Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
माधवी जोशी माहुलकर मिश्र भाज्यांचे कटलेट्स केले तर, ते लवकर संपतात, हा माझा अनुभव आहे. फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या थोड्याफार प्रमाणात उरलेल्या असतात, त्यामधे बटाटा मिक्स केला की, अफलातून चवीचे कटलेट्स तयार होतात आणि भाज्या न आवडणारी मुलेही फारसे प्रश्न न विचारता हे कटलेट्स भराभर संपवतात. यामुळे उरलेल्या भाज्यांचाही निकाल लागतो, मुलांच्याही पोटात भाज्या जातात आणि आपला उद्देश सफल होतो! यावेळेस मी यात लिटिल मिलेट्सचाही वापर केला. त्यामुळे एक वेगळीच चव निर्माण झाली. साहित्य हेही वाचा – Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ! कृती हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा! टिप्स एकूण कालावधी…
अध्याय सातवा किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥ हें असो परौतें । मग हो का आवडे तें । परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥149॥ येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥150॥ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥24॥ परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पैं पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥151॥ नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकांतें ॥152॥ हें ऐसें काइसेया…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – आपुलेची मरण पाहिले म्यां डोळा… दिनविशेष प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन टीम अवांतर ख्यातनाम संगीतकार राहुल देव बर्मन ऊर्फ आर. डी. बर्मन यांचा जन्म 27 जून 1939 रोजी झाला. आई मीरा देवी आणि ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन यांचे पुत्र आर. डी. बर्मन यांच्यावर लहानपणापासूनच रवींद्र संगीताचे संस्कार झाले. वयाच्या अकराव्या वर्षापासून ते माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवायला शिकले. ते वारंवार सरगम-मधला पाचवा स्वर ‘प’वर भर देत होते, ते ऐकून ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनी “ये तो पंचम सूर में बजाता है…” अशी प्रतिक्रिया दिली आणि तिथूनच ‘पंचम’ अशी…
दिलीप कजगांवकर “आई, आज मला शाळेतून घरी यायला उशीर होईल कारण, आज आमच्या गणिताच्या सरांचा निरोप समारंभ आहे…” अनेक मुला-मुलींनी त्यांच्या आईला हेच सांगितले. संस्थेच्या अध्यक्षांनी सरांचा सत्कार करताना सांगितले की, “आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपणा सर्वांच्या आवडत्या गणिताच्या सरांचा निवृत्तीचा दिवस. गेली अनेक वर्षे सरांनी आपल्या संस्थेच्या विविध शाळांमध्ये गणित हा विषय शिकविला. गणित हा विषय तसा शिकायला आणि शिकवायला अवघड, पण सरांनी हा विषय अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने शिकविला. त्यामुळेच आपल्या शाळेतील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविलेत.” सत्काराला उत्तर देताना सरांनी जे सांगितले ते अविश्वसनीय होते. सरांनी ग्रॅज्युएशनलाच नव्हे तर मॅट्रिकला सुद्धा…
आराधना जोशी चार दिवसांच्या सलग सुट्टीनंतर परत ऑफिसला जाणं अर्णवच्या खरंतर जीवावरच आलं होतं. त्यातच गोव्यातील एका लग्नाला उपस्थिती लावून मुंबईत घरी परतायला पहाटेचे दोन वाजले होते. त्यामुळे “आजही सुट्टी टाकावी आणि झोप पूर्ण करावी का? त्यासाठी बॉसला कारण काय सांगायचं?” असे प्रश्न अर्धवट झोपेत असलेल्या अर्णवच्या मनात सुरू होते. तेवढ्यात गॅलरीतून बेडरूममध्ये येत सागरिका म्हणाली, “अर्णव अरे, सोसायटीत काहीतरी गडबड झाली आहे. सोसायटीच्या गेटवर बरेचजण जमले आहेत. जरा बघ नं काय झालं आहे ते.” हे ऐकून अर्णवने आधी मोबाईलवर सोसायटीच्या ग्रुपवर काही कोणी पोस्ट केलं आहे का, ते अर्धवट झोपेतच चेक केलं. तिथे कोणतीही पोस्ट नव्हती. “नसेल गं काही…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. विवेक वैद्य प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. आता माझा एक मित्र आहे, त्याने लग्नच केले नाही. तो आम्हा सगळ्या संसारी मित्रांना म्हणतो मी तुमच्यापेक्षा सुखी आहे. आम्हीही ते मान्य करतो, पण आमचा एक वात्रट मित्र त्याला म्हणतो, “भले तू आमच्यापेक्षा सुखी असशील, पण स्वर्गसुख म्हणजे काय? हे तुला मरेपर्यंत समजणार नाही.” तर, ते असो. माझ्याही सुखाच्या कल्पना काही खूप मोठ्या नाहीत… मी छोटया गोष्टीत सुख शोधतो. आता सकाळी बायको भेंडी किंवा ढेमसे किंवा शोपालक अशी आपल्याला न आवडणारी भाजी करणार असते… “ती भाजी मला आवडत नाही. तू दुसरंही काही कर,” हे सांगण्याची हिम्मत आपल्यात नसते. आपण बाहेरून दुपारी येऊन…
अध्याय सातवा जयाचिये प्रतीतीचा वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137॥ येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टी -। मंद जाले ॥138॥ कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥20॥ आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139॥ ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥140॥ आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥141॥ कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि…
दर्शन कुलकर्णी शाकंभरी पौर्णिमा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. कामाचा खूप ताण असेल. आज प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली जाणार नाही, याची काळजी घ्या. एक अयोग्य शब्द संपूर्ण दिवस खराब करू शकतो. तुम्हाला कामावर पुढाकार घ्यावा असे वाटेल आणि ते योग्य आहे, परंतु प्रथम परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वृषभ – आज तुमची सर्वात मोठी ताकद संयम आहे. जे घाईघाईने वागतील त्यांच्याकडून चुका होतील आणि तुम्ही मात्र त्यातून शिकाल. पैशाबद्दल जास्त विचार कराल. एखादा जुना खर्च किंवा जबाबदारी यांची आठवण होईल. कुटुंब किंवा जवळच्या मित्राची साथ मनाला शांती देईल. आज कोणतीही गोष्ट…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोशाबरोबरच बाकरवडी, सामोसे आणि सँडविच बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ अन् बरंच काही… हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
