Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
माधवी जोशी माहुलकर भाद्रपदेचा महिना आला… आम्हा मुलींना आनंद झाला… पार्वती म्हणे शंकराला, चला हो माझ्या माहेरला, माहेरी गेल्यावर पाट बसायला, फुगड्या खेळू, गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ… व्रत वैकल्याचा सोवळा श्रावण संपला की, भाद्रपद महिना लागतो. हा महिना सुरु झाला की, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे. हरतालिका झाली की, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. त्याला आवडणारे विविध प्रकारचे मोदक, लाडू, करंज्या अशा विविध प्रसादांची दहा दिवस रेलचेल असते. त्या प्रसन्न आणि उल्हासित अशा वातावरणात षोडशोपचारे पूजा करून मंत्रोच्चाराच्या खणखणीत स्वरात ‘मंगलमूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा सर्वांचा लाडका ‘बाप्पा’ दीड दिवसांपासून दहा दिवसांच्या मुक्कामाने…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जैसी भ्रतारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥199॥ ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषीं ॥200॥ अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥34॥ म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥201॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 10 भाद्रपद शके 1947; तिथि : नवमी 26:42; नक्षत्र : ज्येष्ठा 19:53 योग : विष्कंभ 16:30; करण : बालव 13:53 सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक 19:53; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:53 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 ज्येष्ठागौरी पूजन भागवत सप्ताहारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाणार आहे. मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातही लाभ मिळेल.…
आराधना जोशी गणेशोत्सवामुळे सर्वत्र वातावरण भारलेलं आहं. तसं पाहिलं तर, यात नवीन काहीच नाही. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, उत्तम पुत्र, आद्यदेवता, उत्तम लेखनिक, उत्तम योद्धा, उत्तम संघटक, विघ्नहर्ता, मंगलदाता, मुत्सद्दी असे विविध गुण अंगी असणाऱ्या गणेशाचे वाजत-गाजत जंगी स्वागत केले जाते. त्याची यशाशक्ती, मनोभावे पूजा केली जाते. बाप्पासमोर हात जोडून उभे राहून त्याची सुंदर मूर्ती डोळ्यांत आणि मनात साठवण्याचा भक्त प्रयत्न करतो. खरंतर, इतर सर्वच देवांपेक्षा गणपतीचे रूप काहीसे वेगळे आहे. इतरांप्रमाणे तो मोहक, सुकुमार असा नक्कीच नाही. उलट लंबोदर, मोठ्या कानांचा, बारीक डोळ्यांचा असणारा हा गणेश म्हणूनच इतर देवांपेक्षा वेगळा दिसतो. हा एकमेव असा देव आहे, जो…
अस्मिता हवालदार आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं आजोबांचं जग सगळ मुकं मुकं मुकं… कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली, त्याला जोडलेलं आजोबा आणि नातवंडाचं हळवं नातं तरळून गेलं. गजबजलेली घरं मुकी होतानाची तीव्र वेदना, या कवितेतून जाणवली. जसं देश म्हणजे देशातली माणसं, तसं घर म्हणजे घरातली माणसंच! माणूस नसलेलं घर म्हणजे श्वास नसलेलं शरीर!! अगदी मागच्या शंभर वर्षात पाहिलं तर, प्रत्येकाच्या घरात किमान आठ-दहा माणसं असायचीच. आपले सगळ्यांचे आजी–आजोबा अशाच गजबजलेल्या घरात मोठे झाले आहेत. एक तर भरपूर मुलं होऊ देण्याचा (आणि परवडण्याचा!) काळ होता तो. एकत्र कुटुंब पद्धत होती, कारण घरची शेती. शेतीत राबायला जितके हात असतील तितके अपुरेच…
सायली कान्हेरे गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. घावन घाटलं हा पदार्थ कोकणात गौरीच्या नैवेद्यासाठी करतात. मेहनतीने बनविलेला हा पदार्थ खूप रुचकर असतो. घावन साहित्य काकडी – 1 कणिक – 2 वाट्या तांदूळ पीठ – 1/2 वाटी साखर किंवा गूळ – 1/4 वाटी मीठ – चवीनुसार तेल पुरवठा संख्या : 2 जणांसाठी तयारीसाठी लागणारा वेळ : काकडी सोलून किसण्यासाठी 10 मिनिटे. शिजवण्यासाठी 10 मिनिटे एकूण कालावधी – 20 मिनिटे. कृती काकडी सोलून, किसून घ्यावी. त्यात गूळ /साखर, मीठ घालून मंद आचेवर किस शिजवून घ्यावा. किस शिजल्यावर गॅस बंद करावा आणि तांदळाचे पीठ घालून ते एकजीव करून झाकण ठेऊन द्यावे. गार…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा धावपळीचा असेल. रवी, बुध, केतू पंचम स्थानात आहेत, बुधाचा अस्त झाला आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक बोलणे योग्य ठरेल. आपल्या बोलण्याचा विपर्यास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत जास्त भावनिक न होता निर्णय घ्या. महिलांनी घराकडे लक्ष द्यावे. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागू शकते. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळू शकेल, स्पर्धेत भाग घ्यावा. वृषभ या आठवड्यात रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मागील काही दिवसांपासून, काही कारणांमुळे मागे पडलेली कामे पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागू शकते. महिलांनी घरात…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणे काळीं ॥186॥ जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥187॥ तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥188॥ म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥189॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावे ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 ऑगस्ट 2025; वार : रविवार भारतीय सौर : 09 भाद्रपद शके 1947; तिथि : अष्टमी 24:56; नक्षत्र : अनुराधा 17:25 योग : वैधृती 15:57; करण : विष्टी 11:53 सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:54 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दुर्गाष्टमी ज्येष्ठागौरी आवाहन (सायंकाळी 05:25 पर्यंत) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध दिनविशेष पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक टीम अवांतर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील पूर्वप्राथमिक…
माधवी जोशी माहुलकर मनाचिये गुंती गुंफियेला शेला बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला, मोगरा फुलला… ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी मला नेहमीच भुरळ पाडतात. म्हणजे, मन नावाच्या मागावर असंख्य भावभावनांच्या, विचारांच्या द्वैत-अद्वैताच्या सुंदर रंगीत धाग्यांनी विणलेला कवितारुपी शेला जगदीश्वर विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. किती अद्भुत कल्पना… ती सामान्य माणसाला सुचणं शक्यच नाही… आपल्या बुद्धीपलीकडचे आहे किंवा ज्ञानेश्वरांइतकी बौद्धिक, वैचारिक उंची गाठणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही! मानवाला देवाने मन आणि बुद्धी यांची अचाट देणगी बहाल केली आहे, जी इतर कुठल्याही प्राण्यात आढळणार नाही. मानवी बुद्धीने मनाला साथ देत अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध लावला आहे. मानवी मनामध्ये विचारांचा एवढा…
