Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नोबेल विजेत्या अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक टीम अवांतर नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक यांचा जन्म 26 जून 1892 रोजी पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे सायडेनस्ट्रिकर या धर्मप्रचारक कुटुंबात झाला. 1900 साली झालेल्या बॉक्सर उठावात पर्लच्या आईने मुलांना घेऊन शांघायमध्ये आश्रय घेतला. चिनी संस्कृतीबद्दलचे पर्ल यांचे आकर्षण आणि प्रेम त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते. पुढे 1935 मध्ये पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही पर्ल यांनी ‘बक’ हे आडनाव व्यावसायिक क्षेत्रात वापरले. 1922 पासून पर्ल यांनी मासिकांत लघुकथा आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये ईस्ट विंड, वेस्ट विंड ही त्यांची पहिली…
स्नेहा सुतार भाग – 4 ‘ऐसे काही व्हावे मन शांत निजावे… एकांताच्या वेळी आकांत निमावे… ‘ उन्हाळ्याच्या दिवसात झाडं घुसळून वारा यावा आणि आपल्यापर्यंत पोहोचेस्तोवर तो मंद व्हावा… त्याचं कानांशी सलगी करणं हवं हवंसं वाटावं… त्याने उडवलेल्या केसांच्या बटा अशाच हुळहूळ उडत रहाव्यात. त्या हुळहूळतील तसा तसा अंगावर हलकेच शहारा उठावा… आणि अशात सलीलचं हे गाणं सुरू असावं… मग कसं होईल? अगदी तसंच तिला झालं. बाहेरचा पाऊस एव्हाना थांबून मजा बघावी, असा अगदी मंद झाला होता. अगदीच मंद… कुणी काय म्हणतात ते म्हणू दे, असं म्हणून तिने खिडकी उघडून समोरच्या सीटच्या पाठीवर हात टेकवून त्यावर डोकं ठेवलं. म्हणजे अख्खी खिडकीच…
सुधीर करंदीकर आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे 7 टक्के व्याज मिळते, कुठे 5 टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे 10 टक्के, हे आपण जाणतोच… आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते. मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये! आता ते किती टक्के झाले, हे तुम्हीच सांगा. जुनी गोष्ट आहे… मी एकदा बावधनला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरिता एका म्हशीची मदत घेतली आणि म्हशीबरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला आणि त्याकरिता म्हशीच्या मालकाला 5 रुपये दिले… एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती…
तांदळाची खीर साहित्य कृती हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी गव्हल्याची खीर साहित्य कृती हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… दुधीभोपळ्याची खीर साहित्य कृती टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवू शकता, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
सतीश बर्वे एका प्रसिद्ध कबड्डी सामान्यांच्या स्पर्धेला मी उपस्थित होतो. मैदान खचाखच भरलेले होते. मला जेमतेम मुख्य दरवाज्याजवळ उभे राहण्यापुरती जागा मिळाली होती. आयोजक प्रमुख पाहुण्यांची वाट बघत होते. इतक्यात गलका झाला… “आले रे पाहुणे.” इतरांप्रमाणेच मी देखील पाय उंचावून पाहुणे कोण आहेत, ते बघत होतो. पाहुणे आत शिरता शिरता त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि मी चपापलो. कारण प्रमुख पाहुणे म्हणजे माझा नाईट कॉलेजचा विद्यार्थी होता प्रसाद राणे. त्याला काहीतरी बोलायचे होते, असे वाटले मला क्षणभर… पण आयोजकाच्या गराड्यात ते जमले नसावे त्याला! तो सगळा लवाजमा स्टेजच्या दिशेने जायला लागला आणि माझ्या नजरेसमोर पंधरा वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला. सामाजिक…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥29॥ तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥407॥ जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवें कर्मे करूनि । भजती मातें ॥408॥ ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझां ठायीं । आणि मी तयांचा हृदयीं । समग्र असें ॥409॥ सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥410॥ तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।…
दर्शन कुलकर्णी संत तुकाराम बीज वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी संशोधक नारायण गोविंद चापेकर टीम अवांतर मराठी संशोधक नारायण गोविंद चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट 1869 रोजी मुंबईत झाला. शिक्षण रेवदंडा (कुलाबा जिल्हा), पुणे आणि मुंबई येथे झाले. कायद्याचे पदवीधर झाल्यानंतर काही काळ वकिली करून त्यांनी न्यायखात्यात नोकरी पत्करली आणि 1925 मध्ये पहिला वर्ग न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. त्यांचे बरेचसे लेखन निवृत्तीनंतरच झाले. त्यांचे सुमारे वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी बदलापूरची सामाजिक दृष्ट्या संपूर्ण पाहणी करणारा, बदलापूर (आमचा गांव)… हा 1933 मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ विशेष गाजला. चित्पावन आणि चापेकर हे ग्रंथही असेच सामाजिक संशोधनात्मक म्हणता येतील. तर…
दीपक तांबोळी फाटकाचा आवाज आला, तसं मी दार उघडून बाहेर पाहिलं तर, एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता… “फुलं घेऊ का?” मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं. “हो घ्या ना…” तो फुलं तोडू लागला. तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो. मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रूमही चांगली आणि पटकन मिळाली. रूमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं… मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता, कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येताना आईने मला श्रीगुरुदत्तांचा फोटो घेऊन जायचा खूप आग्रह केला. सकाळी कामावर निघताना देवाला नमस्कार करून निघालं की, दिवस चांगला जातो, असं तिचं म्हणणं.…
प्रदीप केळुस्कर भाग – 1 अनंताने विलासच्या घरासमोर स्कूटर उभी केली आणि जोराने हॉर्न वाजवला. त्याचा हॉर्न ऐकून आतून विलासने ‘आलो.. आलो..’ म्हणत ओ दिली. अनंताचे लक्ष गॅलरीकडे गेले, तेथे विलासचे बाबा उभे होते. त्याने बाबांना हात दाखवला… बाबांनी त्याला हात दाखवला. “ये आत ये… दोन मिनिटे गप्पा मारू…” बाबा म्हणाले. “नाही ओ… आधीच उशीर झालाय, रविवारी येतो…” “दोघेही या, वाट पहातो…” “हो येतो…” तेवढ्यात विलास आतून आला आणि त्याच्या स्कूटरवर मागे बसला. गाडी चालवता चालवता अनंता बोलू लागला… “बाबा गप्पा मारायला बोलवत होते.” “त्त्यांचा वेळ जात नाही. सरोज शाळेत गेली म्हणजे घरी कोणी नसतं. पूर्वी आई होती तेव्हा दोघांचा…
रेवती निलेश पांडे आज खिडकीतून लहान मुलांना रंगात न्हाऊन निघताना पाहिलं आणि मन थेट बालपणातल्या त्या गल्लीत गेलं… खरंच, धुळवडीची खरी मजा त्या निरागस वयातच होती. ते वयच मुळी ‘फुलपाखरी’ असतं… मुक्त, स्वच्छंदी आणि रंगीबिरंगी… लहानपणी होळीची खूप मजा होती, धुळवड तर अगदी पहाटेपासूनच सुरू व्हायची प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला बाहेर ओढायचं आणि सगळेच आपला रंग त्याला लावण्यासाठी तुटून पडायचे… आमच्या गल्लीत एक छोटी टाकी होती धुळवडीच्या दिवशी त्यातही रंग टाकायचो आणि प्रत्येकाला त्या टाकीत ढकलून द्यायचं… सगळा नुसता धिंगाणा! जसं जसं वय वाढत गेलं, तसं धुळवडीचं स्वरूप जरा सोफिस्टिकेटेड व्हायला लागलं आणि आता हा रंगाचा खेळ फक्त एक ‘छोट्या…
