Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन सकारात्मक बदलांसाठी तयार रहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील. रागावर नियंत्रण ठेवा, वादविवाद टाळा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज परिवारातील सदस्यांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. वृषभ – कौटुंबिक जीवनात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कलात्मक क्षमतेमुळे अनेकांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. कामाचा जास्त ताण घेणे टाळा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. सर्वाधिक गरज असेल तेव्हा मित्र मदतीला धावून येणार नाहीत. मिथुन – सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटी…

Read More

मयुरेश गोखले नवरा ऑफिसला गेल्यावर ती घरची कामं करत होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि रेडिओवर गाणं लागलं होतं, “तेरे बिना जिया जाए ना, बिन तेरे… तेरे बिन साजना, साँस में साँस आए ना…” पावसामुळे वातावरण धुंद झालं होतं आणि बायकोची अवस्था त्या गाण्यासारखीच झाली होती. तेरे बिना जिया जाए ना… गॅलरीत येऊन तिने पावसाचे थेंब अंगावर झेलले. समोरच्या झाडाच्या हिरव्यागार पानांवरून पाण्याचे थेंब ओघळत होते… ती त्या थेंबांकडे पाहात बसली. त्या पानासारखे तिचे मनही ओले चिंब झाले होते… नवऱ्याची प्रचंड डोंगराएवढी आठवण तिला येत होती…. तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि तिने दीर्घ श्वास घेतला. या श्वासातही…

Read More

राजू पाटील लच्छनकर मानवी जीवन सुख, दुःख, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांनी भरलेलं आहे. जीवन जगत असताना बरेचशा इच्छा मनात राहतात, कधी त्या पूर्ण होतात तर, कधी नाही! फार कमी लोक असतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून जाते. आमच्या भागात अशीच एक परंपरा आहे… तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली की, एक-दोन बकऱ्याची, पाच बकऱ्यांची, 11 बकऱ्यांची, 21 बकऱ्यांची दावत दिली जाते आणि त्या दावतला जेव्हा अन्य एखादा नवस करतो किंवा नवस बोलतो तो नवस फक्त त्यालाच माहीत राहावा लागतो आणि ज्या दिवशी मग ती नवसाची कंदुरी (मटण) होते, त्या दिवशी तो त्या नवसाच्या कंदुरीचे कारण सगळ्यांना…

Read More

काही वेळेस पदार्थ बिघडतो, काहीतरी कमी जास्त होते किंवा खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच काही टिप्स आपण आज पाहुयात – हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना… हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

मानसी देशपांडे आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण मी स्वतः मुंबईची असल्यामुळे थोडा हळवेपणा आहे. मुंबई ही काहीजणांसाठी मायानगरी आहे. पण ही कधीच झोपत नाही. आजच्या तारखेला सुद्धा नोकरीनिमित्ताने अनेक लोक येथे येतात, ज्यांना ही मुंबई आपल्यात सामावून घेते. बघा, काहींना नाईलाजास्तव देखील इथे यावं लागतं. कारण, उदरनिर्वाहाला इथे कमी नाही. जसं व.पु. म्हणतात, ” प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंत पोहोचवतो, पुढचा प्रवास तो स्वतःच्या हिमतीवर करतो…” अगदी काहीसं असंच आहे. मुंबई ही अतिशय वेगवान आहे. इथे तुम्हाला आणून जरी ठेवलं तरी वेळ पाळणं आणि मेहनत करून…

Read More

अध्याय आठवा शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥26॥ ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणऊनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥ कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥239।। पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे ॥240॥ जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥241॥ म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अवसरें…

Read More

दर्शन कुलकर्णी जया एकादशी भीष्म द्वादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज भोवतालचे वातावरण आनंददायी असेल. एकामागोमाग एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात काही नवीन योजना राबवू शकता, मात्र त्याबद्दल जोडीदाराशी चर्चा करायला विसरू नका. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जरा लांबच ठेवा, अन्यथा ते तुम्हाला काही चुकीच्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. वृषभ – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाल, मात्र लोक या प्रकाराला स्वार्थी समजू शकतात. कामाबद्दल निष्काळजीपणा करू नका, कारण त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बिघडू शकतो. कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे कोणतेही तणाव दूर होतील. आज होणाऱ्या नव्या ओळखी…

Read More

दीपक तांबोळी भाग – 1 “प्रियकराशी भांडण झालं म्हणून सख्ख्या आईने दोन वर्षांच्या मुलाला ट्रकखाली फेकून दिले” वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली आणि बातमीतला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून तन्वीचा थरकाप झाला. परवाच तिने अशीच एक बातमी वाचली होती… “चाकूचे सपासप वार करून सख्ख्या आईने चिमुरडीचा जीव घेतला…” तेव्हाही तिचा असाच थरकाप झाला होता. आज ही बातमी! तिचे हातपाय लटपटू लागले. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. भरलेल्या डोळ्यांनी तिने कोपऱ्यात खेळत असलेल्या आपल्या चिमुरड्या भावाकडे – मयुरकडे पाहिलं. तो आपल्याच तंद्रीत कसलं तरी गाणं गुणगुणत खेळत होता. आपली आई आपल्या भावाला ट्रकखाली फेकत असल्याचं चित्र तिच्या मनाने डोळ्यासमोर उभं केलं… तशी ती…

Read More

साहित्य हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! कृती हेही वाचा – Recipe : आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात टिप्स (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एक जोडपं ओपीडीत आलं होतं. घर आवरताना पडल्यानं ‘तिच्या’ हाताला मुका मार लागला होता आणि बांगडी फुटून थोडं रक्त निघालं होतं… “महाराजांच्या पूजेचं सामान माळ्यावर ठेवायला गेले आणि पडले… पण महाराजांच्या कृपेनं किरकोळ जखमेवर निभावलं…” हा तिचा भोळाभाबडा तर्क होता तर, “आपलं काम करताना आपल्या भक्ताला जे साधं पडण्यापासून वाचवू शकत नाही, असे महाराज-बिहराज काय कामाचे?” हा त्याचा कडू प्रश्न होता… मी आपलं पेशंटचं मनगट नीट तपासून टीटीचं इंजेक्शन दिलं, पण त्यांचा वाद काही थांबेना! त्यामुळं त्यांना एक झेनकथा सांगितली, तुम्हालाही सांगतो… जपानस्थित ‘याकुशिमा’ नावाच्या एका शांत जंगलात हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर एक छोटेखानी झेनमठ होता. झेन गुरू…

Read More