Author: Team Avaantar

चंद्रकांत पाटील पांडू साधारण वय 60 आणि वजन 55 किलो… नुसता हाडाचा सापळाच, खरडून काढलं तर अंगावर चमचाभर सुद्धा मांस निघायचं नाही, अशी शरीर रचना. आत गेलेले गाल, पैलवान टाईप केसाचं कटिंग… तंबाखूच जबरदस्त व्यसन, जरा बसलं की, तंबाखू मळायची, ती तोंडात धरायची आणि पिचकार्‍या मारत बोलायची सवय. बोलताना गळ्यात तुळशीची माळ हालायची… पण, अस्सल शिव्यांशिवाय बोलायचा नाही. डोक्यावरचे केस ‘गोदरेज पावडर’नं डाय केलेली, गुळगुळीत दाढी आणि जाड मिशीचा कट. धुतलेला पांढरा नेहरूशर्ट, वरची दोन बटणं रिकामी आणि पांढरी विजार… कायम ‘बिझी’ एकतर मोबाइलवर असणार नाहीतर, तंबाखू मळत दिसणार! बुडाखाली जुनी होंडा स्पेलंडर… पांडू तात्या आमच्या जुन्या वाड्यातला मेंबर, आमचा…

Read More

कामिनी व्यवहारे भारतात सर्वत्र सुरणाची भाजी केली जाते. सुरणाच्या औषधी गुणांमुळे ‘सर्वेषा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते।’असे भावप्रकाशात म्हटले आहे. याचा अर्थ सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे. त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे. सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत. त्याच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप-कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात. पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य तयारीसाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे शिजण्यासाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे एकूण…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥36॥ एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥421॥ परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥422॥ या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चल होईल काईं । कैसेनि सांगें ॥423॥ म्हणोनि मनाचा निग्रह होये ।…

Read More

दर्शन कुलकर्णी धनुर्मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी घाई केल्यास गोष्टी बिघडू शकतात. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दूर राहणारा कुटुंबातील एखादा सदस्य आज अचानक येऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. पालकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. वृषभ – दिवस सकारात्मक असेल. एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. कुटुंबातील एखाद्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. आज संततीच्या करिअरबद्दल वाटणारी चिंता कमी होईल. प्रगतीतील अडथळे दूर होतील. एखाद्या पिकनिकची योजना आखू शकता. कार्यालयात काम करताना, मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. मिथुन -…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात एक बाई आली, ‘मोठा मम्मी’! थोडंस वेगळं नाव. एका मराठी सिनेमाचं शूट करत होते… नगर जिल्ह्यातील एका खेडे गावात. एकंदरीत सगळ प्रकरण ‘धन्यवाद’ होतं. नावाजलेले दिग्दर्शक असूनही खूप वाईट पद्धतीने काम चाललेलं. बरं, प्रोड्युसरची वांग्याची शेती होती. त्याने हॉटेलवर पोतभर वांगी आणून ठेवली होती. सकाळ, संध्याकाळी फक्त वांग्याची भाजी! चला, मला वांगी आवडतातच. पण तिथला आचारी म्हणजे वांग्याचं ‘होळकं’ बनवायचा. ते तिखट जेवण मी अजिबात खाऊ शकत नव्हते… दुसर तिथे काहीच मिळत नव्हतं! तिथे मुंबईहून एक थोड्या वयस्कर बाई आल्या होत्या… उंच, धिप्पाड, गोऱ्यापान, सुंदर आणि हसतमुख. अर्थात, मी…

Read More

दिलीप कजगांवकर मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण… मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. “राज किती खर्च करतोस आमच्यावर?” न राहवून आई-बाबांनी विचारले. “दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला…” राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न आईने…

Read More

माधवी जोशी माहुलकर वजन मेन्टेन करण्याकरिता व्यायामासोबतच डाएटही महत्त्वाचे आहे. वेट लॅास करण्यासाठी तेल, तूप बटर न वापरता मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण) खूपच फायदेशीर ठरते. हे सूप चवीला अतिशय सुरेख आणि पौष्टिक आहे. हे कढण वाटलं तर मऊ भातासोबत खाऊ शकता किंवा वाटीने नुसते पिऊ पण शकता. चॅाईस तुमचा! साहित्य हेही वाचा – Recipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी कृती हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते! टिप्स एकूण कालावधी – साधारणपणे अर्धा तास तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या…

Read More

पराग गोडबोले “आई, या फॉर्मवर इथे सह्या कर,” असं सागर म्हणाला आणि मी यंत्रवत ओढली गेले त्याच्याकडे. खरंच, गेल्या काही दिवसांत किती पोक्त आणि समंजस झाला होता माझा बंब्या! पेन दिलं त्याने मला आणि तो म्हणेल तिथे, अगदी मुकाट्याने सह्या केल्या मी… माझं झाल्यावर नीलेशची पाळी. त्याच्या पण सह्या घेतल्या त्याने आणि आम्हाला थांबायला सांगून निघून गेला, आत कुठेतरी… दहाच मिनिटांत आला परत आणि म्हणाला, “चला माझ्या सोबत.” आम्ही दोघे त्याच्या मागोमाग पोहोचलो एका साहेबांच्या समोर…, आणखी काही सह्या केल्या, एकमेकांना हार घातले आणि काम फत्ते! साहेबांनी आमचं अभिनंदन केलं. सागरने स्वतः आम्हा दोघांना पेढे भरवले आणि हसत हसत म्हणाला,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा अर्जुन उवाच – योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥33॥ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिवि सुदुष्करम् ॥34॥ अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥411॥ हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥412॥ म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी…

Read More

दर्शन कुलकर्णी सफला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे उत्साह आणखी वाढेल. परंतु, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तब्येत बिघडू शकते. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. मनावर नियंत्रण ठेवा, अन्यथा महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येणार नाही. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे. वृषभ – सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु, या सोबतच दान-पुण्य करावे. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. मिथुन – मौज, मस्ती, मजा…

Read More