Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दिलीप कजगांवकर “सर, ओळखलंत का मला?” सदानंद सरांच्या घरात शिरत राजने विचारले. “राज, अरे शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी ना तू, तुला कसे विसरणार मी! तू कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस? लग्न केलंस का? बायको कुठली? मुलं किती?” “अहो, किती प्रश्न विचारता? तुम्ही तोंडी परीक्षा घेताहेत का? राज तुमचा माजी विद्यार्थी आहे आणि तुम्ही देखील निवृत्त झाला आहात…” सावित्रीबाईंनी सरांना वास्तवाची जाणीव करून दिली. “सर, मी पुण्याला एका आयटी कंपनीत काम करतो. तीन वर्षे अमेरिकेत होतो. एका मित्राच्या लग्नासाठी काल इथे नाशिकला आलो. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आज मुद्दाम थांबलो… सर, एक विचारू?” “विचार ना. प्रश्न विचारण्याची तुझी सवय…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. जून भाज्यांचा वापर, भज्यांची भाजी आणि भरली कारली बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविताना हे करू पाहा तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. किशोर महाबळ गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो. ज्या विद्यार्थ्यांना गणित चांगले येते त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही, अशांना कायम कमी लेखले जाते. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि तो आयुष्यभर टिकून राहतो. त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या पुढील शिक्षणावर होतात. शिक्षणतज्ज्ञांच्या मते अभिनव आणि मनोरंजक पद्धतीने शिकविल्यास इयत्ता 10 वीपर्यंतचे गणित सर्व विद्यार्थी सहजगत्या शिकू शकतात. यासाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नव्या अभिनव पद्धती शिकाव्या लागतील. मात्र, असे न करता काही विद्यार्थ्यांना गणित येणारच नाही, असा शिक्षकांचा समज होतो आणि पालकांनाही तसेच वाटू लागते. परीक्षेत तर गणित विषय असतोच. मग विद्यार्थ्याला गणितात…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढां चंद्रुही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजें ॥379॥ तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे ॥380॥ यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करूनी ॥381॥ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥26॥ मग निस्सीमभावउल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ आवडे तैसे । भलतयाचें हो ॥382॥ भक्तु माझियाकडे दावी । आणि मा दोन्हीं हात वोडवी । मग देठुं न फेडितां सेवीं । आदरेंशी…
दर्शन कुलकर्णी धूलिवंदन खग्रास चंद्रग्रहण करीदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा टीम अवांतर भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये झाला. भारताचे पहिले उद्योगपती म्हणून देखील ते ओळखले जातात. जमशेदजी टाटा यांनी मुंबईत येऊन वयाच्या 14 व्या वर्षी एका छोट्या व्यवसायातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून कॉलेजने त्यांना भरलेली पूर्ण फी परत केली होती. 1858 मध्ये पदवीधर होऊन वडिलांच्या व्यवसायात ते सह्भागी झाले. त्यावेळी इंग्रज सरकारने 1857 चा उठाव मोडून काढला होता. टाटांनी अशा…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तशी मावशी जवळ जवळ सगळ्यांना असते. मला सख्खी मावशी नव्हती… पण एक अगदीच जीवाभावाची मावशी मात्र मला होती. खरंतर, प्रत्येक जीवाला किमान एक आत्या आणि एक मावशी असायलाच हवी. तशी माझी ताई मावशी! ताई मावशीच्या घरी राहायला जायचं म्हणजे कोण अप्रूप. कॉटनग्रीन! हे नावच मला भारी वाटायचं. बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे क्वार्टर होते. परिसरात एकसारख्या दिसणाऱ्या सर्व बिल्डिंग… गार्डनही होतं. हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना! ताई मावशींनी केलेलं कौतुक खूप छान वाटायचं. काका पण किती मस्त होते. गप्पा टप्पा चालायच्या. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.…
पराग गोडबोले एका लग्नाला जायचा नुकताच योग आला. कार्यालयात रंगीबेरंगी वातावरण. वेगवेगळे वेष परिधान केलेले असंख्य परिचित, अपरिचित चेहरे आणि त्यात अलगद सामावलेले आम्ही… वातानुकूलनाचा हवाहवासा गारवा, बऱ्याच जणांची आणि जणींची चाललेली निर्हेतूक लगबग लगबग… अगदी सगळ्याच लग्नांमध्ये असतं तसं मंगल आणि मोहक वातावरण… समोर आलेला लिंबू सरबताचा, उन्हातून आल्यानंतर हवाहवासा वाटणारा घोट… नवे कोरे कपडे आणि त्यांचा तो विवक्षित गंध. पोरांची पळापळ आणि हे सगळं बघणारा तटस्थ मी… बसून बसून कंटाळा आल्यानंतर, एक चक्कर रुखवतापाशी… संसारोपयोगी विविध वस्तू बघताना, आमच्या लग्नाच्या वेळच्या रुखवताची पण आठवण येत गेली. जवळपास तसाच जामानिमा आणि त्याच भावना! असा टंगळमंगळ करण्यात तासभर गेल्यानंतर, घटिका…
सतीश बर्वे खरंतर, आजकाल अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन उचलण्याचे मी कटाक्षाने टाळतो. पण का कोण जाणे, गेल्या आठवड्यात असाच अवेळी आलेला एक फोन मी उचलला आणि आजवर मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडलेल्या एका गोष्टीचा शेवट गोड झाला. त्याचं असं झालं… समोरून आवाज आला… “मी कौस्तुभ सावरकर बोलतोय. महत्प्रयासाने तुमचा नंबर मिळाला काल रात्री उशिराने. म्हणून आज सकाळी जरा लवकरच फोन केला आहे मी…” पुढे कौस्तुभने जे सांगितले ते सगळं अविश्वसनीय होते… त्याचा सासरा निनाद अभ्यंकर आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला एका नामांकित औषधी कंपनीत नोकरी करत होतो, जी नोकरी निनादला काही वर्षांनी नाईलाजाने सोडायला लागली होती. निनादला कॅन्सर झाला होता. तो…
सुधीर करंदीकर मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लासला सोडणे / आणणे वगैरे याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिसमधून घरी आले की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण 6 – 6.30 ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कूटरने असते. कधी-कधी बायको बावधनहून स्कूटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसने आणि पुढचे पायी जातो. एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेनवीण सौरसु नाहीं । मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥367॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥368॥ अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥369॥ पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥370॥ तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥ करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 89
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 501
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
