Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर आज महाशिवरात्र आहे तर बहुतेक सर्वांचे दोन्ही वेळेस उपवास असतात, अशा वेळेस दोन वेळेस फराळाचे पदार्थ काय करावे, हा मोठ्ठा प्रश्न गृहिणींपुढे असतो. साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, भाजणीचे थालिपीठ, भगर इडली, शिंगाड्याची शेव, बटाट्याच्या किसाचा चिवडा, शिंगाड्याच्या पीठाचा शिरा… असे नानाविध पदार्थ तिच्या डोळ्यासमोर फेर धरायला लागतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बटाटा, साबुदाणा, भगरीचे पॅटिस विथ ग्रीन चटणी हा पदार्थ मी तुमच्या समोर आणला आहे. एकदम पोटभर, फारसे तेल न लागणारा, चवीला एकदम मस्त आणि अगदी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे. सकाळी भगर, आमटी, बटाट्याची भाजी, भाजणीचे थालीपीठ असा भरपेट फराळ झाला की, बहुतेक संध्याकाळी…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात सगळी कामे ठरल्याप्रमाणे पार पडतील. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामे होणार नाहीत, वेळ वाया जाईल, म्हणून कोर्टाची कामे पुढे ढकला. व्यावसायिक वर्गाने अनावश्यक ठिकाणी पैसा तसेच वेळ घालवू नये. कामानिमित्त प्रवास कराल. महिला नवीन जबाबदारी स्वतःहून घेतील आणि उत्तम रीतीने पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांचे मित्र-मैत्रिणींबरोबर वैचारिक वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ या आठवड्यात अमावस्या तुम्हाला लाभदायक ठरेल. गुरूचा जप करत रहा. नोकरदारांना धनस्थानातील गुरूच्या प्रभावाने पगारवाढ आणि इतर मार्गांनी पैसा मिळेल. त्यामुळे गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाने जमीन खरेदी-विक्री करताना सावधान राहावे. कागदपत्रे नीट तपासून घ्या. महिलांनी अमावस्येच्या दिवशी,…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि बिघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि ॥170॥ मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥171॥ मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।  राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ॥12॥ यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ॥172॥ अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥173॥ सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां ।…

Read More

दर्शन कुलकर्णी महाशिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – पडू आजारी मौज हीच वाटे भारी… दिनविशेष प्रसिद्ध विज्ञाननिष्ठ गॅलिलियो टीम अवांतर प्रायोगिक विज्ञानाचा पाया घालणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी इटली येथील पीसा येथे झाला. गॅलिलिओ हे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच गॅलिलिओ यांनी पिसा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि अनिच्छेनेच गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. 1585 साली पैशाभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले. लंबकाच्या सहाय्याने कालमापन करता येते, हा त्यांनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध आहे. 1581 साली त्यांनी एकदा चर्चेमध्ये टांगलेला दिवा हलत असताना त्याच्या आंदोलनांचे निरीक्षण केले…

Read More

डॉ. विवेक वैद्य “डॉक्टर, त्याला लवकर बरे करा. आज त्याचा क्लास बुडला. उद्या शाळा नको बुडायला…” “डॉक्टर, दोन दिवस झाले शाळेत जात नाहीये. त्याच्या टीचर ओरडतील. पाहिजे तर इंजेकशन द्या… उद्या शाळेत्त जायलाच पाहिजे!” “डॉक्टरसाब, कल इसकी युनिट टेस्ट है. कैसा भी कर के खडा करो इसको…” हे संवाद आता माझ्यासाठी नवीन राहिलेले नाहीत. कोणाला या संवादात काही वेगळंही वाटणार नाही. कारण बहुतेकांना वाटले असणार, ही आजारी मुले मोठी असावी. दहावी, बारावीची… किमान आठवीच्या पुढची! …नाही, ही सगळी मुले आहेत, बालवाडी, ज्युनिअर, सीनियर केजी किंवा पहिलीतली! मी कोणी बालरोगतज्ज्ञ नाही शिक्षणतज्ञ् नाही, तरीही काही गोष्टींबाबतीत माझे विचार नक्कीच सांगू शकतो.…

Read More

मागील लेखात नमूद केल्यानुसार आपण योगाभ्यासातील समाविष्ट विषयांच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत या आणि पुढील लेखांत मार्गदर्शन घेणार आहोत. आता आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेऊया. ओंकार साधना म्हणजे काय? सोप्या भाषेत ओंकार साधना म्हणजे ओंकार जप अथवा ओंकार अभ्यास म्हणता येईल. अर्थातच, यथायोग्य ठराविक वेळेस नियमितपणे तसेच सातत्य राखून ओंकार जप करणे, हे ओंकार साधनेत अभिप्रेत आहे. दैनंदिन योगाभ्यासाचा आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो आणि समाप्ती एकादश ओंकाराने केली जाते. ओंकाराचे स्वरूप अ + उ + म = ॐ म्हणजे ओम होय. ‘अ’ आणि ‘उ’ हे दोन स्वर आणि ‘म’ हे एक…

Read More

वरी तांदळाची खिचडी प्रकार – 1 साहित्य कृती हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… वरी तांदळाची खिचडी प्रकार – 2 साहित्य कृती हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो वऱ्याची तांदळाची खिचडी प्रकार – 3 साहित्य कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

सुधीर करंदीकर “14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे! काही वर्षांपूर्वी हा शब्द आपल्याला माहीतही नव्हता आणि आता तरुणाईकरिता व्हॅलेंटाइन डे हा अगदी महत्त्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा? आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा की, नाही? याकरिता हे माहिती करून घेणे जरुरी आहे की, व्हॅलेंटाईनचा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?  व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे… हे रोममध्ये…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥ मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥ मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजी वन । निदेला देखे ॥159॥ तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥160॥ मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥ मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥ मज सहजातें करिती । स्वंयभातें प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥ मी…

Read More

दर्शन कुलकर्णी शनिप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात नफा होईल. समाजातील तुमच्या कीर्ति, मानसन्मानात वाढ होईल. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांना कामाचा ताण असेल, मात्र सहकाऱ्यांच्या वर्तनामुळे निराश व्हाल. आहाराची काळजी घ्या, अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज जोडीदाराचे आरोग्य देखील चिंतेचे कारण  बनेल. वृषभ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नियोजनानुसार काम केले तर यश मिळेल. आज तुम्हाला आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना, वेगावर नियंत्रण ठेवावे. शक्य असल्यास प्रवास…

Read More