Author: Team Avaantar

सतीश बर्वे आज अचानक सदा आठवला. खरंतर, काही कारण देखील नव्हतं. सदा म्हणजे दापोलीला माझ्या मित्राच्या मूळ घरी गाईम्हशींचा गोठा सांभाळणारा. गेल्यावर्षी माझा तरुण मित्र मंदार मला हट्टाने दापोलीला घेऊन गेला होता चार दिवस विश्रांतीसाठी. तिथे पहिल्यांदाच भेटला सदा. साधारण चाळीशीच्या आसपास असणारा युवक. गुडघ्यापर्यंत लांब असलेली ढगळ अर्धी चड्डी आणि टीशर्ट घालून… गाडीतून उतरल्या उतरल्या मला पहिलं कोण सामोरे गेले असेल तर तो सदा होता. “नमस्कार दादानू…” मला आणि मंदारला हात जोडून नमस्कार केला त्याने. “मोठे दादा सकाळीच बोलले तुम्ही येताय असं, तेव्हापासून सडकेवर कानोसा घेत होतो तुमच्या गाडीचा…” सदा आमच्या बॅगा घेऊन आत गेला. मी ओसरीवरच्या ऐसपैस झोपाळ्यावर…

Read More

पराग गोडबोले एकदा ऑफिसमधून निघायला बराच उशीर झाला होता. लोकलचा प्रवास नकोसा वाटत होता म्हणून कॅब केली. आशिष डाXXरे असं नाव आलं… मराठी नाव. छान वाटलं. गाडी आली, बसलो, निघालो… छान गाडी होती, नवी वाटत होती. मान मागे टेकून थोडा सैलावलो. न झोपणाऱ्या, न थकणाऱ्या मुंबईला मागं टाकत आम्ही मुक्त मार्ग म्हणजे फ्री वेला लागलो वडाळ्याजवळ… आता गाडी सुसाट निघाली. मी पण थोडा ताजातवाना झाला होतो. तेवढ्यात आशिषचा फोन वाजला… “मुंबईत आहे, बारा वाजतील घरी यायला. आल्यावर जेवेन. तू झोप, नको जागी राहूस माझ्यासाठी” म्हणून त्याने फोन बंद केला. “बायको का?” “नाही आई. रोज 10 वाजले की फोन सुरू होतात.”…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु । तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥275॥ जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसी । जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥276॥ म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु । एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥277॥ गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् । प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥18॥ हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥278॥ आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये । जो घेऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥279॥ तो…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज मन थोडे विचलित होऊ शकते. परिणामी, कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे घाई न करता, काम हळूहळू पूर्ण करा. अनपेक्षित खर्च होऊ शकतो, म्हणून पैसा जपून वापरा. घरातील कोणीतरी नाराज असेल, पण ते मनावर घेऊ नका. कौटुंबिक जीवनात समोरच्याचे काळजीपूर्वक ऐकल्याने भांडण टाळता येईल. आज आरोग्य उत्तम राहील, फक्त पुरेशी झोप घ्या. वृषभ – नोकरीच्या ठिकाणी कामे सामान्यपणे होत राहतील. वरिष्ठांकडून दबाव कमी होईल.  अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो, पण हाती पैसा टिकणार नाही. म्हणूनच बचतीवर भर द्या, तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने गुंतवणूक करा. मित्र किंवा नातेवाईक जे सांगतात…

Read More

शोभा भडके भाग – 15 दागिन्यांची खरेदी तर झाली होती. आता त्यांचे कपडे खरेदी करायचे होते. निदान आता तरी रामने यावं, असं सियाला वाटत होतं. ती तिच्याच विचारात होती तर, इकडे शिव आणि आरू त्यांच्या त्यांच्या… “मी काय म्हणते तू जावईबापूंना बोलावून घे आणि तुम्ही चौघे कपड्यांची खरेदी करा. मी घरी जाते, घरी बाकीची पण तयारी करायची आहे.” सुधा यांनी आपल्या मुलीच्या मनातलं ओळखल होतं जणू! म्हणून त्या लग्नाआधी या चौघांना देखील पुन्हा एकदा बोलता यावं, यासाठी त्या तसं म्हणाल्या. “नाही मॉम, त्याची काही गरज नाही. मी पण तुझ्यासोबत घरीच येते. नियाला सांगेन माझे कपडे घरीच घेऊन यायला. मी घरीच…

Read More

सुधीर करंदीकर सगळेच जण आपापल्या आवडींप्रमाणे व्हॅलेंटाइन डे हा दिवस साजरा करत असतात. माझा यावर्षी हा दिवस असा होता… व्हॅलेंटाइन डेला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात जवळची मैत्रिण, म्हणजे बायको, तिला ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’ केले. मी रोजच सकाळी कारण शोधून बायकोला शुभेच्छा देत असतो. अगदीच काही कारण नसेल तर, हॅपी सोमवार वगैरे… असे पण विश करतो. बायको खूश असेल तर दिवस छान जातो, हा माझा आजवरचा अनुभव! सकाळचे खाणे आटोपले आणि घराच्या बाहेरच्या बागेत झाडांना पाणी घालायला बायको बाहेर गेली. मी काहीतरी किरकोळ काम करत होतो. तेवढ्यात बायकोचा बाहेरुन आवाज आला, “अहो, ग्लासभर गरम पाणी प्यायला देता का?” हेही वाचा -…

Read More

माधवी जोशी माहुलकर पालकाचे वरण, डाळभाजी, पालक पनीर, मुगाची डाळ घालून नाहीतर लसणाच्या पाकळ्या वापरून पालक लसुणी अशा भाज्या तसेच पालक पुरी, पराठे, पुलाव वगैरे तर प्रकार नेहमीच होतात, परंतु पालक आणि कांद्याच्या हिरव्या पातीचे रायते तुम्ही कधी करून पाहिले आहे का? नसेल केले तर, खाली दिलेल्या पद्धतीने करून पाहा निश्चितच तुम्हाला ते आवडेल, याची मला खात्री आहे. साहित्य हेही वाचा – Recipe : साबुदाणा, भगर, बटाटा पॅटिस विथ ग्रीन चटणी! कृती हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे! तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या…

Read More

मेष आठवड्याची सुरुवात आनंदात होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद टाळावा. शांततेत निर्णय घ्या. तुमचे अंदाज बरोबर येतील. गुरूची साथ मिळेल. व्यावसायिक वर्गाला महिन्याच्या शेवटी लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, पटकन विश्वास ठेवून कोणाला पैसे उसने देऊ नका. भावंडांबरोबर घालवलेला वेळ महिलांना संस्मरणीय ठरेल. विद्यार्थ्यांना पॉकेटमनी वाढवून मिळेल. वृषभ या आठवड्यात शुभ घटना घडतील. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी चतुराईने वागावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तथापि, सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. व्यावसायिक वर्गाला नवीन गुंतवणूकदार मिळतील; त्यांच्या अटी नीट समजून घ्या. करार करताना अतिशय सजग राहून सही करा. कुटुंबात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांचा उत्साह दुणावेल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् । मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥16॥ तोचि जाणिवेचा उदयो जरी होये । तरी मुदल वेदु मीचि आहें । आणि तो विधानातें जया विये । तो ऋतुही मीचि ॥265॥ मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटें पांडवा । तोही मी गा ॥266॥ स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥ होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें । आणिक हुतक जें जें । तेही मीचि ॥268॥ पिताSहमस्य जगतो माता धाता पितामह: । वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्सामयजुरेव च ॥17॥ पैं जयाचेनि अंगेसंगें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे टीम अवांतर ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला. एम.ए., पीएचडी, मास्टर ऑफ ड्रामॅटिक्स अशा पदव्या संपादन केलेल्या डॉ. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 23 नाट्य महोत्सवांचे आयोजन केले होते. 200 पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या याचे शिक्षण दिले. सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर रेशीमगाठी आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पैंजण अशा दोन चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या. ‘प्रतिकार’ हे त्यांचे एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले.…

Read More