Author: Team Avaantar

कामिनी व्यवहारे ओला वाटाणा अर्थात मटारचे अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे मुलांना आवडतात. आजकाल बाजारात फ्रोझन मटार उपलब्ध असल्याने बाजारातून मटार आणून सोलायचीही गरज पडत नाही. फ्रीझरमधून तो काही काळ बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर आपल्या रेसिपीसाठी वापरायचा… याच मटारचे आज आपण पॅटीस कसे करायचे ते पाहू. साहित्य उकडलेले बटाटे – 5 ते 6 ताजा कोवळा मटार – 2 वाट्या किसलेले चीज – 1 वाटी खवलेला ओला नारळ – 1 वाटी चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी किसलेले आले – 1 टेबलस्पून हिरवी मिरची पेस्ट कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून लिंबाचा रस – 1 टेबलस्पून मीठ – चवीनुसार साखर – चवीनुसार फोडणीसाठी तेल…

Read More

ॲड. कृष्णा पाटील भाग – 2 बापाने दादूच्या बायको, मुलीला घराबाहेर काढले. गावातच दादूच्या एका मित्राच्या घरी रिंकू आणि आई राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धूरात वावरणारी मुलगी… गावी आलं की इथ ठेवू की तिथं ठेवू, अशी करणारी विधवा आत्या… मुंगळ्यासारखे चिकटणारे काका आणि आजोबा… अँसिडच्या धूरात घरच्यांसाठी बापाने उभी हयात घालवली. मिळवला तेवढा पैसा घरी दिला. पण करोडो रुपये ज्यांच्यासाठी खर्च केले त्यांनीच पाठ फिरवली! रिंकूला खूप वाईट वाटे… डोळे पाझरू लागत. बाप होता तोपर्यंत घरच्यांच रूप वेगळं होतं. माणसं इतकी नीच असू शकतात? जनावराच्या काळजाची असतात? रिंकूच डोकं भणभणायचं.  पण इलाज नव्हता. रिंकू तसेच सहन करीत होती. तिला राहून…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥331॥ पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥332॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥333॥ तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥ तरी विषयांतुही कांही । आपणपेंवाचुनि नाहीं । मग विषय कवण कायी ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 12:45; नक्षत्र : अश्विनी 13:57 योग : ध्रुव 17:04; करण : कौलव 23:21 सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पंचमी श्राद्ध भरणी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित…

Read More

दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 5 मिरजच्या मीरासाहेब दर्ग्याजवळ बाबांच्या रुपाने एक देव भेटला याचा आनंद झाला. देव मंदिरात नाही देव माणसात आहे… प्रत्येकाने माणसात देव शोधला पाहिजे. एकमेकांचा आत्मा जाणणे, हा पुण्याच मार्ग आहे. अन्नदान हे फार श्रेष्ठ दान आहे. हल्लीतर प्रत्येक तीर्थस्थळाच्या ठिकाणी महाप्रसाद भाविकांना दिला जातो, हे फार मोठे पुण्याईचे काम आहे. या प्रसादासाठी बरेच भाविक प्रसादासाठी मदत करतात. काही ठिकाणी प्रसादासाठी धान्य कोठून येते, हे कळतही नाही. माझ्या मते नरसिंह वाडी येथे गेली पाच वर्षं एक व्यक्ती प्रसादाचे जेवण देत आहे, ती व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. अशी दानधर्म करणारी माणसे भरपूर आहेत. दिवस…

Read More

सुनील शिरवाडकर आमच्या गल्लीत एक कुटुंब रहात असे, त्यांची ही कहाणी! कदाचित प्रातिनिधिक…!! अलीकडे बहुतांश ठिकाणी दिसणारी… तर या कुटुंबाचा चांगला भरभक्कम वाडा होता. आईवडील आणि चार मुलं… वडील याज्ञिक होते. त्यांचा वाडा म्हणजे काय? सागवानी लाकडात बांधलेला… ओसरी….चौक… पडवी… पडवीत टांगलेला झोपाळा… त्याच्या पितळी कड्या… याज्ञिकी करणारे ते काका, त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे. त्यांचा रुबाब काही औरच! त्यांचाच काय, सगळ्या कुटुंबाचाच रुबाब होता. त्यांचेकडे साजरे होणारे सण, त्यानिमित्ताने बाहेर निघणारी चांदीची भांडी… सोनं-नाणं… सर्वच रुबाब होता. तीन पिढ्यांच्या कहाणीतली ही पहिली पिढी… त्यांना चार मुलं. त्यातील एक माझ्याच वयाचा. त्याचं लग्न झालं आणि तीन-चार वर्षांत तो घराबाहेर पडला. त्याची…

Read More

माधवी जोशी माहुलकर भातावरचे पिठले हा एक भन्नाट स्वादिष्ट पदार्थ आहे. ‘वन पॉट मिल’ या संकल्पनेत हा पदार्थ चपखल बसतो. कमीत कमी वेळेत पोटभर आणि चविष्ट पदार्थ काय करता येईल, याचे उत्तर शोधतानाच अशा ‘वन पॅाट मिल’ असलेल्या बिर्याणी, गोळाभात, वडाभात, खिचडी, दाल खिचडी इत्यादी पदार्थांचा शोध लागला असावा. ‘भातावरचे पिठले’  हा देखील त्यापैकीच एक. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ कसा तयार करायचा ते! साहित्य तांदूळ – 1 वाटी बेसन – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 2-3 आलं – 1 इंच लसूण – 4 ते 5 पाकळ्या कोथिंबीरी – 1 वाटी कांदा – 1 (मध्यम आकाराचा) तिखट –…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखांमध्ये विविध प्रकारची योगासने पाहिली होती. आता बघूया सूर्यनमस्कार कसे करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते. सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा आणि उपासनेचा प्रकार आहे. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून शरीरात सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. श्वास घेण्याची क्रिया तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. सूर्यनमस्कारमध्ये बारा आसने आहेत. चला तर मग त्या बारा आसनांची नावे आणि त्यांचे फायदे बघूया. प्रत्येक आसन करताना श्वासाची गती लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रणामासन प्रणाम आसन म्हणजेच प्रार्थनेची पोझ. छातीसमोर दोन्ही हात जोडून उभे राहायचे. श्वासाची क्रिया…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोभिsजायते ॥62॥ क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥63॥ जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगीं प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥322॥ संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥323॥ कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 19 भाद्रपद शके 1947; तिथि : तृतीया 15:38; नक्षत्र : रेवती 16:03 योग : वृद्धी 20:31; करण : बव 26:11 सूर्य : सिंह; चंद्र : मीन 16:03; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34) तृतीया श्राद्ध चतुर्थी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ यांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र,कामाच्या ताणामुळे…

Read More