Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
चंद्रकांत पाटील मी रिटायर झाल्यानंतर माझ्यासमोर एकच टार्गेट होते… ते म्हणजे दोन नंबरच्या चिरंजीवांचं लग्न करणे, पहिल्याला काही कारणाने विलंब झाला होता म्हणून याचे लवकर बघायला सुरवात केली, मुली बघायच्या चालू होत्या… हा आयटी कंपनीत होता, चांगला पगार होता… पण नोकरी करता करता त्याने कधी काळी ऑस्ट्रिलियन व्हिजासाठी अर्ज केला होता आणि तो सहा महिन्यांपूर्वी त्याला मिळाला होता. पण घरात लग्नाची चर्चा सुरू आहे म्हणून तो बोलला नव्हता. पण त्याची जशी जशी मुदत संपत आली, तसे तो तिकडे जाण्याची घाई करू लागला. आम्ही दोघे नवरा-बायको म्हणालो, “अगोदर लग्न कर बाबा अन् मग जा! तसा तो थांबलाही चार महिने, पण लग्न…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥3॥ तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वता । भ्रांति न करीं ॥27॥ हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥28॥ तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥ तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 15 आश्विन शके 1947; तिथि : पौर्णिमा 09:17, प्रतिपदा 29:53; नक्षत्र : रेवती 25:28 योग : ध्रुव 09:31, व्याघात 29:34; करण : बालव 19:37 सूर्य : कन्या; चंद्र : मीन 25:28; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:23 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नानारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. पैसा बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकतो, त्यामुळे चांगले…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… हल्ली वेगवेगळे डेज (days) आपण साजरे करतो… काही लोक म्हणतात, ‘नसती कौतुकं!’ मला मात्र हे असले सगळे डेज् साजरे करायला आवडतात… असाच एके दिवशी माझ्या आयुष्यात ‘मदर्स डे’ आला. माझ्या लेकी म्हणाल्या, ‘आवडे (लाडात आल्या की, आईची ‘आवडी’, ‘आवडे’ होत असते!) आज आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूयात.’ शॉपिंग म्हटलं की, मी नेहमीच खूश असते. आम्ही तिघी निघालो… मॉलमध्ये गेलो… ‘Factory outlet’ जिथे 3500 ते 4000 रुपयांची जीन्स आम्हाला दीड हजार रुपयांना मिळाली. वेगवेगळ्या खूप जीन्स ट्राय केल्यानंतर मुलींना एक जीन्स परफेक्ट वाटली! काऊंटरवर गेलो, तशा लेकी म्हणाल्या, “हां, आई दे पैसे!” मनात…
रश्मी परांजपे ‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेअंतर्गत मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता याविषयी माहिती घेणार आहोत. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, असे आपण मानतो. त्यामुळे शाळा मंदिराप्रमाणेच स्वच्छ असणे नितांत गरजेचे आहे. तद्वतच, शाळेतील विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांची स्वच्छतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण एकंदरीत स्वच्छतेसंबंधित काही मुद्दे जाणून घेऊयात. शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक रचनेचे तसेच चांगल्या पद्धतीने रंगवलेले असावे. शिवाय, ते नेहमीच धुवून-पुसून धूळरहित आणि स्वच्छ ठेवावे. असे प्रवेशद्वार बघितल्यावर शाळेत प्रवेश करताना सर्वांचे मन सदैव प्रसन्न राहील. शाळेत वर्गाबाहेरील…
माधवी जोशी माहुलकर विदर्भात, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात गणपतीचे किंवा नवरात्रीचे भंडारे असोत, घरातील लग्नकार्य किंवा वाढदिवस असोत अशावेळी जेवणात मिरचीची भाकरी, भाजी ही आपले अव्वल स्थान टिकवून ठेवते. विशेषतः, ग्रामीण भागांमध्ये अशा कार्यक्रमांत मिरचीची भाजी आणि भाकरी आवर्जून केली जाते. इतकेच नाही तर, सुगीच्या दिवसांत तर शेतांमधून, मळ्यांमधून या मिरचीची भाजी आणि भाकरीच्या पार्ट्या होतात. मिरचीची भाजी ही थोडी पातळसर असते. अतिशय चविष्ट अशा या भाजीत भाकरी कुसकरून खाण्याची मजा कुछ औरच आहे. ही मिरचीची भाजी-भाकरी ज्याने एकदा चाखली तो याचा जबरदस्त फॅन होतो. या भाजीकरिता विदर्भातील अनेकजण स्वतः तर अशा पार्ट्या, भंडारे, लग्नांमध्ये हजेरी लावतातच, शिवाय आपल्या कुटुंबातील लोकांकरिता…
पराग गोडबोले ‘यशस्वी लघु उद्योजिकते’चा प्रथम पुरस्कार जाहीर झाल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात, लटपटती पावलं आणि घशाला पडलेली कोरड सावरत, ती व्यासपीठावर पोहोचली. सन्मानचिन्ह आणि झळाळता चषक स्वीकारताना एक मंद स्मित तिच्या चेहेऱ्यावर झळकलं… आणि काही क्षणांपूर्वीच्या गोंधळलेल्या अवस्थेतून ती अलगद बाहेर पडली. आयोजकांनी तिला गृहिणी ते उद्योजिका, या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगायची विनंती केली आणि नेहमीचाच आत्मविश्वास परतला तिच्या वावरण्यात. एवढ्या लोकांसमोर बोलायची, मनोगत व्यक्त करायची ती पहिलीच वेळ… पण साडी सावरत, ठाम पावलं टाकत, ती बोलायला उभी राहिली. समोर नवरा, लेक आणि सासू-सासरे बसले होते. त्यांच्यावर आणि इतर अनेक अनोळखी लोकांवर नजर फिरवत तिने घसा खाकरला… गणपतीबाप्पा, आयोजक आणि जमलेले हितचिंतक…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा श्रीभगवानुवाच : इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥1॥ मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥16॥ मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥17॥ मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥18॥ एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्टः…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑक्टोबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 14 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्दशी 12:23; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:01 योग : वृद्धी 13:13; करण : विष्टी 22:53 सूर्य : कन्या; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:24 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 कोजगरी पौर्णिमा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. दिवसभर व्यग्र रहाल आणि कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नवीन प्रकल्पावर…
डॉ. किशोर महाबळ शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून गेल्यावर अनेकदा असे लक्षात आले की, शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतून दरवेळेस तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले शाळेतील एक-दोन विद्यार्थी निवडले की, शाळेतील शिक्षकांना समाधान वाटते आणि मग तेच-तेच विद्यार्थी स्पर्धेत पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले विद्यार्थी शोधण्याचा शाळांनी जर नीट प्रयत्न केला तर, प्रत्येक शाळेत अगदी सहजगत्या असंख्य विद्यार्थी सापडतील. शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली तर, हे असंख्य विद्यार्थी सहजगत्या सापडतील. मात्र, त्यासाठी सर्वांना अशी संधी मिळावी, असा विचार शाळांतील शिक्षकांना करावा लागेल. शाळेतील सर्व मुला-मुलींना संधी मिळेल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 248
- अवांतर 175
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 514
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
