Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. आनंद नाडकर्णी यांची निधनाची वार्ता वाचली आणि खूप व्यथित झाले… आणि डोळ्यासमोर उभी राहिली, पालकांसाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आयोजित केलेली ‘पालक शाळा.’ वास्तविक, मी माझ्या मुलासाठी ‘मानस उपचार केंद्र’ – डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा माझा मुलगा आठवीत शिकत होता. त्याच्या बाबतीत शाळेतून आणि अर्थात, पालक म्हणून माझी एकच तक्रारन- ‘हुशार आहे, पण लिहिण्याचा अतोनात कंटाळा-आळस.’ हा प्रश्न सोडवायचा कसा म्हणून ही माझी या संस्थेला भेट ठरलेली होती. अनपेक्षित पणे 15 नोव्हेंबर 1995 रोजी पालकांसाठी असलेल्या पालक शाळेत मी दाखल झाले, केवळ कुतूहल म्हणून! हाच अनुभव मला आज डॉक्टरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्हाला सांगायचा आहे, तो…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥507॥ आणि हें तूंतें काइ पुसावें । येतुलालें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥508॥ तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु । म्हणोनिया निशाचरां केरु । फिटला सहजे ॥509॥ हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥510॥ जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥511॥ देवो निःसीमतत्त्व सदोदितु । देवो निःसीमगुण अनंतु । देवो निःसीमसाम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 मे 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 01 ज्येष्ठ 1948; तिथि : षष्ठी 06:24, सप्तमी 29:04; नक्षत्र : आश्लेषा 26:07; योग : वृद्धी 08:18; करण : गरज 17:38; सूर्य : वृषभ; चंद्र : कर्क 26:07; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:07; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाष्यकार विष्णू वामन बापट टीम अवांतर शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार विष्णू वामन बापट यांचा जन्म 22 मे 1871 रोजी कोकणातील धालवल…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ करताना टिप्स वापरून पाहा. पुलाव सुशोभित करण्यासाठी वरून खोवलेले किंवा किसलेले खोबरे, तळलेले कांदे, तळलेले फ्लॉवरचे तुकडे, कांद्याच्या गोल चकत्या, गाजराचा वाफाळलेला किस, बटाट्याच्या काचऱ्या, मैदा आणि मावा मिसळून तळलेले लहान लहान गोळे इत्यादींचा उपयोग करावा. डिश छान दिसते. मसालेभात करताना तिखट हवे असेल त्या प्रमाणात आलं, हिरवी मिरची, काळी मिरी आणि भरपूर कोथिंबिरीसह वाटण तयार करावे. भाताला उकळी आल्यावर त्यात वाटण, गोडा मसाला आणि चवीपुरती साखर घालावी. (वाटण फोडणीत परतू नये) मसालेभाताला सुंदर रंग…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळां । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालां समयीं ॥495॥ जे वेळीं हो लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥496॥ पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥497॥ म्हणोनि आजि तरी भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें नलगे । माझां जीवीं ॥498॥ तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्ष तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥499॥ हा…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 मे 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 31 वैशाख शके 1948; तिथि : पंचमी 08:26; नक्षत्र : पुष्य 26:49; योग : गंड 10:58; करण : कौलव 19:20; सूर्य : वृषभ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:07; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गुरुपुष्यामृत योग वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हिंदी कवी, लेखक शरद जोशी टीम अवांतर हिंदी कवी, लेखक आणि उपहासकार शरद जोशी यांचा जन्म 21 मे 1931 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. त्यांनी काही…
डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील विशाल क्रीडांगणे, वेगवेगळ्या वस्तूंचे बाजार, तारांगण, मत्स्यालय, कृषीप्रदर्शने, मोठमोठी धरणे, बगीचे, संग्रहालये आणि त्यातील विविध दुर्मीळ वस्तू, कारखाने, इमारतींच्या तसेच यंत्रांच्या प्रतिकृती, सुंदर चित्रे, चित्रपट, नकाशे, जाहिराती आणि त्यांचे फलक, बघायला आवडते. कारण यासारख्या असंख्य मानवनिर्मित गोष्टींमुळे मानवी जीवन अत्यंत विकसित आणि समृद्ध झाले आहे. अशा जीवनाला समृद्ध करणाऱ्या कोणत्या गोष्टी करता येतील, याची कल्पना करणाऱ्या तसेच नंतर प्रत्यक्षात त्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असायला हवी, कारण या व्यक्तींमध्ये अत्यंत विकसित अशी अवकाशीय बुद्धिमत्ता असते. आपल्या शाळेतही ज्यांच्यात प्राधान्याने ही बुद्धिमत्ता आढळते…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥483॥ नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥484॥ तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥485॥ तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कापिन्नलें । सर्वांग तयाचें ॥486॥ सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥487॥ तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्ही ॥488॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 30 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्थी 11:07; नक्षत्र : आर्द्रा 06:11, पुनर्वसू 28:11; योग : शूल 14:10; करण : बव 21:42; सूर्य : वृषभ; चंद्र : मिथुन 22:38; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ पांडुरंग दामोदर गुणे टीम अवांतर प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्यसमीक्षक असणाऱ्या पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म 20 मे 1884 रोजी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे झाला.…
सुरळीच्या वड्यांची रेसिपी साहित्य चण्याचे पीठ – एक वाटी मैदा – एक चमचा आंबट ताक – पाऊण वाटी पाणी – दोन वाट्या ओले खोवलेले खोबरे – एक वाटी तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार हळद – एक चमचा चिरलेली कोथिंबीर – एक वाटी हिरवी मिरची – 2 फोडणीचे साहित्य कृती ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा त्यात घालावा. पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ तसेच हळद घालावी आणि पीठ शिजावयास ठेवावे. शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंदाग्नीवर दोन वाफा येऊ घ्याव्यात. यादरम्यान फोडणी करून…
