Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
माधवी जोशी माहुलकर नवरात्रौत्सवात अनेकजण उपवास करतात. अशावेळी फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. अशावेळी साबुदाणा, भगर, बटाटा पॅटीस तसेच भगर इडली हे पर्याय ठरू शकतात. भगर हा मिलेट्सचाच एक प्रकार असल्याने ही डिश पौष्टिक सुद्धा आहे. आता यांची रेसिपी आपण पाहुयात. भगर, साबुदाणा पॅटीस एकूण कालावधी – सुमारे 45 मिनिटे साहित्य भगर – 1 वाटी साबुदाणा – 1 वाटी शेंगदाणा कूट – अर्धी वाटी आले – 1 इंच तुकडा हिरवी मिर्ची आणि कोथींबीर पेस्ट – अर्धी वाटी उकडलेले बटाटे – 2 मीठ – चवीनुसार जिरे – 1 लहान चमचा तेल – तळणासाठी खोबऱ्याचा किस – 1…
पराग गोडबोले आम्ही नेहमी भांडतो, वाद घालतो, परत एक होतो आणि मग संसाराचा गाडा सुरळीतपणे सुरू राहतो. कधी ती एक पाऊल पुढे येते, तर कधी मी एक पाऊल मागे घेतो. गेली कित्येक वर्षं हे चक्र असं अव्याहतपणे सुरू आहे… परवा असंच झालं. तिला पुण्याला माहेरी जायचे वेध लागले. माहेरी जायचं म्हटल्यावर सगळ्याच बायकांच्या अंगात येतं की, काय कोणास ठाऊक? पण आमच्याकडे मात्र येतं! यावेळी पण आलं. चार दिवसांसाठीच जायचं होतं, पण भली मोठी बॅग फडताळातून बाहेर पडली आणि भरली जाऊ लागली, प्रस्थानाच्या चार दिवस आधीपासूनच!! हे न्यायचंय… ते हवंय… म्हणता म्हणता बॅग टम्म फुगली. अगदी ओसंडून वाहू लागली. जायच्या आदल्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥33॥ म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनि ॥202॥ हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ॥203॥ देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥204॥ एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 07 आश्विन शके 1947; तिथि : सप्तमी 16:30; नक्षत्र : मूळ 30:16 योग : सौभाग्य 24:59; करण : विष्टी 29:22 सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सरस्वती आवाहन महालक्ष्मी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या संदर्भात काही योजना आखली जाण्याची शक्यता आहे. एखाद्या सामाजिक कार्यात…
डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धीमान असतात, त्यांच्यात निसर्गदत्त अशा कोणत्या ना कोणत्या क्षमता, कौशल्ये असतातच, हे आपण मान्य केले आहे. आपल्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार, त्यांची कौशल्ये आणि क्षमता आपल्याला शोधून काढायच्या आहेत. शाळेतील सर्व उपक्रम सर्वांसाठी आयोजित करण्यातूनच हे शक्य होणार आहे. निवडक विद्यार्थ्यासाठी निवडक उपक्रम आणि काहीच विद्यार्थ्यांना वारंवार संधी देणे ही प्रचलित पद्धतच निकालात काढायला हवी आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहनच न मिळाल्याने ते कधी भागच घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्या सुप्त क्षमता ओळखण्याची संधीच मिळत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व उपक्रम घ्यायला हवेत. या विविध उपक्रमांत भाग घेण्याने…
सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक आणि अत्यंत ज्येष्ठश्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची पत्नी आणि नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट यांनी आपल्या आयुष्यातली किमान 30 वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा वगैरे जमवण्यात घालवली. मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहिले. विल ड्युरांटचे फक्त ‘History of civilization’चेच 11 खंड आहेत. ते त्यांनी 1935 ते 1975 या 40 वर्षांच्या काळात लिहिले आणि प्रसिद्ध केले. 20 इतर ग्रंथ आहेत; त्यापैकी पाच ग्रंथ तर त्याच्या मृत्यूपश्चात तब्बल दोन दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की, लोक आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात…
कामिनी व्यवहारे रोजच्या रोज रुचकर, खमंग पदार्थ, तेही नवनवीन पदार्थ बनवणे म्हणजे महिलांसाठी एक परीक्षाच असते. विशेषत:, सुट्टीच्या दिवशी काहीतरी हटके करण्याकडे महिलांचा कल असतो. घरातल्या सर्वांनाच रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काही तरी खाण्याचा मूड असतो. मग एखादा असा मेन्यू ठरतो की, तोच स्पेशल असतो. अशावेळी घरात वेगवेगळे पदार्थ करत असताना, हिरव्या वड्याची रेसिपी करून बघायला काय हरकत आहे! या प्रोटिनयुक्त वड्यांची कृती पाहुयात. तयारीस लागणारा एकूण वेळ – सुमारे 7 तास पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य मूग – अर्धी वाटी मटकी – अर्धी वाटी चणाडाळ – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 5 ते 6 आले – 1 इंच…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. तथापि, शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. सकारात्मक विचार ठेवा. दुसऱ्यांचे सल्ले घेतले तरी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) आसपास कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. महिलांचे जोडीदाराशी मैत्रीचे नाते राहील आणि आठवडाही आनंदी जाईल. विद्यार्थ्यांवर काही कारणाने दडपण राहील, मात्र सकारात्मक विचार करा. वृषभ या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उलाढाल चांगली राहील. नवीन योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. गृहसौख्य उत्तम असेल. आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होऊन हाताशी पैसे येतील. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) सुमारास भावंडे भेटतील. महिला मनाप्रमाणे खर्च करू शकतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना मित्रपरिवारात काही…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥ एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥ मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥ तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 06 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:26; नक्षत्र : ज्येष्ठा 27:53 योग : आयुष्मान 24:30; करण : गरज 27:31 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 27:53; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक… दिनविशेष विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर टीम अवांतर अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म…
