Author: Team Avaantar

पराग गोडबोले “आई काय दिलंय आज डब्यात?” मी अगदी उत्सुकतेनं विचारलं आईला आणि आई म्हणाली, “अगं, आलू पराठे आणि दही दिलंय. सोबत एक केळं पण आहे. न विसरता खा.” “दादाला काय दिलंय?” “तुला जे दिलंय, तेच त्यालाही दिलंय. त्याला एक जास्त दिलाय पराठा, एवढंच.” “बरं” म्हणाले मी, पण आईच्या नकळत दोघांचे डबे उघडून बघण्याचा मोह मला आवरला नाही. दोघांच्याही डब्यात पराठेच होते, पण माझ्या डब्यातले दोन पराठे थोडेसे करपलेले होते. दादाचा डबा उघडला आणि त्यात डोकावून बघितल्यावर, सगळे पराठे अगदी छान, व्यवस्थित भाजलेले, सुबक दिसत होते. “आई, लगेच इकडे ये. काहीतरी विचारायचंय तुला…” मी आईला हाक मारली. “अगं, का एवढा…

Read More

शोभा भडके भाग – 17 सिया आणि सुधाला आरूच्या घरी सोडून आकाश ऑफिसमध्ये गेला होता. महत्त्वाचे काम असल्याने शिवने त्याला जायला सांगितलं होतं. इथे आरूकडे हॉलमध्ये सोफ्यावर सुधा आणि सिया बसल्या होत्या. कलावती आणि सरिता त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आल्या. “अहो राहू द्यायच हो… याची काय गरज होती?” सुधा एवढा सगळा नाश्ता पाहून म्हणाल्या. “गरज कशी नाही वं! तुम्ही आमच्या विइन बाई. तुमचा मान राखाया नगं व्हय? लेकीच्या सासू हाईस तुम्ही…” त्यांच्या हातात चहा देत कलावती म्हणाल्या. “मुलीच्या सासू तर तुम्ही पण आहात ना? आणि कशाला उगाच हे मुलाकडचे, मुलीकडचे असं मानायचं? सगळं सारखंच धरून चालूया…” सुधा हसत म्हणाल्या. मग…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जैसे तवंचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥458॥ कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं ॥459॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥460॥ मग जातीव्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥461॥ तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥462॥ हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे । येतुलें…

Read More

दर्शन कुलकर्णी श्री एकनाथ षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन टीम अवांतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ (रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. झाकीर हुसेन यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम 1963 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी केला. तर, आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस त्यांनी 1970 मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात साधारणपणे 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. याशिवाय सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांच्यासोबत 1970 ‘शांतिगट’ आणि नंतर 1975 मध्ये पुढे…

Read More

सुधीर करंदीकर उत्तम तब्येतीकरता भरपूर फिरा, असे सगळेच तज्ज्ञ सांगतात… आता घराच्या बाहेर पडलो की, छोटे – मोठे रस्ते क्रॉस करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे कुठलाही मोठा आणि खूप रहदारीचा रस्ता क्रॉस करायचा म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा रहातो आणि याला कारण म्हणजे आपल्या इथली बेशिस्त (आपणच तयार केलेली) रहदारी! रस्ता क्रॉस करताना पण काही मज्जा येऊ शकते, यावर खरंतर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात, हे सांगणारा माझा अनुभव आता सांगणार आहे. तो ऐकून आपल्याला पण असा अनुभव एकदातरी यावाच, असे सगळ्यांना नक्कीच वाटेल… नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलीकडे बावधनला गेलो होतो. दुपारी ऋता…

Read More

माधवी जोशी माहुलकर “नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो…” सलील कुलकर्णींचे संगीत आणि संदीप खरेंचे शब्द. सगळंच अप्रतिम! ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांवर, प्रसंगांवर प्रकाश टाकला आहे. ‘जरा चुकीचे अन् जरा बरोबर बोलू काही’ म्हणत सामान्य लोकांच्या भावभावनेला हात घातला आहे, त्यातीलच मला आवडलेली कविता, “नसतेस घरी तू जेव्हा…” ही कविता ऐकली की खरंच जीव कासावीस होतो. घरातील स्त्रीचे असणे किंवा नसणे दखलपात्र असतं, तिचे घरात असणंही तिच्या नसण्याइतकंच महत्त्वाचं असतं, जसा घरातील कर्तापुरुष हा त्या घराचा आधारवड असतो, तशी स्त्री ही त्या घराची आधारस्तंभ असते. प्रत्येक…

Read More

मेष या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरीसंदर्भात आधी दिलेल्या मुलाखतीचे उत्तर येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाची रखडलेली कामे मार्गी लागतील. कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी महिलांचे वाद मिटतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. वृषभ या आठवड्यात सकारात्मकता अनुभवू शकाल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. आधी केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल आणि कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन संकल्पना राबविल्या जातील आणि त्याद्वारे व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून देतील. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. महिलांनी विनयाने वागावे, घरात एखादे मंगलकार्य ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मिथुन…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा नांवें घेता वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥444॥ जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥ माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥446॥ जयांचें नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एऱ्हवीं मरण ॥447॥ ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी रंगपंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका! दिनविशेष प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर टीम अवांतर प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार आणि नाटककार तसेच ‘आरती प्रभु’ या नावाने कवितालेखन करणारे चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म 8 मार्च 1930 रोजी बागलांची राई (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) इथे झाला. ‘गुरूकुल’ (लोणावळा), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी 1959 ते 1965 या कालखंडात त्यांनी नोकऱ्या केल्या. त्यानंतर मात्र केवळ लेखनासच वाहून घेतले. जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे यासारखे कवितासंग्रह, रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू यासारख्या कादंबऱ्या, एक शून्य बाजीराव, सगेसोयरे, अवध्य, कालाय तस्मै नमः यासारखी नाटके तर सनई, गणुराया आणि चानी, राखी…

Read More

डॉ. श्रीकांत राजे होमिओपॅथी चिकित्सक वेळ सकाळी सातची. मी स्टेशनरी दुकानात गेलो होतो. त्यावेळी एक युनिफॉर्ममधला, नावाजलेल्या शाळेचा विद्यार्थी दुकानात आला. वडील गाडीत बसले होते. मुलगा दुकानदाराला म्हणाला, “काका थम्सअप आहे? हं, एक स्प्राइट द्या… आणि एक एनर्जी ड्रिंक द्या.” माझ्यासमोर त्याने आपल्या शाळेची वॉटर बॅग उघडली. फसफसणारे सॉफ्ट ड्रिंक त्याने एकत्र करून त्या वॉटर बॅगमध्ये भरले. रिकाम्या झालेल्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या तशाच ठेवल्या. “काका, बाबा म्हणाले हे पैसे उद्या देतो…” असे म्हणून आपल्या गाडीत बसून निघून गेला. मोठ्या “हाय प्रोफाइल” शाळा आम्ही निवडल्या. तेथील ‘कल्चर’ कशा प्रकारच्या धोकादायक वळणावर आहे, त्याचा हा एक अनुभव. सकाळच्या शाळा… चांगल्या आहाराचा नावापुरताच…

Read More