Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दीपक तांबोळी जाँगिंग ट्रँकवर दहा राऊंड मारुन मी घामेजलेल्या अवस्थेत बाकावर बसलो. एक साठी उलटलेले गृहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते. बऱ्याच दिवसांपासून मी त्यांना या उद्यानात पहात होतो. अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरात हीच समस्या असते कोणी कुणाशी स्वतःहून बोलत नाही. प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला! नाही म्हणायला ज्येष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरताना दिसायचे. पण हे गृहस्थ मात्र एकटेच दिसायचे. ते त्या ग्रुपमध्ये का सहभागी होत नाहीत, हा नेहमीच प्रश्न पडायचा. आज मात्र मी स्वतःहूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. “नमस्कार सर…” माझ्या बोलण्यावर ते एकदम दचकले. कदाचित मी त्यांच्याशी बोलेन, अशी त्यांना अपेक्षाच नसावी. “नमस्कार नमस्कार…” ते हात जोडत…
रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे आम्ही अगदी महिना-महिनाभर राहायचो किंवा चुलत भावंडं आमच्याकडे यायची. तेव्हा कुठे मोबाइल होते? टीव्हीवरही फक्त ‘दूरदर्शन’च दिसायचं. मग मनोरंजनासाठी काय होतं? तर फक्त गोष्टी! आत्ताच्या लहान मुलांना कदाचित हे फार कंटाळवाणं वाटेल, पण आम्हाला गोष्ट ऐकताना खूप भारी वाटायचं. गोष्ट सांगणं ही सुद्धा एक कलाच होती आणि तेव्हा ती बऱ्याच लोकांना अवगत होती. आमचे एक मामा आजोबा नेहमीच उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट सांगायचे; आजी शकुंतलेची, रामाची, कृष्णाची गोष्ट सांगायची. एक ज्योती आत्या होती, ती नेहमी राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगायची. सारख्याच धाटणीच्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या.…
माधवी जोशी माहुलकर विदर्भामध्ये फार पूर्वीपासून उन्हाळा आणि कच्चा चिवडा असे समीकरण ठरलेले आहे. तसा हा चिवडा जेव्हा मनात येईल, तेव्हा करता येतो; परंतु उन्हाळ्यात कच्च्या कैरीचा यात वापर केल्यामुळे तो विशेष चवदार लागतो. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे महत्त्व लक्षात घेता हा गॅस न वापरता केलेला कच्चा चिवडा सर्वांची मधल्या वेळेतील भूक भागवण्याकरिता उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिवडा खायची एक पद्धत आहे. अगदी भांड्याला लागलेले तिखटमीठ, शेवटचा पोह्यांचा उरलेला चुरा जोपर्यंत चाटून-पुसून खात नाही, तोपर्यंत ते भांडं हातातून सुटू द्यायचं नसतं. ही पद्धत सर्वांनी अनुसरायची असते. बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे, तरीही त्याची रेसिपी देत…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर दाताची विकेट जवळपास पडलीच होती, पण बेल्स मात्र काठावर अडकली होती… “आज सुट्टी आहे…” वगैरे चर्चा करून ‘डिस्ट्रॅक्शन मेथड’ वापरत… “किती स्ट्रॅांग मुलगा आहे…” कौतुकसोहळा रंगवून… ‘व्हर्बल ॲनेस्थेशिया’ देत हळूच दात उपटून काढला आणि त्याच्या हातात दिला. किंचित दुखलं, पण पडलेला दात बघून तो चकित झाला आणि म्हटला, ”काय करू?” आम्ही बालपणी पडलेला दात छतावर फेकायचो किंवा रात्री ‘दंतपरी’ येऊन भेटवस्तू देईल या अपेक्षेनं झोपताना उशीखाली ठेवायचो… मुलगा आपला ‘दात’ हातात घेऊन परतला आणि इकडं मला ‘वॉटरलू टीथ’ आठवलं! साल असावं 1815… युरोप हादरवणाऱ्या नेपोलियन…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे । तिंहीं निर्जीवींही देवांची निडळें । बैसणीं केलीं ॥484॥ मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥485॥ जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥ तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगी न बैसे ॥487॥ कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥488॥ म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण…
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय क्रिकेटर विजय हजारे टीम अवांतर भारताला पहिली टेस्ट मॅच ज्यांनी जिंकवून दिली होती, त्या भारतीय क्रिकेटर विजय सॅम्युएल हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी सांगली येथे झाला. देवासचे महाराजा विक्रम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांना भारतात बोलावले होते. त्यावेळी मध्यमगती गोलंदाजी किंवा थोडीफार लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या विजय हजारे यांच्यावर ग्रिमेट यांची नजर पडली. त्यांना हजारे यांची फलंदाजी अधिक आवडल्याने त्यांनी हजारे यांना फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ग्रिमेट यांचा सल्ला मानून हजारे यांनी फलंदाजीवर मेहनत करण्यास सुरुवात केली. क्रिकेटर म्हणून वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात…
डॉ. अस्मिता हवालदार प्रतिभा कणेकर लिखित ‘इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ’… पुस्तकाचे नाव लांबलचक असले तरी सार्थ आहे. 2025मध्ये जानेवारी महिन्यात पहिली आवृत्ती निघाली आणि लगेच ऑगस्टमध्ये दुसरी सुद्धा आली. मुखपृष्ठावर इरावती बाईंचा सुंदर प्रसन्न हसरा फोटो आहे. लेखिकेची भाषा ओघवती आहे. इरावती बाईंचे संशोधन सोपे करून, समजेल अशा भाषेत सांगितले आहे. लेखिकेचे मनापासून आभार. इरावती कर्वेंबद्दल मला कुतूहल वाटत होतं, ते पुरातत्वाच्या अभ्यासक होत्या म्हणून! त्यावेळी हा विषय लोकांना माहीत नव्हता. आजही ते पुरेसे गांभीर्याने घेतले जात नाही. मी या विषयात पदविका अभ्यासक्रम केला, त्यावेळी याचे महत्त्व अधिकच लक्षात आले. इरावतीबाईंबद्दल बापलेकी पुस्तकात त्यांच्या दोन्ही मुलींनी…
दिलीप कजगांवकर गेल्या महिन्यात जयपूर–दिल्ली फ्लाइटमध्ये मला एक छान सोबत लाभली. आधुनिक राहणी, आवाजात माधुर्य, प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुणीचे. मीच बोलत होतो; तिकडून फक्त “हो का”, “अरे वा”, “छानच”, “सुरेख” — आणि तरीही ती ऐकत आहे, याची खात्री देणारे प्रतिसाद. मी फोन नंबर मागितला, त्याला स्पष्ट पण गोड नकार. तरीही, मी कागदावर लिहून दिलेला माझा नंबर तिने पर्समध्ये हळूच ठेवला. तेही नसे थोडके! लगेज बेल्टवर आलेली तिची बॅग मी उचलून तिला सुपूर्द केली. ती — थँक्स, मी अबोली. मी — अगदी नावाप्रमाणे. अबोली लाजली. मी — मी प्रशांत. ती — नावाप्रमाणे अजिबात नाही. दोघेही खळखळून हसलो. ती —…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर बनविताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. किशोर महाबळ स्नेहसंमेलनाचे दिवस आले की, शिक्षक सहसा शाळेतील नेहमीच नाटकात भाग घेणारे विद्यार्थी घेऊन दोन-चार नाटके बसविण्याची तयारी सुरू करतात. अगदीच नाईलाज झाला तर, काही नवे कलाकार शोधले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांना नाटकात भाग घेताच येणार नाही, असा सहसा शिक्षकांचा समज असतो. खरेतर, अनेक वर्ग असलेल्या प्रत्येक शाळेत बरेच विद्यार्थी नाटकात भाग घेण्याच्या योग्यतेचे असतील, पण असा शोधच घेतला जात नसल्याने नवे कलाकार सापडत नाहीत आणि त्यामुळेच सर्व विद्यार्थ्याना नाटकात भाग घेण्याची कधीच संधी मिळत नाही. अशी संधी देण्याचा प्रयत्नही होत नाही. बहुतांश विद्यार्थी हे नाटकात भाग घेण्याच्या अनुभवाला मुकतात. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच उत्तम नाट्यकलाकार होण्याचे गुण असतात, हे…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
