Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर हिंदी अन् मराठी चित्रपटातील काही कलाकार असे आहेत की, जे कायम त्यांच्या अभिनयामुळे किंवा त्यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे मनात घर करून राहतात. याच हीरोंच्या यादीमध्ये अमोल पालेकर येतो. दिसायला जरा बरा हो! बराच म्हणावा लागेल! कारण अगदी चॅाकलेट हीरो वगैरे मटेरिअल तो कधीच वाटला नाही, तरीपण तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांमुळे लक्षात राहतो. अमोल पालेकर हा प्रेक्षकांना पडद्यावर नेहमी “Boy to next door” म्हणजेच अगदी आपल्या शेजारचा ओळखीचा मुलगा वाटला. अमोल पालेकरच्या बहुतेक भूमिका नेहमी मध्यमवर्गीय काटकसरी आणि टिपिकल मुंबईकर राहणीमान असलेल्या तरुणाच्या आहेत. रजनीगंधा, घरौंदा, गोलमाल, अपने पराये, छोटी सी बात, नरम गरम, चितचोर, दो लडके दोनो कडके…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥21॥ मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥328॥ जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ॥329॥ एवं थितिया मातें चुकले । जिहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥330॥ मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥331॥ अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख…

Read More

दर्शन कुलकर्णी आमलकी एकादशी मराठी भाषा गौरव दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी शुभ असेल, एखादा महत्त्वाचा करार होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. घराच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी मोठा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून विशेष सन्मान मिळू शकेल. तुमच्या सामाजिक कार्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. वृषभ – कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे सहजतेने काम करू शकाल. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता.  न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी…

Read More

श्रीकृष्ण काळकर आजची तरुणाई करिअर आणि त्यातून मिळणारा पैसा, याच्या मागे लागली आहे, असे चित्र आहे. करिअर म्हणजे अनेक मोठया पदव्या आणि त्या ‘भाड्याने’ देऊन मिळणारा लठ्ठ पगार! तो पगार मिळवण्यासाठी अर्ध आयुष्य बिनालग्नाचे व्यतित होते! त्याचसंदर्भातील या कथा – बबड्या अजून लहान आहे! कोणत्याही महानगरातील मोठया शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती. त्रिकोणी कुटुंब. आई वडील या दोघांनाही लठ्ठ पगार. त्या दोघांच्या इच्छा-आकांक्षा केंद्रित झाल्यात बबड्यावर. त्यांच्याकडे दरमहा इंग्रजी दैनिके, पाक्षिके, मासिके आणि बबडयासाठी कॉमिक्स भरपूर येत असत. रद्दीवाला प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून येऊन रद्दी गोळा करून जायचा. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असायचा. बबड्याच्या वयाचा. तो पण वडिलांना रद्दीचा गठ्ठा उचलायला मदत करायचा.…

Read More

ओल्या हरभऱ्याची पोळी साहित्य कृती टिप हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… मुळ्याची पोळी साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

मानसी देशपांडे आई-वडील होणं खरंच सोपं असतं का हो? तसं म्हटलं तर, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांच्याही खांद्यावर जी महत्त्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे बाळावर चांगले संस्कार करणं. आपण बघतो, आई-वडिलांना कधीच ताणविरहित झोप लागत नाही. कुठलं ना कुठलं टेन्शन हे त्यांना असतंच! प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, “व्यथांची यादी ही न संपणारी असते…” खरं आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. राब राब राबतात. पण घरातल्या परिस्थितीची जाणीव ही सर्वच मुलांना असते, असं होत नाही. मला मान्य आहे, मुलांच्या सुद्धा काही आवडीनिवडी असतात… पण, जेव्हा तुमच्या घरात आर्थिक समस्या असते, त्यावेळी इच्छा नसली तरी, काही गोष्टींना मुरड…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मज येता पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥315॥ स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥316॥ आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥317॥ परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥318॥ मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सोरसें । स्वर्गा येती ॥319॥ जेथ अमरत्व हेंचि सिंहासन ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नवीन काम मिळण्याचीही दाट शक्यता आहे. परदेशी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला हायड्रेट ठेवा. वृषभ – नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या कामामुळे तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नोकरीत आपले काम समर्पणाने पूर्ण केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल. उन्हात फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. मिथुन -…

Read More

दीपक तांबोळी भाग – 2 रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करूनही शुभा न जेवताच झोपून गेली. रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकीकत सांगितली. शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला. शुभा जिवाचं काही बरंवाईट करून घेईल, या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही. बरं तरी, शुभाच्या रूमच्या दरवाजाची कडी तुटली असल्यामुळे तिला दरवाजा आतून लावता आला नाही. नाहीतर, रात्रभर दोघांच्या जीवाला घोर लागून राहिला असता. तरीसुद्धा दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते. रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली. अख्खा दिवस तिच्या समोर होता. टाइमपाससाठी आता मोबाइलही नव्हता, तो तर आईने तोडून टाकला होता आणि…

Read More

राजीव जोशी 27 सप्टेंबर 1990… त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो! तो म्हणजे मुरबाडजवळ देहेरी गावात असलेला ‘गोरख गड’. हा गड चढायला थोडासा अवघड. सुरुवातीला थोडीशी चढण आहे, त्या नंतर सरळ पायवाट, नंतर परत एकदा मातीची चढण आहे… त्यावरून घसरायला होतं आणि नंतर असलेला अतिशय अवघड रॉक पॅच. आजूबाजूला असलेला अतिसुंदर निसर्ग. खूप आवडला हा गड प्रेमात पडलो मी त्याच्या आणि ठरवलं की 100 वेळा तरी या गडावर यायचं! 1990 ते 2009 या कालावधीत मी 65 वेळा गोरख गडावर आलो. या 19 वर्षांत खूप मित्र ओळखीचे माझ्याबरोबर आले. काहींना हा गड आवडला तर, काही घाबरले, काही…

Read More