Author: Team Avaantar

ॲड. कृष्णा पाटील “आपल्याला आता आपली केस थांबवायची आहे साहेब. मला काय इथून पुढं तारखेला यायचं होणार नाही. पाण्याचे दोन थेंब टाकून देवापुढं ठेवायचा म्हटलं तर रुपाया खिशात नाही. त्यामुळे मी पुढं केस चालवू शकणार नाही. आपण इथंच थांबूया.” नाटेकर वकिलांनी हातातली कागदपत्रांची फाईल बाजूला ठेवली. मान वर करून नामदेव दादांकडे आश्चर्याने पाहिले. नेहमीप्रमाणेच नामदेव दादांनी कपाळावर मोठा गंधाचा उभा नाम लावला होता. त्यावर दोन ठिकाणी अष्टगंध आणि आबिर बुक्क्याची काळी टिकली लावली होती. कानाच्या पाळीवर आणि नरड्याच्या गोटीवर एक एक चंदनाचा पिवळा टिळा लावला होता. डोक्यावर पांढरी शुभ्र परीट घडीची टोपी होती. गुळगुळीत दाढी करून तलवार कट मिशा कोरल्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला तुजसीं अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥ म्हणवूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥ यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृत दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥38॥ कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥39॥ हे अभिमानमदें भुलले । जरी पां संग्रामा आले । तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 23 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:07; नक्षत्र : रेवती 09:05 योग : शूल 13:11; करण : गरज 15:15 सूर्य : कर्क; चंद्र : मीन 09:05; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:07 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायात एखादी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते, ज्यामुळे नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळतील. त्याचबरोबर समाजात…

Read More

अजित गोगटे बातमीदारीसाठी बाहेरगावच्या अनेक दिवसांच्या प्रायोजित दौऱ्यावर नेण्यात येते तेव्हा, आपल्या कामाच्या स्वरूपाबद्दल डोक्यात हवा गेलेले पत्रकार, त्यांच्या वर्तनाने स्वतःसोबतच त्यांच्या व्यवसायाचीही कशी लाज घालवतात, याविषयीच्या एका घटनेसंबंधी लिहून आज मी या ‘आत्मनिंदे’च्या मालिकेला पूर्णविराम देणार आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीस असताना 1990च्या दशकाच्या सुरुवातीस मी अनुभवलेला हा प्रसंग आहे. भारत सरकारच्या ‘पत्र सूचना कार्यालया’तर्फे (PIB) मुंबईतील पत्रकारांचा नाशिक जिल्ह्याचा चार दिवसांचा दौरा आयोजित केला गेला होता. विविध उद्योग-व्यवसायांना अर्थसाह्य करून नाशिक जिल्ह्याच्या विकासात कसे भरीव योगदान दिले आहे, हे दाखविण्यासाठी हा दौरा होता. नाशिक जिल्ह्याची त्यावेळी ‘लीड बँक’ असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ समन्वयक होती. एका विशेष बसने 20-22 पत्रकारांना…

Read More

सुनील शिरवाडकर गोलू आज खूप खुशीत होता. सकाळपासूनच त्याला वेध लागले होते… नाशिकला जाण्याचे. त्याच्या ‘बा’ने कबूल केले होते, यावर्षी त्याला रथयात्रा दाखवण्याचे. दुपारीच तो आणि त्याचा बा निघाले. अवघ्या तास-दोन तासाच्या अंतरावर नाशिक. ते दोघे सीबीएसला पोहोचले, तेव्हा सायंकाळचे सहा वाजत आले होते. चालत चालत ते गंगेच्या दिशेने निघाले. सात-आठ वर्षांचा गोलू आज प्रथमच नाशकात येत होता. ती गर्दी… रहदारी, वाहतुकीचे सिग्नल… बघून तो हरखून गेला. रेडक्रॉस सिग्नलपासूनच यात्रेचा माहोल जाणवायला लागला. पोलीस आजूबाजूच्या लेनस् बॅरिकेटस् टाकून बंद करत होते. चांदवडकर लेन, दहिपूल भागांतील रस्ते स्वच्छ झाडून त्यावर मोठ्या, मोठ्या रांगोळ्या काढण्याची तयारी सुरू होती. गोलू हे सगळं अनिमिष…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण काही आसनं आणि त्याचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसनं आणि त्याचे फायदे पाहुयात. अर्ध हलासन अर्ध हलासन करताना पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळवे जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय हळूहळू वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि काही सेकंद थांबून हळूहळू श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवायचे. फायदे – शरीराची लवचिकता वाढते, श्वसनक्षमता वाढते. पोटाची कार्यक्षमता वाढते. पूर्ण हलासन हलासन हे प्रचलित आसन असले तरी त्याचा उल्लेख हठयोगाच्या कुठल्याच ग्रंथात नाही. 150 वर्षांपूर्वी जयतराम लिखित ग्रंथात ‘हालीपाव आसन’म्हणून वर्णन मिळते जे थोडेफार सध्याच्या हलासनाशी जुळते. त्यामुळे हलासन हे 150 वर्षांपूर्वी शोधले…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥35॥ हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥225॥ त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥227॥ निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥36॥ जरी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 22 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 06:36, पंचमी 28:33; नक्षत्र : उत्तर भाद्रपदा 10:32 योग : धृती 16:05; करण : कौलव 17:30 सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:07 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी काही बदल दिसायला लागतील, त्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहील. याशिवाय सहकाऱ्यांवरचा ताणही वाढेल. परंतु तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने…

Read More

चंद्रशेखर माधव तसं म्हणायला गेलं तर मला दोन मामा-मामी. पण कायम आठवण यावी आणि आवर्जून उल्लेख करावा अशी मामी एकच ‘मालती मामी’. दुसऱ्या मामा, मामीकडे आमचं येणं-जाणं होतं, नाही असं नाही. पण का कुणास ठाऊक, माझ्या मनाला तिथे कधीच स्वस्थता लाभली नाही. आमची मालती मामी म्हणजे प्रचंड उत्साह असलेली आणि अखंड काम करणारी व्यक्ती. माझी शाळा मामाच्या घरापासून खूपच जवळ होती. त्यामुळे रोज शाळा सुटली की, धावत रस्ता पार करून मामाकडे जायचं, हा ठरलेला कार्यक्रम होता. सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळेत असताना आई घ्यायला यायची. आई येईपर्यंत मामाकडेच बसायचं. माझी शाळेतून यायची वेळ झाली की, मामी रोज काही ना काही खायला…

Read More

सतीश बर्वे ह्यांच्या इच्छेनुसार त्यांचे सगळे दिवसकार्य घरच्या घरी छोट्या प्रमाणात केले आणि उरलेली रक्कम आलोकने त्यांच्या आवडीच्या संस्थेला शैक्षणिक मदत म्हणून दान दिली. एक आलोक सोडला तर, मुक्कामाला कोणी पाहुणे मंडळी अशी नव्हतीच. घरातला मुख्य श्वास कायमचा थांबला होता. आता हळूहळू ते अंगवळणी पडणार होतं. आलोक होता म्हणून मग मी तेव्हाच बॅंकेची कामं उरकून घेतली. जेणेकरून मला बॅंकेतून पैसे काढता येतील. इतकी वर्षे हेच सगळं बघत आले होते. पैसे मागितले की, हातावर मिळत होते दर महिन्याच्या अगदी ठरलेल्या दिवशी. मला एकटीला ते कदाचित जमलं नसतं. ह्यांच्या बाकीच्या गुंतवणुकीची माहिती मुद्देसूद लिहिलेली वही मी आलोकच्या ताब्यात दिली होती. तो परत…

Read More