Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।। वरी क्षत्रियांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पैं ।।115।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडें थेंकुलें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 ऑगस्ट 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 13 श्रावण शके 1947; तिथि : दशमी 11:41; नक्षत्र : अनुराधा 09:11 योग : ब्रह्मा 07:04; करण : वणिज 24:30 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रावणी सोमवार शिवामूठ : तीळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णयक्षमतेला खीळ बसते. म्हणून रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी…

Read More

डॉ. किशोर महाबळ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अतिदक्षता विभागात काम करत असताना खूपच गंभीर दिसत होता. एका ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापकाने ते पाहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावाचे कारण विचारले. एका विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, सध्या आमची ड्युटी ही आयसीयूमध्ये असल्याने आम्ही तिथे काम करत असतो. मात्र अनेकदा आम्हाला विविध प्रकारचा तणाव, नैराश्य, चिंता, निद्रानाश, असहायता यांचा अनुभव येत आहे, त्यामुळेच आम्ही खूप थकलो आहोत. या सगळ्या परिस्थितीत आपण एखादा चुकीचा निर्णय तर घेणार नाही नं? अशी भीती देखील सध्या आमच्यावर अधिराज्य गाजवत आहे. खरंतर, यामागचं कारणही आम्हाला माहीत आहे की, हॉस्पिटलच्या ज्या विभागात आम्ही सध्या कार्यरत आहोत त्या आयसीयूमध्ये अनेक…

Read More

आराधना जोशी मित्र या शब्दापेक्षा मला ‘दोस्त’ हा शब्द जास्त आपुलकीचा वाटतो… आणि त्याहीपेक्षा हिंदी भाषेतील ‘यार’ हा शब्द जास्त जिव्हाळ्याचा वाटतो. ‘छोड दो यार’ या वाक्यात काही वेगळीच खुमारी आहे, असं प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात. खरंच, मैत्रीचं (Friendship) हे नातं अतूट असतं. आपले नातेवाईक कोण असावेत, हे आपण ठरवू शकत नाही, पण आपले मित्र कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे आपला असतो. याच नातेसंबंधांचा उत्सव साजरा करणारा, ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे ‘मैत्री दिन’. महाविद्यालयांमधून एखाद्या सणासारखा साजरा होणारा हा दिवस. आपल्या मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचा हा दिवस तरुणाई अगदी उत्साहाने साजरा करते. हल्ली तर एक मुलगा…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा आपल्यासाठी खूप धावपळीचा आहे. घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी लागू शकते. कामाचे नियोजन केले तरी, तुम्हाला आयत्या वेळी नवीन प्रश्न सोडवावे लागू शकतात. कामाचा ताण वाढू शकतो. शांत राहून प्रयत्न करावा. महिलांना घरामध्ये कधी न केलेली काम करावी लागतील. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षक एखादी जबाबदारी देऊ शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करू शकाल. वृषभ हा आठवडा खूप आनंददायी आहे. या आठवड्यात आवडीचे पाहुणे घरी येतील. त्यांच्याबरोबर प्रवास घडू शकतो. पावसाळी सहलीचा आनंद घेऊ शकता. नोकरदार लोकांना हा आठवडा साधारण आहे. जास्त धावपळ करावी लागणार नाही.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥7॥ भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः । अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥8॥ आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 ऑगस्ट 2025; वार : रविवार भारतीय सौर : 12 श्रावण शके 1947; तिथि : नवमी 09:41; नक्षत्र : विशाखा 06:34 योग : शुक्ल 06:23; करण : तैतील 22:44 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन दिनविशेष क्रांतिसिंह नाना पाटील टीम अवांतर क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 03 ऑगस्ट 1900…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते मागील भागात आपण आदान आणि विसर्ग काळ तसेच त्यात येणारे ऋतू पाहिले. नैसर्गिक बदलानुसार आपल्या आचरणात, जेवणात प्रत्येक ऋतूनुसार काय बदल करायचे, हे आता पाहू शिशिर ऋतू हा आदान काळ म्हणजे उत्तरायणातील पहिला ऋतू. येणारे महिने :- माघ आणि फाल्गुन (Late winter – generally from 15th January to 15th March) ऋतू वर्णन तदाहि शीतमधिकं रौक्ष्यं च अदानकालजम् || या ऋतूत थंडी जास्त वाढते. बाहेरील थंड वातावरणास प्रतिसाद म्हणून शरीर उष्णता टिकवून ठेवण्यास सुरुवात करते, ज्यामुळे पचन क्षमता (जठराग्नी) मजबूत आणि चांगली होते. अशा सुधारित जठराग्नीमुळे पचनास सहसा जड असणारे पदार्थ चांगले पचू शकतात, तसेच जर एखाद्याला जास्त…

Read More

रविंद्र परांजपे वास्तविक, ताणतणाव म्हटले की, आपण शरीरावर येणाऱ्या ताणाबद्दल विचार करतो. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काम, व्यायाम अथवा श्रम केल्यास शरीरातील विविध संस्थांच्या कार्यक्षमतेवर वाजवीपेक्षा जास्त भार पडतो, परिणामी आपल्या शरीरावर ताण येतो. आपले शरीर आपल्याला या ताणाबद्दल सूचना देत असते. परंतु आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. यातूनच शारीरिक व्याधी-विकार उद्भवतात. जसा आपल्या शरीरावर ताण येतो, तद्वत आपल्या मनावरदेखील ताण येत असतो. तथापि, मनावर आलेला ताण कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही आणि यदाकदाचित आलाच तरी, आपण त्याकडे कानाडोळा करतो. आपण मानसिक ताणतणावाची वेळीच योग्य दखल घेतली नाही, तर त्यातून मानसिक समस्या उद्भवतात आणि याची परिणती मानसिक अनारोग्यास आमंत्रण देण्यात होते.…

Read More

परिणिता रिसबूड आवर्त खरेच का जगतो माणूस भूत, वर्तमान, भविष्य एकात एकच मिसळतात हे काळाचे आवर्त आठवणींचे भुजंग, मारून जातात डंख आणि ढवळून काढतात जीवनाचा डोह पुन्हा पुन्हा भोगतो तेच तेच भोग करत राहतो तेच कर्म, अकर्म, विकर्म एकाच भोवऱ्यात सतत फिरत राहतं आयुष्य खरेच का जगतो माणूस भूत, वर्तमान, भविष्य हेही वाचा – Poetry : हाऊस वाइफ, हुरहूर अन् नातं काही दिवस मंत्रमुग्ध सुरातून भिजत जावे तसे आयुष्यातील काही दिवस असेच येतात भारलेले मग तर हिरवळच हिरवळ नेत्रसुखद हवासा गारवा मनातच गुंजत राहतो धुंद मारवा पावलांवर पडते पाऊल स्वतःचीच स्वतःवर भूल पण… एक काटा एक बोच कुठेतरी सलते उरात बेसूर…

Read More