Author: Team Avaantar

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥ मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥429॥ एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगो किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥ अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहावा ॥431॥ कां रूपे वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥432॥ कणेंविण सोपटें । कणसें लागलीं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार रवी टीम अवांतर हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संगीतकार रवी यांचा जन्म 3 मार्च 1926 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रविशंकर शर्मा. खरंतर त्यांना पार्श्वगायक व्हायचे होते. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत असताना ते हार्मोनियम आणि गाणे शिकले. 1950 साली गायक होण्यासाठी ते मुंबईला आले. दोन वर्षे संघर्ष करत राहिले. 1952 मध्ये हेमंत कुमार यांनी त्यांना ‘आनंदमठ’ या चित्रपटात ‘वंदे मातरम’ गीतात कोरसमध्ये गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांची योग्यता ओळखून हेमंत कुमार यांनी त्यांना सहाय्यक म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले. दोन-तीन वर्षांनंतर हेमंत कुमार यांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला दिला…

Read More

मधुर कुलकर्णी मराठी अवॉर्ड फंक्शनची रात्र! नवीन अभिनेते आणि अभिनेत्री फोटोग्राफरना पोजेस देण्यात व्यग्र होते. उंची वस्त्र, उंची परफ्यूम आणि ‘हाय’, ‘हॅलो’ने वातावरण ग्लॅमरस झाले होते. त्या सगळ्या गोंगाटातून दूर,अंतरा जरा आडोशाला उभी होती. इतक्यात नवीन अभिनेत्री तनया अंतराजवळ आली. तिने वाकून अंतराला नमस्कार केला. “अंतराताई, मी तुमची फॅन आहे. तुमचा अभिनय मला खूप आवडतो. मी लहान असल्यापासून तुमचे सगळे सिनेमे बघितले आहेत. तुम्ही अभिनयाची कार्यशाळा आहात.” “ओह! थँक्स!” किती दिवसांनी कोणाचे तरी कौतुकाचे शब्द अंतराच्या कानावर पडत होते. फोटोग्राफर कॅमेरा घेऊन आले, तशी तनया पोज द्यायला गेली… आकाश येताना दिसला आणि अंतराला हायसं झालं. “अशी एकटी का उभी आहेस?”…

Read More

प्रणाली प्रशांत वैद्य भाग – 15 सुनंदा निघून गेल्यावर प्राजक्ता खिडकीजवळ येऊन उभी राहिली. तिच्या नजरेत एक वेगळीच शांतता उतरली होती… “माझी मुलगी वापरण्याची वस्तू नाही… आता ती स्वतःचं आयुष्य जगायला शिकतेय आणि मी तिच्यासाठी, शेवटी एक आई म्हणून, उभी राहणारच!” त्या क्षणी निशा आणि अन्वी, त्यांच्या कपातल्या कॉफीपेक्षा जास्त कडवट विचारांत बुडालेल्या होत्या… आणि प्राजक्ता मात्र एका नव्या उगमाचं स्वागत करत होती – जिथे आराध्या आता स्वतः चा शोध घेत होती… निशा चिडलेल्या अविर्भावात, कमरेवर हात ठेवत सरळ स्वयंपाकघरात आली. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि डोळ्यांतल्या संतापाची तीव्रता लपवणं शक्यच नव्हतं… “प्राजक्ता, काय गं हे? कोण कुठली म्हातारी आली आणि…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे आज गावी एका लग्नाला जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी असे लग्न होत होते… असे म्हणजे सर्व विधीपूर्वक! तुम्ही म्हणाल की, सगळी लग्नं तशीच होतात की! पण खरंच गावाकडील हे लग्न अनेक गोष्टींनी लक्षात राहिले.. सगळे गाव एक होऊन लग्नाची तयारी करीत होते. घरचंच कार्य असल्यासारखे लहान-मोठे सर्वजण आपापला सहभाग देत होते. कोणताही बडेजाव तेथे नव्हता. कोणतेही प्री-वेडिंग कार्यक्रम तेथे नव्हते. पण सगळेजण खूपच आनंदात होते. मुलीकडील लग्न म्हणजे गावात वऱ्हाड येणार होते. वेशीपासून गावात दुतर्फा कमान घातली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. गावातील सर्व पुरूष मंडळी ही सगळी बाहेरची कामे बघत होती तर महिला मंडळ सगळे लेकीचे कौतुक…

Read More

माधवी जोशी माहुलकर पूर्वी बायका फावल्या वेळात स्वेटर विणत असत. विविध रंगी स्वेटरचे विणकाम करता करता एकमेकींना आपल्या सुखदुःखाच्या गुजगोष्टी सांगत. त्यांना नेहमी हेच शिकवलं गेले होतं की, बाईने नेहमी एक टाका सुलट आणि एक टाका उलट, असं करत संसाराची वीण तयार करायची असते. हे करताना तुझा संयम तुझ्या कामास येईल आणि तुझे आयुष्य सुखी होईल. मग त्या स्त्रिया आयुष्यभर तो नियम लक्षात ठेवून आपल्या आयुष्यातील संसार विणेचे पीळ अजून घट्ट विणत असत. निरनिराळ्या नात्यांची ही सुंदर वीण गुंफत असताना त्या आपले स्वतःचे अस्तित्व विसरून जात. आपल्या म्हटल्या जाणाऱ्या कुटुंबाकरिता स्वतःची सर्व क्षमता त्या पणाला लावत असत आणि त्यातून जर…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥417॥ तो आधीं जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला ॥418॥ तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥419॥ यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला । तरि अनुतापतीर्थीं न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥420॥ तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ । जन्मलेया फळ । तयासीच जोडलें ॥421॥ तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें…

Read More

दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नोबेल विजेत्या अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक टीम अवांतर नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक यांचा जन्म 26 जून 1892 रोजी पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे सायडेनस्ट्रिकर या धर्मप्रचारक कुटुंबात झाला. 1900 साली झालेल्या बॉक्सर उठावात पर्लच्या आईने मुलांना घेऊन शांघायमध्ये आश्रय घेतला. चिनी संस्कृतीबद्दलचे पर्ल यांचे आकर्षण आणि प्रेम त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते. पुढे 1935 मध्ये पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही पर्ल यांनी ‘बक’ हे आडनाव व्यावसायिक क्षेत्रात वापरले. 1922 पासून पर्ल यांनी मासिकांत लघुकथा आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये ईस्ट विंड, वेस्ट विंड ही त्यांची पहिली…

Read More

स्नेहा सुतार भाग – 4 ‘ऐसे काही व्हावे मन शांत निजावे… एकांताच्या वेळी आकांत निमावे… ‘ उन्हाळ्याच्या दिवसात झाडं घुसळून वारा यावा आणि आपल्यापर्यंत पोहोचेस्तोवर तो मंद व्हावा… त्याचं कानांशी सलगी करणं हवं हवंसं वाटावं… त्याने उडवलेल्या केसांच्या बटा अशाच हुळहूळ उडत रहाव्यात. त्या हुळहूळतील तसा तसा अंगावर हलकेच शहारा उठावा… आणि अशात सलीलचं हे गाणं सुरू असावं… मग कसं होईल? अगदी तसंच तिला झालं. बाहेरचा पाऊस एव्हाना थांबून मजा बघावी, असा अगदी मंद झाला होता. अगदीच मंद… कुणी काय म्हणतात ते म्हणू दे, असं म्हणून तिने खिडकी उघडून समोरच्या सीटच्या पाठीवर हात टेकवून त्यावर डोकं ठेवलं. म्हणजे अख्खी खिडकीच…

Read More

सुधीर करंदीकर आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे 7 टक्के व्याज मिळते, कुठे 5 टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे 10 टक्के, हे आपण जाणतोच… आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते. मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये! आता ते किती टक्के झाले, हे तुम्हीच सांगा. जुनी गोष्ट आहे… मी एकदा बावधनला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरिता एका म्हशीची मदत घेतली आणि म्हशीबरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला आणि त्याकरिता म्हशीच्या मालकाला 5 रुपये दिले… एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती…

Read More