Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्रदीप केळूस्कर दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले… बाहेर दत्तूकाका होते… “काय हो काका? आज सकाळीच…” “मास्तर आसत..?” “अजून झोपलाय तो… काल रात्री गेटमीटिंग करून आलाय… उठवू का?” तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला. “काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच?” “मास्तर.. कालच्या मीटिंगमध्ये काय ठरला संपाचा?” “नाही हो… मालक मागण्या मान्य करत नाही आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही, असे साहेबांचे म्हणणे…” “मास्तर.. यात आमी उपाशी रवलव… दोन वरसा झाली.. संप आज मिटात, उद्या मिटात म्हणून… खायचा काय?” “होय हो काका, मला का समजतं नाही! एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती…” “मग पुढे काय? सारंगअण्णा काय…
रश्मी परांजपे भाग – 3 मागील दोन लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. नीटनेटकेपणाची सवय शाळेमधे वर्गात गेल्यावर ताई-मावशी मुलांना बूट ठराविक ठिकाणी ओळीत ठेवायला शिकवतात. तसेच मुलांना आपले दप्तर घेऊन रांगेत बसायला शिकवतात. मुलांना अशा सवयी लागण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि ताई-मावशींना लक्ष देऊन बरीच मेहनत घ्यावी लागते. पण एकदा मुलांना अशा सवयी लागल्यावर मुलं सवयींचे तंतोतंत पालन करतात आणि हा मुलांचा खूप चांगला गुण आहे. पालकांनी मुलाला अशा सवयी घरी देखील लावाव्यात. त्याला बूट आणि दप्तर ठराविक ठिकाणी…
हर्षा गुप्ते निनाव साहित्य बेसन – 1 वाटी ओल्या नारळाचं दूध – अडीच वाटी गूळ पावडर – दीड वाटी वेलची पावडर साजूक तूप पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी – साधारणपणे 20 मिनिटे कृती नारळाच्या दूधामध्ये गूळाची पावडर घालून ठेवा. जेणेकरून गूळ लवकर विरघळेल. एक वाटी बेसन मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्या. मंद आचेवर भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गूळ मिश्रित नारळाचे दूध घालून ढवळत रहा. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळल्याने करपणारही नाही. त्यात नंतर वेलची पावडर आणि साजूक तूप घालायचे. यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची. कढईत खाली हलकेसे करपल्यावर निनावं एकदम खरपूस लागते. वाटीत काढून…
पराग गोडबोले बायको माहेरी गेली की, मी आणि माझी लेक आमचं दोघांचंच राज्य असतं घरात. तिने निगुतीने ठेवलेल्या घराचा पार बट्टयाबोळ करण्यात आणि मग ती आल्यानंतर तिच्या शिव्या खाण्यात आम्ही दोघेही आता निष्णात झालो आहोत… इतस्ततः विखुरलेले कपडे, लॉण्ड्री बॅगेत साचलेले कपड्यांचे बोळे, मोरीत पडलेली करवडलेली भांडी, चहाचा चोथा, ओसंडून वाहत असलेला केराचा डबा, धूळ… हे सगळं तिच्या स्वागताला तयार असतं, अगदी जय्यत! आमच्या मते आम्ही घर अगदी टापटीप ठेवलेलं असतं, पण तिच्या दृष्टीने मात्र घराची स्थिती म्हणजे गचाळपणाचा उत्तम नमुना असतो. दृष्टिकोनातला फरक, दुसरं काय? घराची ही स्थिति तर जेवणाची दुसरीच परिस्थिती, अत्यंत आगळी वेगळी. “डोंबिवलीत खंडीभर पोळी-भाजी केंद्रं…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥13॥ आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥108॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥109॥ तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होती जाती पाहीं । ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख ॥110॥ मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥14॥ एथ नेणावया…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 ऑगस्ट 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 03 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वितीया 12:34; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 27:49 योग : सिद्ध 12:05; करण : तैतिल 25:10 सूर्य : सिंह; चंद्र : सिंह 08:28; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 18:59 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस सामान्य असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु प्रत्येक अडचणीतून आयुष्यात काहीतरी नवीन शिकाल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक…
अनामिका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन. जन्माष्टमी संपताच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. बाजारपेठा गणपती बाप्पाच्या लोभस मूर्तींनी गजबजून जातात. सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्यामुळे बाजारपेठा उजळून निघतात. वातावरणात एक प्रचंड उत्साह आणि आनंद पसरतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनातील आवडती देवता म्हणजे गणपती. बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं. गणपतीचं रूप लोभसवाणं आणि मोहक आहे. लंबोदर, गोजिरवाणा हा बाप्पा भक्तांना हवाहवासा वाटतो. त्याच्या चार हातांतून शक्ती, बुद्धी, संपत्ती आणि धर्म यांचं संतुलन दिसतं. अंकुश आणि पाश हे इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतात. म्हणूनच…
सतीश बर्वे भाग – 3 पाहुण्यांच्या खोलीत राजेशची वाट बघत मी आणि सौरभ बसलो होतो. तिथे पोहोचल्यावर आमच्यासमोर एका शाळकरी मुलीने अदबीने पाण्याचे ग्लास आणून ठेवले आणि स्वतःची ओळख करून दिली. “नमस्कार मी ज्योत्स्ना. लांजेकरांची धाकटी मुलगी. बाबा येतीलच इतक्यात तुम्हाला भेटायला.” असं म्हणून समोरचा पडदा दूर सारून ती आतल्या खोलीत निघून गेली. त्या खोलीत लावलेली राजेशची पेंटिंग्ज मी बघत असताना अचानक पडद्याजवळ पावलं वाजली आणि तो एका बाजूला बांधला गेला. …आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अगदी समीप आला. ज्योत्स्नाने राजेशला व्हील चेअरवर बसवून त्या खोलीत आणलं. त्याला त्या अवस्थेत बघून मी आणि सौरभ सोफ्यावरून…
साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 ऑगस्ट 2025 प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष मेष राशीसाठी हा आठवडा खूप शुभ घटनांचा आहे. रवी स्वतःच्या सिंह राशीत आला आहे. मेष राशीच्या पंचमात सिंह रास आहे. मुलांकडून आनंददायी बातम्या मिळतील. तुमची कामासंबंधात एखादी कल्पना अमलात आणाल. कलात्मकतेला वाव मिळेल. गणपती बाप्पाचे आगमन आनंददायी ठरू शकेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये पाळा. महिलांनी स्वयंपाक करताना काळजी घ्यावी, नियोजन करून कामे करा. विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवू शकतील. चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा अशा संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांनी नक्की भाग घ्यावा. वृषभ या आठवड्यात घरी राहून काम करण्यास मिळेल (वर्क फ्रॉम होम), त्यामुळे कामाचा ताण…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा मग अर्जुनातें म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें । जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥91॥ तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥93॥ तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥94॥ तरी…
