Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढां चंद्रुही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजें ॥379॥ तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे ॥380॥ यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करूनी ॥381॥ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥26॥ मग निस्सीमभावउल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ आवडे तैसे । भलतयाचें हो ॥382॥ भक्तु माझियाकडे दावी । आणि मा दोन्हीं हात वोडवी । मग देठुं न फेडितां सेवीं । आदरेंशी…
दर्शन कुलकर्णी धूलिवंदन खग्रास चंद्रग्रहण करीदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा टीम अवांतर भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये झाला. भारताचे पहिले उद्योगपती म्हणून देखील ते ओळखले जातात. जमशेदजी टाटा यांनी मुंबईत येऊन वयाच्या 14 व्या वर्षी एका छोट्या व्यवसायातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून कॉलेजने त्यांना भरलेली पूर्ण फी परत केली होती. 1858 मध्ये पदवीधर होऊन वडिलांच्या व्यवसायात ते सह्भागी झाले. त्यावेळी इंग्रज सरकारने 1857 चा उठाव मोडून काढला होता. टाटांनी अशा…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तशी मावशी जवळ जवळ सगळ्यांना असते. मला सख्खी मावशी नव्हती… पण एक अगदीच जीवाभावाची मावशी मात्र मला होती. खरंतर, प्रत्येक जीवाला किमान एक आत्या आणि एक मावशी असायलाच हवी. तशी माझी ताई मावशी! ताई मावशीच्या घरी राहायला जायचं म्हणजे कोण अप्रूप. कॉटनग्रीन! हे नावच मला भारी वाटायचं. बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे क्वार्टर होते. परिसरात एकसारख्या दिसणाऱ्या सर्व बिल्डिंग… गार्डनही होतं. हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना! ताई मावशींनी केलेलं कौतुक खूप छान वाटायचं. काका पण किती मस्त होते. गप्पा टप्पा चालायच्या. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.…
पराग गोडबोले एका लग्नाला जायचा नुकताच योग आला. कार्यालयात रंगीबेरंगी वातावरण. वेगवेगळे वेष परिधान केलेले असंख्य परिचित, अपरिचित चेहरे आणि त्यात अलगद सामावलेले आम्ही… वातानुकूलनाचा हवाहवासा गारवा, बऱ्याच जणांची आणि जणींची चाललेली निर्हेतूक लगबग लगबग… अगदी सगळ्याच लग्नांमध्ये असतं तसं मंगल आणि मोहक वातावरण… समोर आलेला लिंबू सरबताचा, उन्हातून आल्यानंतर हवाहवासा वाटणारा घोट… नवे कोरे कपडे आणि त्यांचा तो विवक्षित गंध. पोरांची पळापळ आणि हे सगळं बघणारा तटस्थ मी… बसून बसून कंटाळा आल्यानंतर, एक चक्कर रुखवतापाशी… संसारोपयोगी विविध वस्तू बघताना, आमच्या लग्नाच्या वेळच्या रुखवताची पण आठवण येत गेली. जवळपास तसाच जामानिमा आणि त्याच भावना! असा टंगळमंगळ करण्यात तासभर गेल्यानंतर, घटिका…
सतीश बर्वे खरंतर, आजकाल अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन उचलण्याचे मी कटाक्षाने टाळतो. पण का कोण जाणे, गेल्या आठवड्यात असाच अवेळी आलेला एक फोन मी उचलला आणि आजवर मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडलेल्या एका गोष्टीचा शेवट गोड झाला. त्याचं असं झालं… समोरून आवाज आला… “मी कौस्तुभ सावरकर बोलतोय. महत्प्रयासाने तुमचा नंबर मिळाला काल रात्री उशिराने. म्हणून आज सकाळी जरा लवकरच फोन केला आहे मी…” पुढे कौस्तुभने जे सांगितले ते सगळं अविश्वसनीय होते… त्याचा सासरा निनाद अभ्यंकर आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला एका नामांकित औषधी कंपनीत नोकरी करत होतो, जी नोकरी निनादला काही वर्षांनी नाईलाजाने सोडायला लागली होती. निनादला कॅन्सर झाला होता. तो…
सुधीर करंदीकर मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लासला सोडणे / आणणे वगैरे याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिसमधून घरी आले की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण 6 – 6.30 ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कूटरने असते. कधी-कधी बायको बावधनहून स्कूटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसने आणि पुढचे पायी जातो. एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेनवीण सौरसु नाहीं । मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥367॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥368॥ अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥369॥ पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥370॥ तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥ करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल…
दर्शन कुलकर्णी होळी हुताशनी पौर्णिमा / पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 05:55 वाजता वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर टीम अवांतर सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेदशास्त्रसंपन्नतेची होती. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून, लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कित्येक व्याख्याने दिली आणि ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी ख्याती त्यांना मिळाली. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, साने गुरूजी यांचे विचार त्यांनी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले. त्याचबरोबर आपल्या…
शोभा भडके भाग – 16 आरू आणि शिव एकमेकांच्या इतके जवळ होते… शिव अजूनही तिच्यावर झुकून तोंडावर हात ठेऊन, तिच्या डोळ्यांत हरवला होता. त्याला भानच राहिलं नव्हतं… आरुची अवस्था तर तिच्या समजण्यापलीकडे होती… त्याचा स्पर्श तिला रोमांचित करत होता… तिचं हृदय जोरजोरात धडधडत होत… जे होतंय ते सहन न होऊन, ती आता रडायच्या तयारीत होती. तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं… पण शिवला याचं भानच नव्हतं… तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यांत हरवला होता तो! त्याची ती रोखलेली नजर आणि त्याचा होणारा स्पर्श सहन न होऊन तिने एक दीर्घ श्वास घेत, डोळे मिटून, दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबत, जोरात त्याला…
माधवी जोशी माहुलकर वांगे बुरानी हा एक विस्मृतीत चाललेला पदार्थ आहे. बुरानी हा पदार्थ बहुतेक बिर्याणी या शब्दाचा अपभ्रंश असावा. कुठून कसा काय आला माहीत नाही, परंतु वांगे बुरानी हा एक अत्यंत चविष्ट असा भाताचा प्रकार आहे. फार कमी सामानामध्ये वांगे बुरानी तयार होते. आमच्या नागपुरच्या सरहद्दीवर लागून जी राज्यं आहेत, त्या प्रांतातील खूप लोक व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने नागपुरात येऊन स्थायिक झाले आहेत. वांगे बुरानी हा पदार्थ त्याच लोकांनी आपल्या खानपानातून लोकाांपर्यंत पोहोचवला असावा. बांधकाम व्यावसायाकरिता जे मजूर बालाघाट, मध्य प्रदेश, छिंदवाडा, गोंदिया अशा प्रांतातून येतात ते भाजी आणि भात खाऊन सकाळी कामावर जातात. करायला सोपा आणि कमी वेळात…
