Author: Team Avaantar

शोभा भडके भाग – 16 आरू आणि शिव एकमेकांच्या इतके जवळ होते… शिव अजूनही तिच्यावर झुकून तोंडावर हात ठेऊन, तिच्या डोळ्यांत हरवला होता. त्याला भानच राहिलं नव्हतं… आरुची अवस्था तर तिच्या समजण्यापलीकडे होती… त्याचा स्पर्श तिला रोमांचित करत होता… तिचं हृदय जोरजोरात धडधडत होत… जे होतंय ते सहन न होऊन, ती आता रडायच्या तयारीत होती. तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं… पण शिवला याचं भानच नव्हतं… तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यांत हरवला होता तो! त्याची ती रोखलेली नजर आणि त्याचा होणारा स्पर्श सहन न होऊन तिने एक दीर्घ श्वास घेत, डोळे मिटून, दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबत, जोरात त्याला…

Read More

माधवी जोशी माहुलकर वांगे बुरानी हा एक विस्मृतीत चाललेला पदार्थ आहे. बुरानी हा पदार्थ बहुतेक बिर्याणी या शब्दाचा अपभ्रंश असावा. कुठून कसा काय आला माहीत नाही, परंतु वांगे बुरानी हा एक अत्यंत चविष्ट असा भाताचा प्रकार आहे. फार कमी सामानामध्ये वांगे बुरानी तयार होते. आमच्या नागपुरच्या सरहद्दीवर लागून जी राज्यं आहेत, त्या प्रांतातील खूप लोक व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने नागपुरात येऊन स्थायिक झाले आहेत. वांगे बुरानी हा पदार्थ त्याच लोकांनी आपल्या खानपानातून लोकाांपर्यंत पोहोचवला असावा. बांधकाम व्यावसायाकरिता जे मजूर बालाघाट, मध्य प्रदेश, छिंदवाडा, गोंदिया अशा प्रांतातून येतात ते भाजी आणि भात खाऊन सकाळी कामावर जातात. करायला सोपा आणि कमी वेळात…

Read More

मेष हा आठवडा सर्वसाधारण आहे. छोट्या कामांमध्ये नोकरदारांचा भरपूर वेळ वाया जाईल. परिस्थितीशी समझोता करावा लागेल. पैशांच्या व्यवहारात गाफील राहू नका. व्यवसायात तडजोड केली तर फायदा होईल. अडचणी दूर होतील. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांना विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. वृषभ या आठवड्यातील सुट्टीचे दिवस मित्र-मैत्रिणींबरोबर घालवाल. नोकरदारांना सहकारी तसेच वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाच्या पद्धतीत बदल करून व्यावसायिक वर्ग उलाढाल वाढवू शकतो. कामानिमित्त परदेश प्रवास करू शकाल. घरात नातेवाईक, पाहुणे येतील आणि त्यांच्या स्वागतात महिलांचा वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. तसेच, कोणाचीही मस्करी करू नये, परिस्थिती…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रता: । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥25॥ मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले ॥355॥ अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥356॥ कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचीं परमदैवतें । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥357॥ तयां देहाची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥358॥ मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला । मनीं मी भाविला । वानिला वाचा ॥359॥ सर्वांगीं सर्वाठायीं ।…

Read More

दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती टीम अवांतर महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली गावी झाली. त्यांचे मूळ नाव नारायण सदाशिव मराठे. त्यांचे शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरूगृही झाले. 1895 मध्ये वाई येथे आल्यावर नव्य-न्यायाचे आणि शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन त्यांनी प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी केले. हेही वाचा – नेने सरांचा क्लास अन् कुंभकर्णी झोप! ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्‍मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत झाल्यानंतर 1901 मध्ये त्यांनी वाई येथे स्वतःची पाठशाळा…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 4 विजयाने माझ्याकडे पाहिलं मात्र… क्षणात ओळख पटली आणि ती जवळ जवळ ओरडलीच… “मनीष!” हॉटेलमधले गिऱ्हाईक एकदा माझ्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहात होते. मी मंद स्मित करत मान हलवली. “ये रे आत ये,” तिने वडे तळणाऱ्या बाईला गिऱ्हाईकाकडे लक्ष द्यायला सांगितले. मी आत गेलो. 28 वर्षांपूर्वी होतं तसंच घर होतं. ‘‘कधी इलस? माका ठावंक होता, एक ना एक दिवस तू माका शोधत येतलंसच, माझा मन माका सांगत होता.’’ ‘‘परवा आलो. आज या गावची जत्रा हे लक्षात होती. 28 वर्षांपूर्वी मी जत्रेला आलो होतो. पण तू इथे असशील असे वाटले नव्हते.’’ ‘‘अरे, मी गेली 10 वर्षा हयच…

Read More

तंदुरी पनीर कबाब साहित्य हेही वाचा – Recipe : कुरकुरीत मुरकू आणि चिडे कृती कुरकुरीत भेंडी साहित्य हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. विवेक वैद्य खूप जुनी गोष्ट. मी बारावीला बाहेरगावी शिकायला असताना फिजिक्सची (Physics) ट्युशन लावायची म्हणून मी चांगले सर शोधत होतो. (त्यावेळी क्लासेस (Classes) नसायचे) कोणीतरी मला नेने सरांचे नाव सुचवले. ते  रिटायर होऊन बरीच वर्षे झाली होती. ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि शिकवणीला मोजकेच विद्यार्थी घेतात असेही ऐकले होते. मी त्यांना भेटावयास गेलो. त्यांनी बरेच नियम सांगितले. दर आठवड्याला चाचणी घेतो, त्यात पास होणे जरूरी असते. जास्तीतजास्त प्रेझेंटी पाहिजे वगैरे अनेक मुद्दे होते. पण सगळ्यात त्रासदायक होती ट्युशनची वेळ. सकाळी सहाला शार्प ट्युशन सुरू व्हायची. ‘उद्यापासून ट्युशनला ये,’ असे म्हणाले. सगळे मित्र म्हणाले, ‘छान रे, तुला काही न विचारता…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥343॥ येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥23॥ आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥ तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥ पाहें पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥346॥ कां दहाहीं इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष मानसिकदृष्ट्या आज अस्वस्थ असाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो, म्हणून प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होऊ देऊ नका, एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण कराल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. घरी कोणी काही बोलले तर त्याबद्दल वाईट वाटू शकते, मात्र ते तुमच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. आज डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते, काळजी घ्या. वृषभ आज वातावरण अनुकूल असेल. कामावर सकारात्मक वाटेल आणि इतरांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीतील प्रलंबित काम पुढे सरकू शकते. चर्चा केल्याने नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. आर्थिक बाबींबाबत…

Read More