Author: Team Avaantar

डॉ. प्रिया गुमास्ते मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू. सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे. आदान काळ आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो. तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6|| अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील…

Read More

रविंद्र परांजपे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या. शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 जुलै 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 28 आषाढ शके 1947; तिथि : नवमी 14:42; नक्षत्र : भरणी 24:37 योग : शूल 24:54; करण : वणिज 25:28 सूर्य : कर्क; चंद्र : मेष 30:11; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. नोकरदारांना काही कामे करवून घेण्यासाठी संयम आणि हुशारी दाखवावी लागेल.…

Read More

लीना जोशी परुळेकर लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून. pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते. आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) साधारण 15-20 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मी आणि माझी भावजय काही निमित्ताने डोंबिवलीला माझ्या आत्येभावाकडे गेलो होतो. परतताना कसारा लोकलने डोंबिवलीहून कसाऱ्याला येण्याचा निर्णय घेतला. आमचा प्रवास गप्पा करण्यात अगदी मजेत सुरू होता. आमच्या समोरच एक हसतमुख तरुणी बसली होती. तिलाही आमच्या गप्पांमध्ये सामावून घेतलं. लोकलचा घडीभराचा प्रवास पण तोही चिरस्मरणीय झाला. स्थळ सुचवायला छान वाटली मुलगी. हळूच तिचं शिक्षण, आवडी निवडी इत्यादी माहिती काढून घेतली. ती एम्.कॉम. असून आता सी.ए. करत आहे समजलं. सुट्टी म्हणून ती आजीकडे जात असल्याचंही कळलं. तिची जात, धर्म, गाव ही चौकशी अजिबात केली नाही. कदाचित गप्पांमध्ये जमलेल्या रंगाचा बेरंग होईल,…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 जुलै 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 27 आषाढ शके 1947; तिथि : अष्टमी 17:01; नक्षत्र : अश्विनी 26:13 योग : सुकर्मा 06:47; करण : तैतिल 27:53 सूर्य : कर्क; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडा थकवा जाणवू शकतो. घरात काही बदलांमुळे भावनिक बनाल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस साधारण राहील. व्यवसायात…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आले तुमच्या भेटीला! शिस्त म्हणजे शिस्त… हे आपण लहानपणापासूनच ऐकत मोठे झालो. ‘खाण्यापिण्याचे लाड, पण बाकी ऐकलं नाही तर फटके मिळतील…’, लहानपणी सगळ्यांनीच हे ऐकले असेल. हळूहळू मोठे होताना ही शिस्त आणखी कडक होत गेली. जसं की संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत घरात… हात, पाय, तोंड धुणं… शुभंकरोती म्हणून झाल्यावर 30 पर्यंतचे पाढे घडाघड म्हणायचे… मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा… आणि मग अभ्यासाला बसायचं. अभ्यास नसेल तर आईला कामात मदत करायची. हाही शिस्तीचाच एक भाग! सकाळी उठल्यावर बसल्या जागी देवाचे आभार मानून नमस्कार करायचा. आपल्या पांघरुणाची आपणच घडी घालायची. आन्हिक उरकून शाळेची तयारी स्वत:च करायची.…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन ‘भस्मासुर राक्षस’ हा काय पुराणकाळातच होता का? आजच्या अद्यावत काळात सुद्धा भस्मासुर राक्षस आहे. तो कोणता? सर्वात प्रथम, हे भस्मासुर प्रकरण म्हणजे काय? हे थोडक्यात समजणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, कित्येकांना हे भस्मासुर प्रकरण माहीत नसणार. पूर्वी एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शंकरांची खूप तपश्चर्या केली आणि भगवान श्री शंकरदेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले, “काय मागायचे ते वरदान माग?” “मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो जळून भस्मसात झाला पाहिजे,” असे वरदान त्या राक्षसाने मागितले. भगवान श्री शंकर म्हणजे भोलेबाबाच ते, ‘तथास्तु’ म्हणाले. म्हणून त्याचे नाव भस्मासुर राक्षस असे झाले. हे असे वरदान मिळाल्यावर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 जुलै 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 26 आषाढ शके 1947; तिथि : सप्तमी 19:09; नक्षत्र : रेवती 27:38 योग : अतिगंड 09:28; करण : विष्टी 08:07, बालव 30:07 सूर्य : मिथुन; चंद्र : मीन 27:38; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 करी दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली असणार आहे. पण उत्साहाची पातळी घसरलेली असेल. अनावश्यक खर्च करण्याचे टाळा, अन्यथा आर्थिक…

Read More

अजित गोगटे `शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला. नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती : “काही पत्रकार…

Read More