Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 11 आश्विन शके 1947; तिथि : एकादशी 18:32; नक्षत्र : श्रवण 09:33 योग : धृति 21:45; करण : वणिज 06:57, बव 29:56 सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पाशांकुशा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – वाहने काळजीपूर्वक चालवा. कोणाकडूनही कोणत्याही कारणाने पैसे उधार घेऊ नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. काही प्रमाणात…

Read More

यश:श्री हत्ती या अजस्त्र प्राण्याबद्दल अबालवृद्धांच्या मनात कुतूहल असते. विविध भाषिक चित्रपटांमध्येही ते पाहायला मिळाले आहेत. या प्राण्याला माणसावळतात आणि त्याचा वापर मोठमोठे ओंडके वाहून नेणे किंवा मिरवणुकीसाठी केला जातो. काही काळापूर्वी तो सर्कशीमध्येही दिसायचा, मात्र प्राणीमित्रांच्या पुढाकाराने सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. वस्तुत: भारतीय संस्कृतीत हत्ती हे भरभराटीचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच पूर्वी राजे-महाराजांचा राज्यातील फेरफटका हत्तीवरील अंबारीत बसून असायचा. या हत्तीला सजवण्यातही येत असे. त्याच्या पाठीवरील झुली देखील नक्षीदार आणि आकर्षक रंगाच्या होत्या. एखाद्या धार्मिक उत्सवाच्या वेळी हत्तीची जेव्हा मिरवणूक काढण्यात येते, तेव्हा त्याला सजविण्यात येते. त्यामध्ये त्याच्या पाठीवरील अंबारीचाही समावेश असतो. हत्तीच्या पाठीवर जरीची…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – अर्धा किलो चिंच अर्धा लीटर पाण्यात दोन तास भिजवून तिचा कोळ (गर) काढावा. पीठ चाळावयाच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गर छानून घ्यावा. त्यात दोन मोठे चमचे मीठ आणि अर्धा कप व्हिनिगर घालून उकळावे. दाट झाल्यावर गार करून छोट्या बाटल्यांत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. जरुरीच्या वेळी आवश्यक तेवढे चटकन वापरता येते. रोजच्या जेवणात चिंचेचा उपयोग करताना रोज गोळा भिजवून कोळ काढायचा त्रास वाचतो. याच मिश्रणात गूळ, तिखट, चार-पाच लवंगा, सात-आठ मिरीचे दाणे आणि दालचिनीचे दोन तुकडे घालून…

Read More

ॲड. कृष्णा पाटील दुपारची वेळ… टळटळीत ऊन पडलेलं… घामानं अंग आंबल्यालं असतं… वारा गप्पगार असतो… झाडाचं पानही हालत नाही…. गरमीने सगळ्यांची घालमेल चाललेली असते. कडक उन्हामुळे दुपारपासून शेतातली औतं बंद असतात. तापलेल्या सूर्याचा गोळा डोक्यावर आल्यावर शेतीची मेहनत जाग्यावर थांबलेली असते. सर्वांची जेवणीखाणी झालेली असतात. बैलं दावणीला धापा टाकीत उभी असतात. वैरणकाडी करून बापू जोत्यावर सावली बघून कलंडलेले असतात. घरातले बापय कोण सोप्यात तर कोण झाडाखालच्या गार सावलीत उघडं होऊन पडलेले असतात. ऐन उन्हाळ्यातील उकाड्याने सगळीच हैराण झालेली असतात. सोप्यातच पत्र्याखाली आज्जी रंगीबेरंगी कपड्याच्या तुकड्यातुकड्यांची वाकाळ शिवत असते. तिच्या जोडीला तिच्याच वयाच्या दोन-चार बायका बसलेल्या असतात. पैऱ्याने वाकाळ शिवायला त्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा श्रीभगवानुवाच : काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥37॥ तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥239॥ तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं । हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥240॥ हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥ हे दैहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामींचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगावरी ॥242॥ हे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 10 आश्विन शके 1947; तिथि : दशमी 19:10; नक्षत्र : उत्तराषाढा 09:12 योग : सुकर्मा 23:27; करण : तैतिल 07:11 सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दसरा विजयादशमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. घरी आणि कामाच्या ठिकाणी सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतील. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. मालमत्ता खरेदीसाठी वाटाघाटी करणाऱ्यांना…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 4 आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली. मोहन आणि आशा यांनी कणकवलीच्या भोसले वकील…

Read More

दीपक तांबोळी भाग – 1 “फक्त सात दिवस….” समोरच्या कॅलेंडरकडे पहात मकरंद पुटपुटला. आजकाल असेच तो दिवस मोजत होता. याची सुरुवात खरंतर मागच्या वर्षीच झाली होती. पण त्यावेळी तो महिने मोजत होता. आता मात्र एप्रिल सुरू झाल्यापासून त्याने दिवस मोजायला सुरुवात केली होती. साहजिकच होतं… बरोबर सात दिवसांनी म्हणजे 30 एप्रिलला तो रिटायर होणार होता. मागच्या डिसेंबरमध्ये त्याचा एक सहकारी रिटायर झाला, तेव्हा एक मोठा निरोप समारंभ झाला होता. हारतुरे, गिफ्ट्स, खाणंपिणं, ती स्तुतीपर भाषणं यांची नुसती रेलचेल होती. खरंतर, त्याचा सहकारी रागीट आणि तुसड्या स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडासाही प्रिय नव्हता. पण निरोप समारंभाची जनरीत पाळणं महत्त्वाचं होतं. शिवाय मोठ्या साहेबांची…

Read More

माधवी जोशी माहुलकर विदर्भातील खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा या गावांसह इतर खेड्यांमधे वाळवणाचा असाच एक पापडा हा पारंपरिक प्रकार केला जातो. पापडा करताना गहू ओलावून पीठ तयार करतात. हे पीठ चांगले मळून, दीड-दोन तास मुरत ठेवतात. नंतर त्याच्या मोठमोठ्या पोळ्या लाटून घेतात आणि त्या परत हातावर घेऊन त्यांना दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत अजून मोठा आकार देतात. एका मोठ्या परडीवर तो पापडा वाळत घालतात. पापडा उन्हात कडकडीत वाळले की त्यांचा हातानेच चुरा करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात. हा प्रकार वर्षभर साठवून ठेवला जातो. अगदी फोडणीच्या पोळीसारखा किंवा फोडणीच्या शेवयांसारखाच असणारा हा पदार्थ कसा करतात ते पाहूया! एकूण…

Read More

हिमाली मुदखेडकर माहेरी गावी जाण्याचा खूप वर्षांनी योग आला होता. वामकुक्षी आटोपून मस्तपैकी फक्कड चहा घेतला… आणि फेरफटका मारून यावा म्हणून निघाले. आजूबाजूचा परिसर अनोळखी वाटावा, इतका बदल झाला होताच. तरी काही ओळखीच्या… जुन्या खुणा शोधण्याचा अट्टाहास नजर करत होती… पण कुठे काही खाणाखुणा सापडत होत्या… तर कुठे अगदीच नावीन्य पसरले होते… अशीच पुढे पुढे जात मी त्याच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले… सहज नजर वर टाकीकडे टाकली… पण ते मधमाशांचं पोळं नव्हतं तिथे, जे पूर्वी आम्ही तेथून जात असताना नेहमी दिसायचं… सवयीने नजर समोरील घराकडे वळली. असं वाटल की, तिथेही अपेक्षित चाफा नसेल आता… पण सुखद आश्चर्याचा धक्का! चाफा होता…

Read More