Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
पराग गोडबोले आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू असतो. आबा कधी कुठे काय करतील आणि आम्ही गोत्यात येऊ… याचा नेम नसतो, कधीच. खूप सावध राहावं लागतं आम्हाला, नाहीतर, ‘नजर हटी, दुर्घटना घटी‘ याचा प्रत्यय कधी येईल, हे सांगणं कठीण! तसं तर अगदी शहाणे असतात ते. नीट विचार करून बोलतात आणि कृती करतात, फार विवेकाने वागतात. सकाळी फिरून येताना रिक्षावाले, सोसायटीचे रखवालदार, गाडी पुसणारे यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांचे पाय घराकडे वळतच नाहीत मुळी… प्रत्येकाला आवर्जून फराळाचे जिन्नस दिल्याशिवाय त्यांची दिवाळी साजरी होतच नाही कधी. चार…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥7॥ जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥98॥ हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥ तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥100॥ ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥ कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥102॥ नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे…
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात आर्थिकदृष्ट्या तुम्हाला यश मिळेल, परंतु अनावश्यक खर्च वाढू शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात पैसे खर्च होतील. प्रियजनांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ असेल. तुमच्या वागण्यातून समोरच्याला त्याच्याबद्दलचा राग दिसून येऊ शकतो, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. वृषभ – कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरेल. एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शुभकार्यचा योग आहे, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. मुलांशी चांगला संवाद होईल. सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. गाडी चालवताना काळजी…
शोभा भडके भाग – 13 “मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय…” राम सगळ्यांवर एक नजर टाकून म्हणाला. दादाचं बोलणं ऐकून घरचे कसे रिॲक्ट होतील, याच विचाराने पवन आणि आरूची बेचैनी वाढली होती. कारण, दोघांना कल्पना होती तो काय बोलणार त्याची! पवन आणि राम यांच्यात रात्रीच या विषयावर बोलणं झालं होतं. लवकरात लवकर सियाच्या पाहिल्या लग्नाबद्दल घरच्यांना सांगायला हवं… त्यांचं हेच बोलणं आरुने पण ऐकलं होतं आणि तिलाही असंच वाटत होतं… लग्न आठ दिवसांवर आलं तरीही दादाने अजून घरी का नाही सांगितलं? म्हणून आता आपणच त्याच्याशी बोलायला हवं, असा विचार करून ती त्याच्या रूमकडे येत होती, तेव्हा दोघांचं बोलणं तिने ऐकलं. आता…
संगीता भिडे ‘वही’ ही तर माझी सगळ्यात पहिली आणि जीवा-भावाची मैत्रीण. अगदी अंधुक आठवण आहे… मी आईजवळ हट्ट केला, ‘मला तात्यांसालखी (तात्या माझे वडील) मोट्टी मोट्टी वही हवी.’ ‘तू त्यांच्याशालकी खूप मोट्टी हो, मग आणू तुला अश्शीच वही हं. आत्ता तू पाटीवर लिही खडूनं हं…’ इति आई. ‘नाई, मला आत्ताच हवी मोSSSट्टी वही. मी आता खूप मोSSSट्टी हाए. मला पण तात्यांशालका खूप खूप अभ्यास कलायचा हाए.’ इति अस्मादिक. खरंतर, अस्मादिकांना अक्षर ओळखही नव्हती तेव्हा. पण बालहट्ट! आईने माझ्यासाठी लगेच एक वही आणली. मग काय? आमची स्वारी एकदम खूश! काय लिहिलं नाही त्यात! उभ्या, आडव्या, तिरप्या-तारप्या कोणत्याही आकाराच्या रेघोट्या… कुठे कुठे…
माधवी जोशी माहुलकर साहित्य हेही वाचा – Recipe : मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण कृती हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का? तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
मेष या आठवड्याच्या सुरुवातीला थोडी चिंता राहील. नोकरदार नवीन संकल्प हाती घेतील आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्ण करू शकतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. जास्त अधिकार प्राप्त होतील. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे; ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. वृषभ या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. नोकरदारांना अनपेक्षित प्रमोशन मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरुपात बदल घडेल. व्यावसायिक वर्गाला भांडवलासाठी आर्थिक मदतीची गरज भासेल; बँकेकडून ती मदत मिळेल. नवीन करार होतील, व्यवसायात वाढ होईल. महिलांच्या बाबतीत घरात मंगलकार्य ठरण्याचे योग…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे । माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥85॥ मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥ हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥ यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥88॥ यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥6॥ पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे । सहजे हालविलिया वेगळा दिसे…
दर्शन कुलकर्णी भानुसप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – गण गण गणात बोते… मंत्र समजून आचरणात आणण्याची गरज दिनविशेष प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर टीम अवांतर हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 रोजी मिरजजवळील बेगड गावी जन्म झाला. त्यांचे घराणे भिक्षुकांचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर बाळकृष्ण यांना इचलकरंजी येथील त्यांचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. पण त्यांना भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिले. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण गाणे…
सुधीर करंदीकर शेगावचे श्री गजानन महाराज यांनी सर्व भक्त मंडळींना एकच मंत्र दिला होता आणि तो म्हणजे – गण गण गणात बोते… महाराज स्वतः या मंत्राचा सतत जप करत असत आणि त्याप्रमाणे तो आचरणात आणत असत. कुठलाही मंत्र म्हटला की, त्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे, ध्यानस्थ बसून त्या मंत्राचा नित्यनियमाने जप करणे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, नित्य जप करण्याबरोबरच त्या मंत्राचा अर्थ समजावून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे आणि ठेवणे! आपण बरेचजण ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नित्य जप करत असतो. असा जप केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं आणि त्यामुळे जप करणाऱ्यांना मानसिक शांतता नक्कीच मिळते. पण…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 243
- अवांतर 172
- आरोग्य 90
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 182
- मैत्रीण 16
- ललित 503
- वास्तू आणि वेध 356
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
