवास शक्य आहे. आरोग्य चांगले राहील. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शांत आणि स्थिर मनाने पुढे जा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. वृषभ – आज आर्थिक समृद्धी अनुभवण्याचा दिवस आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत तयार होतील. कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या सल्ल्याने नफ्याचे नवे मार्गही खुले होऊ शकतात. शैक्षणिक उपक्रम यशस्वी होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आपण कधी कधी खूप महत्त्वाचं काहीतरी करत असतो आणि त्यात काही ना काही कॉमेडी घडून जाते. नकळतपणे घडणाऱ्या अशा घटनांवर रडावं की हसावं, हेच कळत नाही. असाच एक किस्सा आहे. मी एक ऐतिहासिक सिनेमा करत होते. महाराज आणि दिवस गेलेली महाराणी यांना त्यांचं राज्य वाचवण्याकरिता विभक्त व्हावं लागतंय. राजाचा जीव राणी आणि होणाऱ्या बाळात गुंतलाय. राणी नवऱ्यापासून किती काळ दूर रहावं लागेल म्हणून कष्टी… हा खूप मोठा, अतिशय महत्त्वाचा सीन होता. त्या सीनमध्ये कलाकार मंडळी पण भरपूर होती. टेक्निकली कठीण होता सीन… अतिशय भावनिक, गंभीर अशा या सीनमधील राणीची वाक्य संपत…
सतीश बर्वे मला घेऊन गाडी निघाली पुण्याला आणि मी मागच्या सीटवर बसून जुने दिवस आठवत राहिलो… कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ते दोघे मला पहिल्यांदा भेटले होते. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत ते दोघे शिकत होते. ते नुसतेच मित्र नव्हते, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सहज समजत होते. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना आठवड्यातून दोन-तीन दिवस तरी आईस्क्रीम खायला येत असत. काही दिवसांतच त्या दोघांची आणि माझी ओळख झाली… आणि पुढे पुढे ती कधी इतकी वाढली ते आमचं आम्हालाच कळलं नाही. जेवढा जीव त्यांचा एकमेकांवर होता, तेवढीच लुटुपुटीची भांडणं देखील व्हायची त्यांच्यात आणि ती शेवटी सोडविण्यासाठी माझ्याकडे यायचे दोघे. बघता बघता ते पदवीधर…
पराग गोडबोले तो सत्तावीस वर्षांचा झाला आणि घरचे मागे लागले लग्नासाठी. खरोखर काहीच हरकत नव्हती बोहल्यावर चढायला आता. घरच्यांच्या मते, बंधनात अडकण्याचं हेच योग्य वय होतं. उगाचच उशीर करण्यात काहीच हशील नव्हतं. त्यानं कुठं काही जमवलंय का? याची आडून आडून चाचपणी सुरू होती, पण तसं काही नाही, यावर तो ठाम होता. त्याच्या मते अजून दोन वर्ष थांबायला हवं होतं, पण शेवटी आई आणि आजी, दोघी खनपटीला बसल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि तो नाव नोंदवायला तयार झाला. सगळे सोपस्कार करून, पैसे भरून एका नामांकित संस्थेत नाव नोंदवल्यावर पटापट स्थळं यायला लागली. त्याचं शिक्षण, पगार, कुटुंबाची पार्श्वभूमी बघता, यात काही विशेष नव्हतंच…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥13॥ तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा ॥188॥ जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्मु करी राणिवा । जयांचें मन ओलावा । विवेकासी ॥189॥ जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥ जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥ जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे केवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥192॥ जे आघवांचि करणीं । लेइले…
दर्शन कुलकर्णी सोमवती अमावस्या (प्रारंभ सायंकाळ 05:33) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला काही आरोग्यविषयक चिंता जाणवू शकतात. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुमचे विरोधक सक्रिय असतील, त्यामुळे सावध रहा. कौटुंबिक मतभेद वाढू शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल. वृषभ – एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. त्यामुळे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. याशिवाय मोठा धोका पत्करणे टाळा. नोकरीत कामाचा ताण थोडा वाढेल. आज जोडीदाराशी एखाद्या विषयावरून मतभेद होईल किंवा भावाशी, पुतण्याशी वाद होऊ शकतो. डोके शांत ठेवा. वाद मिटविण्याचा प्रयत्न…
संगीता भिडे पाणी म्हणजे जीवन, केवढा सार्थ आहे ना हा शब्द! पाण्याविना जीवन जगणे व्यर्थ आहे. ‘पाणी’ हा शब्द वाचताच डोळ्यासमोर उभं राहिलं ते माझं माहेरचं गाव – भुसावळ. अत्यंत कडक उन्हाळा आणि पाण्याचं दुर्भिक्ष. पोटापाण्याच्या व्यवसायामुळे वडिलांना भुसावळशिवाय पर्याय नव्हता. त्यात आम्ही पाठोपाठची तीन भावंडं. वास्तव्य आमचं एका चाळीत. चाळीच्या मागच्या भागात विहिरीत उन्हाळ्याखेरीज उदंड पाणी असायचं. पण ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था त्या विहिरीच्या पाण्याची. सबब पिण्याच्या पाण्याचा शोध सुरू झाला. फर्लांग- दीड फर्लांग अंतरावर एक गोड्या पाण्याची विहीर आढळली. मग ‘घट डोईवर, घट कमरेवर’ अशा आईच्या पाण्याच्या खेपा दररोज सुरू झाल्या. आम्ही अजाण वयाची…
शोभा भडके भाग – 14 रामने भावना आणि आरूला एका ज्वेलरी शॉपसमोर आणून सोडलं. तेथे अगोदरच जीवन गाडी घेऊन उभा होता. राम त्या दोघींना सोडून परत गेला, कारण त्याला घरी जाऊन बाकीच्या तयारीत पवनला मदत करायची होती. “मॅडम निघायचं? सर आत तुमचा वेट करत आहेत…” आल्यापासून आरू कधी जीवनकडे तर कधी गाडीकडे बघत होती. जीवनला अवघडल्यासारखं झालं होतं आणि भीती पण वाटत होती… लेट झाल्यावर बॉसचा ओरडा खाण्याची! “आरू, अगं चल काय बघतेस?” भावना वैतागून म्हणाली. “आलं लक्षात…” ती कसला तरी विचार करत होती. अचानक तिच्या लक्षात आलं, तशी तिच्या चेहऱ्यावर चमक आली. “अगं, काय लक्षात आलं?” भावना. “ओ दादा,…
माधवी जोशी माहुलकर आज महाशिवरात्र आहे तर बहुतेक सर्वांचे दोन्ही वेळेस उपवास असतात, अशा वेळेस दोन वेळेस फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, भाजणीचे थालिपीठ, भगर इडली, शिंगाड्याची शेव, बटाट्याच्या किसाचा चिवडा, शिंगाड्याच्या पीठाचा शिरा… असे नानाविध पदार्थ तिच्या डोळ्यासमोर फेर धरायला लागतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बटाटा, साबुदाणा, भगरीचे पॅटिस विथ ग्रीन चटणी हा पदार्थ मी तुमच्या समोर आणला आहे. एकदम पोटभर, फारसे तेल न लागणारा, चवीला एकदम मस्त आणि अगदी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे. सकाळी भगर, आमटी, बटाट्याची भाजी, भाजणीचे थालीपीठ असा भरपेट फराळ झाला की, बहुतेक संध्याकाळी…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात सगळी कामे ठरल्याप्रमाणे पार पडतील. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामे होणार नाहीत, वेळ वाया जाईल, म्हणून कोर्टाची कामे पुढे ढकला. व्यावसायिक वर्गाने अनावश्यक ठिकाणी पैसा तसेच वेळ घालवू नये. कामानिमित्त प्रवास कराल. महिला नवीन जबाबदारी स्वतःहून घेतील आणि उत्तम रीतीने पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांचे मित्र-मैत्रिणींबरोबर वैचारिक वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ या आठवड्यात अमावस्या तुम्हाला लाभदायक ठरेल. गुरूचा जप करत रहा. नोकरदारांना धनस्थानातील गुरूच्या प्रभावाने पगारवाढ आणि इतर मार्गांनी पैसा मिळेल. त्यामुळे गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाने जमीन खरेदी-विक्री करताना सावधान राहावे. कागदपत्रे नीट तपासून घ्या. महिलांनी अमावस्येच्या दिवशी,…
