Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि संधी दोन्ही घेऊन येईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात प्रगती होईल. कामावर तुमची कामगिरी लक्षात घेतली जाईल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये मोकळेपणाने राहणे महत्त्वाचे आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वृषभ – काम थोडे संथ गतीने चालेल, पण तुमचा संयम तुमची ताकद बनेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबात शांततेचे आणि खेळीमेळीचे वातावरण असेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. एखादी मोठी खरेदी करायची इच्छा होईल पण बजेटनुसार निर्णय घ्या. मिथुन – तुमचे संवाद कौशल्य विशेषत्वाने बहरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचा आदर केला जाईल.…
नितीन फलटणकर (भाग – 1) प्रसंग 1 स्टेजवर लख्ख प्रकाश…. खोलीत पसारा पडलेला…. बेडवरील चादर आर्धी खाली लोळतेय तर अर्धी बेडवर… पंखा सुरू… टीव्हीही सुरू…. पण तिथे मात्र कोणीच नाही… तितक्यात बाहेरून केतन आणि त्याचा मुलगा किरण दोघांचाही प्रवेश… केतन : हातपाय धुवून घे… कपडे बदल मी जेवायला वाढतो. किरण : नको मला… भूक नाही. मी डबा खाल्लाय शाळेत. केतन : रहा उपाशी… (किरण धावत आत जातो… ताटात भाजी-पोळी वाढून घेतो. पटापट खायला लागतो.) किरण : तू रागावू नको ना बाबा…! केतन : मी रागोवलेलो नाही. पण तुला एंटरटेन करायला मला मुळीच वेळ नाही. पटकन खा. काही हवं का सांग,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥11॥ तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥163॥ जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥164॥ जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥ अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसीं रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥ जया आड जातां…
दर्शन कुलकर्णी मार्गशीर्ष मासारंभ देव दीपावली वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचा ताण वाढेल. थोडी हुशारी दाखविली तर, हा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी झालेल्या वादविवादामुळे त्यांची नाराजी वाढू शकते. वरिष्ठांकडून स्पर्धक निर्माण केले जाऊ शकतात. अशा स्थितीत नकारात्मक विचारांना मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. वृषभ – आजचा दिवस एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देणारा असेल. नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही. मात्र कठोर परिश्रम तुम्हाला नवीन काम लवकर पूर्ण करण्यास मदत करतील. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. आरोग्य…
मयुरेश गोखले ढग गहिवरून आले होते… कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होणार होती… श्रीरंगने लाल शर्ट घातला होता, जो तिने गिफ्ट म्हणून आणला होता. शर्टची बाही फोल्ड करता करता श्रीरंगला आठवले की, तिला श्रीरंगाची शर्टची बाही फोल्ड करण्याची स्टाईल खूप आवडायची! त्याने घड्याळ घातले, ते तिने त्याला वाढदिवसाला गिफ्ट केले होते. घड्याळ, पर्स, कंगवा, गॉगल… श्रीरंगच्या वापरात असणारी प्रत्येक गोष्ट तिनेच प्रेमाने आणली होती. श्रीरंगला तिची आठवण येताच तो भूतकाळात गेला… सहज घडलेल्या भेटीचे प्रेम कधी झाले, ते दोघांना कळलेच नाही. खूप भेटी झाल्या, कितीतरी सूर्यास्त दोघांनी सोबत अनुभवले. कधी भांडले, रुसले, अबोला धरला… पण त्यातही प्रेम होतं. घरच्यांनी पण लग्नाला…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : …तर सामोसे खुसखुशीत होतात! हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना…. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
गजानन देवधर सन 2005 सालचं कोकण मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरवायचं ठरलं. ठाण्याचे माजी खासदार आणि ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे प्रमुख भूमिकेत होते. संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध पत्रकार माधव गडकरी! एके दिवशी सतीश प्रधानांनी मला बोलावून विचारलं, “सर, संमेलनात तुम्ही सहभाग कसा घेऊ शकाल?” मी क्षणभर गोंधळलो. मी साहित्यिक नाही, पण मराठी साहित्य वाचन मात्र मनापासून आणि भरपूर केलं होतं. लगेच विचार मनात आला – ‘माझा छंद छायाचित्रण, आणि हा साहित्यमहोत्सव… दोन्हींची सांगड घालता आली तर?’ मी प्रधानांना सांगितलं – “आपल्याला ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर छायाचित्रांचं प्रदर्शन भरवता येईल.” कल्पना त्यांना आवडली. कोकणात प्रत्यक्ष फिरून फोटो काढावे लागतील…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आतां आरंभींच यया फळेल । म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥151॥ ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥152॥ तेथ प्रवृत्तितरूचा बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी ॥153॥ पैं योगिवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाचां पाउलीं । धोरणु पडिला ॥154॥ तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें…
दर्शन कुलकर्णी अमावस्या समाप्ती – दुपारी 12:16 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मित्रांच्या सहकार्याने व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील. मोठ्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल. एखादा नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता. सरकारी क्षेत्रात तुम्हाला फायदे मिळतील. उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जुने तणाव संपतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. वृषभ – नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस चांगला असेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून काही लाभ मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही राहाल. मात्र, बोलण्यावर संयम ठेवा.…
दीपक तांबोळी आरवने घड्याळात पाहिलं. सकाळचे आठ वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं, पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरू होईल, असं त्याला वाटत होतं. “आरव आंघोळ करून घे रे…” किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय, हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यांत कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आज कुणीतरी येईल, ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ…
