Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    July 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जुलै 2026

    July 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेMarch 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, जीवनव्यवहार शिक्षण, खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण, शिशुगटातील जीवनव्यवहार,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या आणि पुढील दोन लेखांत आपण बालशाळेतील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत.

    जीवनव्यवहार म्हणजे काय?

    सोप्या भाषेत सांगायचे तर, जीवन व्यवहार म्हणजे आपण दैनंदिन जीवनात करत असलेली नित्य कामे, वागणूक आणि परस्पर संवाद होय. जीवनव्यवहार शिक्षणात मुलांच्या वयोगटानुसार त्यांना दिलेल्या विविध उपक्रमांचा समावेश होतो. तसेच, घरात देखील मुलांकडून लहान-सहान कामे करून घेतली जातात.

    बालशाळेच्या तीन गटांतील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेण्यापूर्वी जीवन व्यवहार शिक्षणातून मिळणारे फायदे जाणून घेणे नक्कीच यथार्थ होईल.

    जीवनव्यवहार शिक्षणाचे फायदे

    • श्रमप्रतिष्ठा : कोणतेही काम हलके नसते, त्यामुळे कोणतेही काम करताना लाज वाटता कामा नये, तसेच मुलांची तसेच मुलींची कामे यात भेदभाव बाळगू नये, या मूलभूत संकल्पना मुलांना लहानवयातच शिकवल्या जातात.
    • स्वयंशिस्त आणि नीटनेटकेपणा : मुलांना कोणतेही काम विशिष्ट पद्धतीने तसेच शिस्तबद्धरीतीने करण्यास शिकवतात.
    • मानसिक आनंद आणि समाधान : मुलांना स्वतः काम केल्याने मनातून आनंद आणि समाधान वाटते.
    • आत्मविश्वास : जीवन व्यवहाराच्या मूलभूत शिक्षणामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

    आता आपण खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत जाणून घेऊयात.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    खेळगटातील जीवन व्यवहार शिक्षण

    1. खेळगटातील मुलांना जीवनव्यवहार शिक्षणाच्या उपक्रमांतून पुढील गोष्टी शिकवण्यात येतात :
    2. चपला-बूट ओळीत ठेवणे.
    3. वर्गात दप्तर ठराविक ठिकाणी व्यवस्थित ठेवणे.
    4. आपले खेळ वर्गात सांगितल्यानुसार ठेवणे.
    5. शी-शूला जाऊन आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे.
    6. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे.
    7. सगळा डबा अजिबात न सांडता संपविणे.
    8. डब्यातील पदार्थांचा प्रत्येक घास चावून चावून खाणे.
    9. जेवण झाल्यावर चूळ भरणे आणि हात स्वच्छ धुणे.
    10. डबा दप्तरात व्यवस्थित ठेवणे.
    11. घरी जाताना आपले दप्तर घेणे.
    12. घरी जाताना स्वतःच्या चपला-बूट घालणे.

    वरील कृती वानगीदाखल दिल्या असून अशा अनेक आणि तत्सम गोष्टी मुलांना नक्कीच शिकवता येतील. वरकरणी वरील कृती सोप्या वाटत असल्या तरी, मुलांचे तीन वर्षांचे वय लक्षात घेता त्यांना तसे करणे सुरुवातीला जरा अवघडच असते. यामुळे मुले कित्येकदा चिडू आणि रागावू शकतात. तसेच, शिक्षिका आणि सेविका देखील वैतागू शकतात. अशा वेळेस त्यांनी न वैतागता मुलांना चुचकारून आणि प्रेमाने समजावून सांगत वरील कृती वारंवार करून दाखवाव्यात आणि करून घ्याव्यात. मुले विविध कृती व्यवस्थित करत आहेत, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नियमित सरावाने मुले शिकवलेल्या कृती व्यवस्थित आणि सफाईदारपणे करू लागतात. यातूनच मुलांच्या जीवनव्यवहार शिक्षणाचा श्रीगणेशा होतो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    थोडक्यात सांगायचे झाल्यास, खेळगटातील जीवन व्यवहार शिक्षणातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या पायाभरणीस आरंभ होतो.

    पुढील लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


     

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया

    July 4, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    By Team AvaantarJuly 19, 2026

    डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धिमान असतात फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रकार वेगळा असतो, हे सांगण्याचा…

    सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया

    July 4, 2026

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    July 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जुलै 2026

    July 24, 2026

    कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…

    July 23, 2026

    उमाला आलं होतं टेन्शन…

    July 23, 2026

    थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…

    July 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 371
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 502
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 798
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    July 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जुलै 2026

    July 24, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.