Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 17 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 22:54; नक्षत्र : भरणी 20:02 योग : वज्र 21:32; करण : वणिज 12:37 सूर्य : कन्या; चंद्र : मेष 25:23; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिकांना लहान प्रवासाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 1 मी माझ्या केबिनमध्ये बसून उद्याचा अग्रलेख लिहित होतो, यावेळी मी कुणाचाही फोन घेत नाही, पण माझ्या असिस्टंटने मला कळवले, फक्त संपादकासाठी म्हणून परदेशातून एक फोन आला आहे… मी चडफडत फोन उचलला. पलीकडून एका स्त्रीचा आवाज होता… “नमस्ते, प्रवीण बाबू बात कर रहे हैं क्या?” “हां, आप कौन और किधर से बात कर रही हैं?” “प्रवीण बाबू, मैं अमला शेख, दुबई से बात कर रही हूं…” “अच्छा, लेकिन मेरे पास आप का क्या काम है?” “प्रवीण बाबू, मैंने पता किया हैं, कि आप कोल्हापूर के सबसे मशहूर अखबार वाले हैं, मैं आप की बहन जैसी हूं…”…

Read More

माधवी जोशी माहुलकर भाग – 1 खरंतर, जीवन आणि मृत्यू या दोन घटनांवरच मनुष्य आपल्या आयुष्यातील आराखडे तयार करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानातील सुखाचा विचार कधीच करत नाही, त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण जगण्यातला आनंद गमावतो. एखाद्याचे जगणे लक्षात राहते नाहीतर, मरणे लक्षात राहते! परंतु यामध्ये एखादी घटना जर अचंबित करणारी असेल तर, ती मात्र कायमची लक्षात राहते. त्यावरच आधारीत ही गोष्ट आहे. एक गाव होते. त्या गावातील चार-पाच सधन घर सोडली तर, इतर लोक साधारण परिस्थितीतील किंवा शेतकरी कुटुंबातील होते. त्या गावामध्ये अठरापगड जातीची लोक राहात होती. त्यामुळे गावाचा भांडणतंट्याचा निवाडा तिथल्या पंचायतीच्या सहाय्याने होत असे.…

Read More

मनीषा गोगटे दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळ तयारीतील पहिला पदार्थ म्हणजे अनारसा! कारण त्याला करण्यास जास्त दिवस लागतात. साहित्य जाडे तांदूळ – अर्धा किलो (ज्याचा भात मोकळा होतो, असा कोणताही जुना तांदूळ) गूळ – तांदूळ पिठीच्या निम्म्या प्रमाणात पातळ साजूक तूप – साधारणपणे दीड टेबलस्पून खसखस – साधारणपणे दीड टेबलस्पून केळे किंवा दूध – अगदी किंचित तेल – अनारसा तळण्यासाठी हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक कृती तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवसांसाठी भरपूर पाण्यात भिजवून ठेवायचा. पाणी रोज बदलून नवीन पाण्यात तांदूळ भिजवावेत. यामुळे तांदळाला आंबूस वास येत…

Read More

हिमाली मुदखेडकर नणंदेच्या मुलाचे लग्न ठरले आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा जालन्याला जाण्याचा योग आला. लग्न तर एन्जॉय करायचेच आणि आरामही! असा सुटसुटीत कार्यक्रम ठरवून जालन्यात पाऊल ठेवले. नणंदेकडे पाहुण्यांचे उधाण आले होते… अगदी उत्सवाचे वातावरण… सनई चौघडे… सगळेच अगदी साग्रसंगीत! या सगळ्यात हिची मधे मधे लुडबुड सुरू होतीच… पण तिला कुणी फारसे महत्त्व देत नव्हते, उलट हाडतुडच येत होती बिचारीच्या वाट्याला… “सुले… काय तुझं इथे? हो बाजूला…” कुणीतरी वसकन ओरडले तिच्यावर… तशी ती तणतणत बाजूला झाली आणि रागात निघून गेली. ‘सुलू…’ हिला मी विसरलेच होते. तसं तिला लक्षात ठेवावं, असा तिचा माझा फारसा सहवासही नव्हताच. तिची माझी पहिली भेट…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा श्री भगवानुवाच : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥5॥ तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥ तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥42॥ मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । ते समस्तही…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 16 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 26:22; नक्षत्र : अश्विनी 22:45 योग :  हर्षण 25:32; करण : तैतिल 16:08 सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:23 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी विचार आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करा. विचार न करता खर्च करणे किती नुकसान करणारे असते याचा प्रत्यय येईल. व्यावसायिकांना…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार रणांगण वाचायला घेतली तेव्हा प्रथम अर्पण पत्रिका पाहिली ‘_ मादमायसेल रोला यांस.’ ही कोण? प्रश्नच पडला. मी जेव्हा ही कादंबरी वाचली त्यावेळी गुगलून उकल करण्याची सोय नव्हती. विश्राम बेडकर यांची ‘रणांगण’ कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड समजली जाते. यावर इतक्या समीक्षा आहेत की, समीक्षांचे संकलन पुस्तक रूपाने होऊ शकेल. प्रतिक्रिया सर्व प्रकारच्या आहेत… ॲसिडिक न्यूट्रल अल्कलाइन! अत्यंत टुकार ते मराठीत यानंतर असे कादंबरी लेखन झालेच नाही इथपर्यंत… मी दोन्ही मतांशी सहमत नाही! पहिले महायुद्ध संपलेले असते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे असते, तेव्हा हे कथानक घडते. त्यावेळी विमान प्रवास फारसा नसल्याने बोटीनेच प्रवास केला जात असे.…

Read More

सतीश बर्वे अलीकडेच, 1 ऑक्टोबरला सकाळी मार्केटला चाललो होतो, तेव्हा अचानक मागून आवाज आला, “ओ दादा…” मी मागे वळून पाहिले तर, एक चिमुरडी हातात झेंडूच्या फुलांचे तोरण घेऊन उभी होती… जमिनीवर ठेवलेल्या तिच्या टोपलीत झेंडूच्या फुलांची बरीच तोरणं व्यवस्थितपणे ठेवलेली होती. “ले लो ना दादा…” तिचा आर्जवी स्वर… “आपका डान्स भी देखती हूं मै रोज!” तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो… मला एकदम आठवलं, आमच्या नवरात्र मंडपाच्या पुढच्याच चौकात आंध्र प्रदेशातून आलेली बरीच कुटुंब रस्त्याच्या कडेला चादर अंथरून त्यावर झेंडूच्या फुलांची मोठी रास ओतून तोरणं करत असतात दिवसरात्र. चिल्लीपिल्ली मुलं देखील मोठ्या माणसांना जमेल तशी मदत करत असतात… हेही…

Read More

कामिनी व्यवहारे केळफुलाची स्वादिष्ट भाजी तयार होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही असेही आहेत, ज्यांना या केळफुलाची माहिती नसेल. केळ्यांच्या घडाने आकार घेतला म्हणजे त्याच्या टोकाला असलेले केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेवटच्या फणीपासून थोड्या अंतरावर कापून काढून घेतात. त्याच केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो. शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्यांचे वजन वाढते. आरोग्याच्या दृष्टीने केळफूल फायदेशीर आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. यात फायबर, प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्व असते, असे तज्ज्ञ सांगतात. याच केळफुलाचे खमंग वडेही तयार करता येतात. पाहूयात त्याची रेसिपी – पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य…

Read More