Author: Team Avaantar

रेवती निलेश पांडे काल बाजारात अचानक सुधा काकू भेटल्या. गजबजलेला रस्ता, तुफान गर्दी, पण काकूंच्या गप्पांचा ओघ मात्र नेहमीप्रमाणेच अव्याहत सुरू होता. आजूबाजूच्या गोंगाटाचा त्यांना कधीच फरक पडत नाही आणि कालही पडला नाही. पंधरा मिनिटं इकडल्या-तिकडल्या गप्पा झाल्यावर विषयाची सुई मूळ मुद्द्यावर आली. काकू सांगू लागल्या की, त्यांच्या भावाला चक्क स्वतःचा हक्काचा फ्लॅट सोडून भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. पुण्यासारख्या ठिकाणी किती कठीण जातंय त्याला! आणि या सगळ्याला त्यांचा भाचा सारंग कसा कारणीभूत आहे वगैरे वगैरे… काकू वैतागून म्हणाल्या, “काय म्हणावं बाई या Gen-Z पोरांना? काय विचार करतात अन् काय वागतात, त्यांचं त्यांनाच ठाऊक! आमच्या काळी कसं होतं, वडिलांनी म्हटलं…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्या देशात पालकांकडून पाल्यास धाक दाखवण्यासाठी जसा डॅाक्टरांचा वापर केला जातो तद्वतच आपल्या पार्टनरला एखादा मेसेज कन्वे करण्यासाठीही डॅाक्टरांचा वापर केला जातो… “यांना सांगा सिगारेट सोडा…” किंवा “तिला पालेभाज्यांव्यतिरिक्तही जीवनसत्वयुक्त पदार्थ असतात ते बनवा, असं सांगा…” अशी विनंती लोक अधूनमधून करत असतात. असाच एक दिवस ओपीडीत याच श्रेणीतलं एक जोडपं आलं होतं; आजार कमी आणि एकमेकांबद्दल आक्षेपच अधिक! बरं यातल्या बऱ्याच गोष्टी तर अवैद्यकीय होत्या… पण चालतंय, भारतीय माणूस बहुदा अघळपघळच असतो… तिला त्यानं वाढवलेली ‘मटनचॅाप्स बियर्ड’ अर्थात ‘दाढी’ आवडत नव्हती तर, तो ‘फॅशनंय’ म्हणून अडून बसला होता… आता मी त्याला दाढी काढायला सांगावं, असं तिचं म्हणणं…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां बहु बोलोनी सांगावें । तें एकिहेळा घे पां आघवें । सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥299॥ म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ॥300॥ तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीविण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥ हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥302॥ परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥ ग्रासा एका अन्नासाठीं…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळाची असू शकते. अनावश्यक रागामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून शांत राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास एखाद्या मित्राची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कोणत्याही मुद्द्यावर घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. वृषभ – आत्मविश्वास आणि चिंता आज हातात हात घालून  एकत्र राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार टाळा. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – रागावर…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार ‘आहे मनोहर तरी’ हे सुनीताबाई देशपांडे यांचे आत्मचरित्र आले आहे, अशी चर्चा मी घरात ऐकली होती. त्यावरून एवढंच समजलं की, याबद्दल बरीच उत्सुकता सर्वांना आहे. याचे कारण त्या महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडेंच्या पत्नी आहेत… असेच असावे, असं मला वाटलं होतं. पण सुनीताबाई स्वत: एक विलक्षण व्यक्तिमत्व आहेत, हे इतरांच्या बोलण्यातून समजलं. त्यावेळी मी पुस्तक वाचलं होतं, पण एक-दोन प्रसंग वगळता फारसं काही लक्षात राहिलं नाही. पुस्तकाच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण होते, कारण पुढची ओळ ‘गमते उदास’ अशी विरोधाभासी आहे… अर्धवट उघडलेल्या दाराबद्दल वाटावी तशी! प्रस्तावनेत त्या ‘गमते उदास‘बद्दल सुतोवाच करायला सुरुवात करतात. एक होता राजा आणि…

Read More

दिलीप कजगांवकर रविवारची सकाळ… आठ वाजले होते. सुटीचा दिवस असल्याने पुणेकर आरामात उठतात आणि नाश्ता बाहेरच करतात… त्यामुळे एफ.सी. रोड तसा मोकळाच होता. नेहमी आत शिरायला जागा नसलेले खवय्यांचे आवडते रेस्टॉरंट खवय्यांच्या प्रतीक्षेत होते. साधा पायजमा, फाटलेला फुलबाह्यांचा शर्ट, डोक्यावर मळलेली टोपी, पायात अगदी साध्या चपला आणि पाठीवर भलीमोठी सॅक घेतलेल्या एका इसमाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. नेहमीच्या आकर्षक, आधुनिक तरुणाईच्या तुलनेत तो फाटका माणूस होता. “काय हवं तुला?” वेटरने विचारले. “माझे काही मित्र येणार आहेत, मग ऑर्डर देतो,” फाटक्या माणसाने सांगितले. पाच मिनिटांनी फाटका बाहेर गेला. “बरं झालं, घाण गेली,” म्हणत वेटरने फाटका बसलेली खुर्ची डेटॉल टाकून स्वच्छ केली. दोन-तीन…

Read More

डॉ. किशोर महाबळ शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना शिकण्यात मुळीच रस नसतो. शक्यतो शिकणे टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यास न करण्यासाठी आणि होता होईतो वर्गातही न बसण्यासाठी विद्यार्थी काही ना काही कारणे शोधत असतात. तहान लागलेली असो की नसो, त्या निमित्ताने आणि अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्गाबाहेर जाण्याचा ते प्रयत्न करतात. वर्गात बसलेच तर, त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर कंटाळा आणि निरुत्साह दिसतो. अंगाला आळोखेपिळोखे देणे, कारण नसताना इकडे तिकडे बघणे, आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी बोलणे यासारख्या असंख्य अनावश्यक गोष्टी करण्यात मुले वेळ घालवतात आणि अनेकदा सुट्टीची वाट बघत बसतात, असे शिक्षकांचे म्हणणे असते. विद्यार्थ्यांचे हे वागणे, हा निरुत्साह शिक्षकांना फार त्रासदायक वाटतो. शिकण्याची…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ अन् बरंच काही… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्म मरण । यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥288॥ मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतिगुणें । जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥289॥ जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंब सविता । तैसा ब्रह्मादि सर्वां भूतां । सुहृद तो मी ॥290॥ मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा । सृष्टिक्षयप्रभावा । मूळ तें मी ॥291॥ बीज शाखातें प्रसवे । मग तें रुखपण बीजीं सामावे । तैसें संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥292॥ ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारू पु । तया…

Read More

दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन वास्तू अथवा घर खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही व्यावसायिकांच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखाल. संततीच्या प्रगतीने तुम्ही खूश असाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. फक्त फास्ट फूड किंवा बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. वृषभ – कार्यक्षेत्राचा विस्तार कराल. जमीन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद उपयोगी पडतील. आज जोडीदाराशी तुमचे नाते अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत उत्तम प्रगती साधता येईल. मिथुन – बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणारे जातक नोकरी बदलीची योजना आखू…

Read More