Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥29॥ तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥407॥ जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवें कर्मे करूनि । भजती मातें ॥408॥ ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझां ठायीं । आणि मी तयांचा हृदयीं । समग्र असें ॥409॥ सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥410॥ तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।…
दर्शन कुलकर्णी संत तुकाराम बीज वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी संशोधक नारायण गोविंद चापेकर टीम अवांतर मराठी संशोधक नारायण गोविंद चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट 1869 रोजी मुंबईत झाला. शिक्षण रेवदंडा (कुलाबा जिल्हा), पुणे आणि मुंबई येथे झाले. कायद्याचे पदवीधर झाल्यानंतर काही काळ वकिली करून त्यांनी न्यायखात्यात नोकरी पत्करली आणि 1925 मध्ये पहिला वर्ग न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. त्यांचे बरेचसे लेखन निवृत्तीनंतरच झाले. त्यांचे सुमारे वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी बदलापूरची सामाजिक दृष्ट्या संपूर्ण पाहणी करणारा, बदलापूर (आमचा गांव)… हा 1933 मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ विशेष गाजला. चित्पावन आणि चापेकर हे ग्रंथही असेच सामाजिक संशोधनात्मक म्हणता येतील. तर…
दीपक तांबोळी फाटकाचा आवाज आला, तसं मी दार उघडून बाहेर पाहिलं तर, एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता… “फुलं घेऊ का?” मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं. “हो घ्या ना…” तो फुलं तोडू लागला. तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो. मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रूमही चांगली आणि पटकन मिळाली. रूमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं… मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता, कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येताना आईने मला श्रीगुरुदत्तांचा फोटो घेऊन जायचा खूप आग्रह केला. सकाळी कामावर निघताना देवाला नमस्कार करून निघालं की, दिवस चांगला जातो, असं तिचं म्हणणं.…
प्रदीप केळुस्कर भाग – 1 अनंताने विलासच्या घरासमोर स्कूटर उभी केली आणि जोराने हॉर्न वाजवला. त्याचा हॉर्न ऐकून आतून विलासने ‘आलो.. आलो..’ म्हणत ओ दिली. अनंताचे लक्ष गॅलरीकडे गेले, तेथे विलासचे बाबा उभे होते. त्याने बाबांना हात दाखवला… बाबांनी त्याला हात दाखवला. “ये आत ये… दोन मिनिटे गप्पा मारू…” बाबा म्हणाले. “नाही ओ… आधीच उशीर झालाय, रविवारी येतो…” “दोघेही या, वाट पहातो…” “हो येतो…” तेवढ्यात विलास आतून आला आणि त्याच्या स्कूटरवर मागे बसला. गाडी चालवता चालवता अनंता बोलू लागला… “बाबा गप्पा मारायला बोलवत होते.” “त्त्यांचा वेळ जात नाही. सरोज शाळेत गेली म्हणजे घरी कोणी नसतं. पूर्वी आई होती तेव्हा दोघांचा…
रेवती निलेश पांडे आज खिडकीतून लहान मुलांना रंगात न्हाऊन निघताना पाहिलं आणि मन थेट बालपणातल्या त्या गल्लीत गेलं… खरंच, धुळवडीची खरी मजा त्या निरागस वयातच होती. ते वयच मुळी ‘फुलपाखरी’ असतं… मुक्त, स्वच्छंदी आणि रंगीबिरंगी… लहानपणी होळीची खूप मजा होती, धुळवड तर अगदी पहाटेपासूनच सुरू व्हायची प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला बाहेर ओढायचं आणि सगळेच आपला रंग त्याला लावण्यासाठी तुटून पडायचे… आमच्या गल्लीत एक छोटी टाकी होती धुळवडीच्या दिवशी त्यातही रंग टाकायचो आणि प्रत्येकाला त्या टाकीत ढकलून द्यायचं… सगळा नुसता धिंगाणा! जसं जसं वय वाढत गेलं, तसं धुळवडीचं स्वरूप जरा सोफिस्टिकेटेड व्हायला लागलं आणि आता हा रंगाचा खेळ फक्त एक ‘छोट्या…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ओपीडीत आलेले एक काका तक्रारी सांगितल्यानंतर माझ्या बाजूच्या एक्झामिनेशन टेबलवर पडायचं सोडून पलीकडच्या टेबलकडं गेले, त्यामुळं मला उठून पलीकडं जावं लागलं… “काय काका तिकडं होती की, रिकामी जागा इकडं का आलात?” मी सहज त्यांना विचारलं. “नको.. छ्याऽऽ अजिबात नको!” असं म्हणत काकांनी आधी तोंडावर बोट ठेवत नंतर दोन्ही कानाच्या पाळ्या पकडल्या… “का ओ?” मी कुतूहलानं त्यांना विचारलं. “मागं एकदा तिकडं चेक केलं, तुम्ही ही एवढी लंबीचौडी तपासणीची यादी लिहून दिली. नंतर पुन्हा एकदा आलो होतो तेव्हा सलाइन लावावं लागलं होतं… इथं बरंय. इथं तपासलं की, दोन डोसमध्येच बरं वाटतंय…” काका उत्तरले आणि त्यांचं अजबगजब तर्कट ऐकून मला…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥ येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कल । भक्तितत्त्व ॥396॥ म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं । तरी सहजें आपुलां मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥397॥ यत् करोषि यदश्नासि यज् जुहोषि ददासि यत् । यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् ॥27॥ जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी । अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥398॥ नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें । तपादि साधनें…
दर्शन कुलकर्णी वसंतोत्सव आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर टीम अवांतर प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि संगीतकार ज्योतिरिंद्रनाथ टागोर यांचा जन्म 4 मे 1849 रोजी जोरासाँको (कोलकाता) येथे झाले. ते देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध टागोर कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य होते. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे ते थोरले बंधू होते. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत ज्योतिरिंद्रनाथ यांचा मोठा हातभार होता. सुरुवातीला त्यांनी ललित कलांचे शिक्षण घेतले पण नंतर ते नाट्यगृहाकडे आकर्षित झाले आणि घरीच नाटकांचा सराव तसेच रंगमंचीय सराव करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडून दिले. त्यांचे चुलत भाऊ गणेशनाथ यांनी 1865 मध्ये जोरासांको नाट्यशाळेची स्थापना केली होती.…
डॉ. अस्मिता हवालदार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित या पुस्तकाचे पूर्ण शीर्षक ‘युद्ध जिवांचे : जैविक व रासायनिक संसर्गजन्य इतिहास’ असे आहे. ’संसर्गजन्य इतिहास’ का म्हटले असेल? कुतूहल वाटत होते. पुस्तक वाचू लागल्यावर मनुष्य जातीच्या क्रूरतेचा किती भयानक संसर्गजन्य रोग आहे, हे समजू लागते. माणसाचा इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. लेखक म्हणतो, “माणसांचे जीव वाचवायला शास्त्रज्ञ रोगप्रतिकारक औषधे बनवतात आणि तेच शास्त्रज्ञ माणसांचे जीव कसे घ्यायचे? यावर संशोधन करतात.” काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूची साथ आली होती. पुण्यात जास्त पसरला होता. तेव्हा लसी पण टोचून घेतल्या होत्या. इथपासून पुस्तकाची सुरुवात होते. रोगजंतू पसरवायचे, भीती निर्माण करायची आणि मग लसी, औषधे विकायची…
दिलीप कजगांवकर “सर, ओळखलंत का मला?” सदानंद सरांच्या घरात शिरत राजने विचारले. “राज, अरे शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी ना तू, तुला कसे विसरणार मी! तू कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस? लग्न केलंस का? बायको कुठली? मुलं किती?” “अहो, किती प्रश्न विचारता? तुम्ही तोंडी परीक्षा घेताहेत का? राज तुमचा माजी विद्यार्थी आहे आणि तुम्ही देखील निवृत्त झाला आहात…” सावित्रीबाईंनी सरांना वास्तवाची जाणीव करून दिली. “सर, मी पुण्याला एका आयटी कंपनीत काम करतो. तीन वर्षे अमेरिकेत होतो. एका मित्राच्या लग्नासाठी काल इथे नाशिकला आलो. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आज मुद्दाम थांबलो… सर, एक विचारू?” “विचार ना. प्रश्न विचारण्याची तुझी सवय…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 241
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 354
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
