Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नेहा नाडकर्णी हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी आपली कारकीर्द एडिटर म्हणून सुरू केलं, पण आपल्या सर्वांना ते जास्त परिचित आहेत ते दिग्दर्शक म्हणून… हृषिकेश मुखर्जी! 1957 ते 1998 या आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी निखळ मनोरंजन करणारे एकापेक्षा एक असे तब्बल 42 चित्रपट दिग्दर्शित केले. आमच्या पिढीतील, आमच्या आई-बाबांच्याही पिढीलाही आनंद देणारे हे चित्रपट होते. जे काही करायचे ते सर्वोत्तमच एवढाच ध्यास हृषिदांचा होता…! प्रत्येक चित्रपट एक मध्यमवर्गीय मूल्य असलेला, कुठलाही अभिनिवेश न बाळगता स्त्री-स्वातंत्र्याचे विचार, सर्वसामान्यांच्या मनातील विविध गंड यावर भाष्य असलेला… चित्रपटातील खलनायक म्हणजे परिस्थिती, मोह, राग, अहंकार हेच. चित्रपट बघताना लहान-मोठे सगळे एकत्र बसून बघू शकतील…
नितीन फलटणकर मनोहर यांनी आज जरा उशिरानेच डोळे उघडले होते. रोज पहाटे 5 वाजता उठून फिरायला जाणे, हा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी घडाळ्याकडे पाहिले. 8 वाजले होते. अंगात जरा कणकण वाटत असल्याने ते तसेच पलंगावर कुस बदलत विचारात मग्न होते. आज आपण उठूच नये, असे त्यांनी मनाशी ठरवले. पण नळाला पाणी आल्यावर उठावेच लागणार, या विचाराने त्यांचा मूड गेला. आतापर्यंत त्यांचे उशीवर डोके होते, आता त्यांनी डोक्यावर उशी घेतली. चादरीचा माग घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला खरा, पण इतकावेळ त्यांच्या पायाशी निपचीत पडलेली चादर त्यांच्यापासून जणू दूर जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या थाटात अर्धी पलंगावर तर अर्धी खाली घसरली होती. दोन-तीन वेळा मनोहर…
शैलजा गोखले थंडीच्या दिवसात बाजारामध्ये ओल्या लाल मिरच्या विकायला सुरूवात होते. या मिरच्यांचा ठेचा किंवा रंजका चवीला अतिशय उत्तम लागतो. दिसायलाही रंगामुळे आकर्षक वाटतो. पावभाजीच्या भाजीत यातला थोडासा ठेचा घातलात तर, आणखी चव येते. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : साधारणपणे अर्धा तास शिजवण्याचा वेळ : मिक्सरमधून फिरवायला 3 ते 4 मिनिटे एकूण वेळ : 35 मिनिटे कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या…
गजानन देवधर पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 12 ऑक्टोबर 2008 रोजी कॉमनवेल्थ यूथ गेम्सचे भव्य उद्घाटन होणार होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या तत्कालीन Queen’s Baton Relay प्रमाणेच, या वेळेस Youth Baton Relay ही नवी संकल्पना अमलात आणली जाणार होती. बॅटन रिले ही केवळ औपचारिक धाव नव्हे, तर तिच्यामागे शिस्त, नियोजन आणि प्रत्येक टप्प्यावर असणारी जबाबदारी, यांचा एक अखंड प्रवास असतो. त्या काळी मी शिकवत असलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष होते आणि बॅटन रिले ऑर्गनायझिंग कमिटीचे चेअरमनही होते. बॅटन रिलेची सुरुवात दिल्लीपासून होऊन नऊ राज्यांतून, तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास करत 190 गावांतून जात ती बालेवाडी, पुणे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाच नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥15॥ पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥ पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥81॥ तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरीं । ते अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥82॥ ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।…
दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी गोपाष्टमी कुष्मांड नवमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या नवीन संधी निर्माण होतील. प्रवासाचीही शक्यता आहे. नवीन योजनांमुळे फायदा होईल. तथापि, घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. हवामान बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीसोबत आहाराचीही काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून, जुन्या मित्रांकडून किंवा नातेसंबंधांमधून फायदा होऊ शकतो. शेअर्स आणि मालमत्तेतील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. भागीदारी व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल असेल. कौटुंबिक समस्या देखील डोकं वर काढतील. मिथुन – कामाच्या ठिकाणी काही अडचणी…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
दीपक तांबोळी ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून मी वळलो, तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं… “काय सुऱ्या, कसं काय चाललंय?” मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश ऊर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गॉगल… टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार. “नको लपवू सिगरेट. मी पाहिलंय तुला पिताना…” मी म्हटलं तशी हातातली सिगरेट त्याने दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला, “सॉरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥67॥ जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । सांगे कथा ॥68॥ हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥ मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥70॥ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 07 कार्तिक शके 1947; तिथि : सप्तमी 09:22; नक्षत्र : उत्तराषाढा 17:28 योग : धृति 07:50; करण : विष्टी 21:49 सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसाची सुरुवात योग साधनेने केली तर, संपूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्याचा मोठा फायदा मिळेल. टॅक्स न भरणारे…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 250
- अवांतर 177
- आरोग्य 94
- पंचांग आणि भविष्य 364
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 187
- मैत्रीण 17
- ललित 517
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
