Author: Team Avaantar

दीपक तांबोळी “शुभा, ए शुभा, उठ लवकर… अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?” संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली. “झोपू दे ना आई. रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते!” “माहितेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते! फेसबुक नाहीतर व्हॉटस्ॲप वर चॅटिंग या व्यतिरिक्त करतेस तरी काय तू? चल उठ लवकर. नऊ वाजलेत…” “तू ना बाई अशीच आहे. माहितेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात!” “चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करू. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते.” “ए बाई, नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी… आणि कुणाचीही उदाहरणं नको देत जाऊस. उठते मी.” शुभा धुसफूस करतच उठली.…

Read More

सतीश बर्वे गेल्या महिन्यातली गोष्ट. मी पुण्याला गेलो होतो, आमच्या कुटुंबातील एका मंगलकार्याला उपस्थित राहण्यासाठी. मुहूर्त उशिराचा होता. लग्न लागून जेवणं आटपून आम्ही नुसत्या गप्पा मारत बसलो असताना डोळ्यांवर पेंग यायला लागली म्हणून मी आणि मामेभाऊ त्याच्या स्कूटरवरून कार्यालयापासून दूर पौड रोडला मोरे विद्यालयाच्या जवळच्या एका चहाच्या टपरीवर गेलो होतो. संध्याकाळी साडेपाच-सहाची वेळ होती. तरुणाईची बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या खमंग राजकारणावर चर्चा सुरू होती. इतक्यात एका मुलाच्या तोंडून अजब शब्द ऐकले… “अरे यार, तुमचा काही का पक्ष असेना आमचा सध्या एकच पक्ष आणि तो म्हणजे पोरींवर लक्ष!” ते ऐकून मी दचकून त्या घोळक्याकडे पाहिले. बहुतेक नोकरी धंद्याला नुकतीच…

Read More

रश्मी ठोसर शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेतांमध्ये, बागांमध्ये तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात. आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इत्यादी भाग उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यावर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीवर वापरतात. तर, त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने आणि फुले कृमिनाशक, वायूनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत. शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. आता आपण त्याची गोडी आमटी कशी करतात ते पाहू. हेही वाचा – Recipe : केळफुलाचे…

Read More

मानसी देशपांडे काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डेचा माहोल होता. म्हणजेच, नुकतंच प्रेम झालेले प्रियकर – प्रेयसी, तसंच प्रेमाचं रुपांतर लग्नात झालेले नवरा – बायको… सर्वच कमी-जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात. खोटं का बोला, मी पण साजरा करते! आपल्या आयुष्यात प्रेमाला खूप जास्त महत्त्व आहे आणि असायलाच हवं. एका ठराविक वयानंतर काही गोष्टी या अशा असतात, ज्या आपण आई-वडिलांशी बोलू शकत नाहीत, मग तिथे लागते आपली हक्काची, प्रेमाची व्यक्ती. हे प्रेम कसं होतं? काहींचं एका नजरेत, तर कोणी डोळ्यांच्या प्रेमात पडतं. हे प्रेमाचं गाव फारच सुंदर असतं… जिथे राग असतो, रुसवा असतो, लाडिकपणा असतो तसंच शपथा पण असतात. एकदा जीव गुंतला की,…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥228॥ परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥229॥ तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥230॥ या बोला अनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥231॥ म्हणे भलें केलें पार्था । एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥232॥ तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जग…

Read More

दर्शन कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरीच्या ठिकाणी भरपूर काम असेल आणि दिवस कामातच जाईल. तुम्ही व्यवसाय विस्ताराच्या योजना आखू शकता, परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तरीही, कुटुंबातील सदस्यांसोबतचे सकारात्मक वातावरण तुमचा आनंद वाढवेल. दूरच्या व्यक्ती किंवा संस्थांशी संबंध दृढ होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्च टाळावेत. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – व्यवसायात आर्थिक लाभ आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे देखील काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामातील यश मानसिक आरोग्य आणि आनंद देईल. मित्र आणि प्रियजनांसोबत आनंददायी भेटी होण्याची शक्यता आहे. सहलीचे नियोजन केले…

Read More

रेवती निलेश पांडे अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. माझी जवळची मैत्रीण स्नेहा दुसऱ्यांदा आत्या झाली. हॉस्पिटल माझ्या घराच्या अगदी जवळच असल्यामुळे, त्या इवल्याशा परीला बघण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी तडक तिथे पोहोचले… मी रूममध्ये शिरले, तेव्हा स्नेहा अगदी कौतुकाने आपल्या भाचीला मांडीवर घेऊन बसली होती. मला बघताच ती आनंदाने ओरडली, “अग बघ बघ, ‘डिट्टो’ माझ्यावर गेली आहे! डोळे, नाक… अगदी माझ्यासारखेच आहेत ना गं?” मी हसून म्हटलं, “अगं, आत्ता कुठे दोन-तीन दिवसांचं बाळ आहे हे, आणि तुला इतक्यात कळलंही, ही कोणासारखी दिसते ते?” तितक्यात बाळाची आजी मागून उत्साहाने म्हणाली, “अगं, तिची आई सुद्धा लहानपणी हुबेहूब अशीच दिसायची!” आणि मग…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी आहे त्याच सामुग्रीद्वारे काही नवनवीन प्रयोग केले जातात… याच टिप्स इतर महिलांनाही उपयोगी पडतात. ‘फूड कॉर्नर’मध्ये दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर डोकं दुखतं म्हणून सकाळपासून पाच गोळ्या खाल्लेला पेशंट आता इंजेक्शन घ्यायला ओपीडीत आला होता. कुलूपाला पन्नास चाव्या लावून उपयोग नसतो, ते त्याच्या एकाच चावीनं उघडतं, तद्वतच, दुखण्याच्या कारणावर उपचार केले की, दुखणं आपोआप थांबतं. आजच्या काळात लोक इतके घोळ घालतात, जेव्हा औषधशास्रच पाळण्यात होतं तेव्हा किती, कशी औषधं खात असतील लोक? मला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत टॉक्सिकॉलॉजीच्या प्रॅक्टिकलला पाच गुणांना विचारल्या जाणाऱ्या ‘त्याची’ आठवण झाली… पंधराव्या शतकात तर वैद्यकशास्रात अद्यापही उजाडायचं बाकी होतं; रोगांचं मूळ दैवी कोपात आहे असं सगळे मानायचे… जादूगार, भूतबाधा, देवाचा कोप या त्रिसूत्रीनं वैद्यकशास्त्र वेढलेलं होतं… अशातच एका रात्री स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये एका लहानश्या…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥212॥ बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥213॥ तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडे । मनपवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविलें ॥214॥ तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥215॥ तंव धारणावारू दाटिले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥216॥ तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥217॥ पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु…

Read More