Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांना अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सातत्याने सुधारणा होईल. आज कामात यश मिळवण्याचा दिवस असेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधक आज वरचढ ठरू शकतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वृषभ – वृषभ राशीसाठी दिवस संमिश्र असेल. संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ दिसेल, परंतु काही चिंता देखील वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.  नोकरी करणाऱ्यांना हा दिवस कामाशी संबंधित धावपळीने भरलेला दिसेल. तर  व्यावसायिकांना नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी आहेत. मिथुन –  कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. दीर्घकाळापासून…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…! शिस्त म्हणजे शिस्त… हे आपण लहानपणापासूनच ऐकत मोठे झालो. ‘खाण्यापिण्याचे लाड, पण बाकी ऐकलं नाही तर फटके मिळतील…’, लहानपणी सगळ्यांनीच हे ऐकले असेल. माझंही तसंच… सकाळी उठल्यावर बसल्या जागी देवाचे आभार मानून नमस्कार करायचा. आपल्या पांघरुणाची आपणच घडी घालायची. आन्हिक उरकून शाळेची तयारी स्वत:च करायची. फक्त केस खूप लांब होते म्हणून वेण्या तेवढ्या आईने घालून द्यायच्या… ही झाली घरातली शिस्त किंवा संस्कार म्हणा! शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, तसं मला शाळेत जायला आवडायचं… अभ्यास पण व्यवस्थित करायचे… चांगले मार्क्स पण मिळायचे, पण तरीही मला अभ्यास करायचा मात्र खूप कंटाळा असायचा. कसंबसं…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले जवळपास चार एक महिन्यांपूर्वीची ही गोष्ट असेल. ऑफिसच्या कामासाठी हल्ली खूप फिरावं लागतं. बऱ्याच वेळा मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी मुंबईबाहेर सुद्धा! अशीच एक चेन्नईची भेट संपवून पुण्याला जायला निघालो होतो. दुपारी साडेतीनचं उड्डाण होतं आणि त्याच्या दोन तास आधी तरी विमानतळावर पोहोचायचं होतं. उशिराच्या विमानांची तिकिटं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हे लवकरचं विमान! सकाळी पटापटा कामं उरकली आणि साधारण दुपारी एकच्या सुमारास मी आणि माझा सहकारी विमानतळावर पोहोचलो. सकाळी मस्त इडली, डोसे, पायसम वगैरे भरपेट न्याहारी केल्यामुळे भूक फारशी नव्हती. तरीही, चेन्नईतल्या नावाजलेल्या ‘अडयार आनंद भवन’ हॉटेलमधून सांबार-भात बांधून आणला होता, त्याचा फन्ना उडवला. सहकारी मुंबईच्या विमानाकडे वळला…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ॥37॥ नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥8॥ प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि । इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥9॥ जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगें ॥38॥ ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला राहील. नवीन प्रयत्नांना यश मिळेल, रखडलेले प्रकल्प गती घेतील. व्यवसायात नवीन बदल होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी वाढत्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वृषभ –  वृषभ राशीच्या जातकांसाठी आयुष्यात काही संकटे निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधकांची संख्या वाढल्याने अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात. शिवाय, सहकाऱ्यांकडून पाठिंबा न मिळाल्याने मानसिक ताण येऊ शकतो. घरगुती पातळीवर काही मतभेदांमुळे मानसिक ताण येऊ शकतो. मिथुन – आज कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. रखडलेल्या प्रकल्पांना…

Read More

डॉ. किशोर महाबळ प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य शिक्षकांनी करावे, अशी अपेक्षा असते. प्रत्येक विद्यार्थी हा क्षमता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता याबाबतीत इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा असतो, त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विकासात मदत करणे हे एक अत्यंत कठीण कार्य असते. यासाठी सातत्याने ज्ञानसाधना करणे, बौद्धिक क्षमता विकसित करणे हे सर्व शिक्षकांचे प्रधान कर्तव्य असते. या बौद्धिक प्रगतीचेही विविध पैलू असतील, त्या पैलूंचा आता विचार करूया. आपली बौद्धिक प्रगती व्हावी, अशी इच्छा असणारा शिक्षक, प्राध्यापक हा काय करेल? तो, त्याला अध्यापनासाठी दिलेल्या विषयाचा नेहमीच अभ्यास करेल. वर्गात जेवढे शिकवावे लागते, तेवढेच आपल्याला आले म्हणजे पुरे, असा…

Read More

माधवी जोशी माहुलकर दिवाळीमुळे घरी मिठाईचे इतके बॉक्स गिफ्ट म्हणून येतात की, त्या मिठाया खाणेही होत नाही आणि टाकूनही द्याव्याशा वाटत नाहीत. इतरांना उचलून द्यायची म्हटले तरी ती मिठाई न्यायला कुणी तयार होत नाही. अशा वेळेस त्यांचं काय करावं, काही समजत नाही. काजूकतली, अंजीर बर्फी, संत्रा रोल, सोनपापडी किंवा बंगाली मिठाई खाऊन खाऊन किती खाणार? आता गोड पदार्थांकडे पहावेसही वाटतं नाही! पण काहीही असो बाहेरून विकत गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी केलेलं केव्हाही चांगलंच! अशाच प्रकारे, करायला अतिशय सोप्या अशा खवा पेढ्याच्या पोळीची रेसिपी पाहूयात. साहित्य हेही वाचा – Recipe : मोगरी घातलेले बेसनाचे लाडू! कृती टीप एकूण कालावधी – 30…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥ सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रति काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥ पैं सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोन्हींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥28॥ यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥5॥ आणि सांख्यीं जें पाविजे…

Read More

दर्शन कुलकर्णी पांडव पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पंडित हृदयनाथ मंगेशकर टीम अवांतर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या हृदयनाथ यांनी वंशपरंपरेने आलेला संगीत वारसा, शास्त्रीय गायनासाठी उस्ताद आमीरखाँ यांचे पत्करलेले शिष्यत्व, आपल्या समकालीन संगीतकारांच्या रचनांचा केलेला अभ्यास आणि स्वतःची स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथ मंगेशकर यांची संगीतकार म्हणून एक वेगळी शैली निर्माण झाली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘निसदिन बरसत नैन हमारे’ आणि ‘बरसे बूंदिया सावन की’ या सारख्या भक्तिगीतांना स्वरसाज चढवला. संगीतकार सलील चौधरी यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. स्त्रीस्वरातील संगीतरचना हे त्यांचे…

Read More