Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी दर्श अमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनही आनंदाने भरलेले असेल. एखाद्या प्रिय मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ असेल. वृषभ – ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा मोठा ताण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, पैसे जास्त खर्च होतील. वडिलांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल, त्यामुळे राग नियंत्रित करा. मिथुन…
माधवी जोशी माहुलकर माझी आई सुगरण होती. तिने केलेला रोजचा साधा स्वयंपाकही खूप रुचकर असायचा. मसालेदार भाज्यांचे प्रकार असो किंवा नैवेद्याचे कांदा-लसूणविरहित पदार्थ असोत तिच्या हातच्या स्वयंपाकाला कशाचीच सर येत नसे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बाजरीची खिचडी! ही खिचडी करण्यात तिचा हातखंडा होता. ती बाजरीची खिचडी आणि कढी इतकी सुंदर करायची की, खाणाऱ्याने बोटं चाखत राहावी आणि पोटभर खाऊन देखील अतृप्त रहावे! साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात कृती हेही वाचा – Recipe : बटर फणस हंडी टीप्स एकूण कालावधी – साधारणणे एक तास पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या…
चंद्रकांत पाटील आमच्या गावाच्या दोन्ही बाजूने नदी वाहते आणि तिसर्या बाजूला ओढा आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की, त्या ओढ्यातून पाणी मागे जाते आणि सगळ्या गावाला वेढा बसतो. गावातून बाहेर जाता येत नाही. पाटील भावकीच्या सगळ्या जमिनी ओढ्याच्या काठावर आहेत. पूर आला की, ऊस पाण्याखाली जातो… पाणी जास्त दिवस राहिले की, उसाचे भरपूर नुकसान होते आणि शेतकरी आणखी नुकसानात जातो. त्यामुळे दरवर्षी एखादा तरी शेतकरी कर्जामुळे आपले जीवन संपवितो! सुभानराव पाटलांची बहीण साताऱ्यात राहात होती… तिचे मिस्टर पीएसआय होते. त्यांना दोन मुली… थोरली शकू आणि दुसरी शेवंता. शकू दिसायला छान आणि चारचौघीत उठून दिसणारी होती. ती मामाची आणि आजीची खूपच…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥ तैसा अर्जुनुचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला ॥130॥ जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥ तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनी आली ॥132॥ हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी…
दर्शन कुलकर्णी शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. नवीन ठिकाणांना भेट द्याल. मित्रांचा सहवास तुम्हाला फ्रेश करेल. स्पर्धेत बाजी माराल. नव्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणू शकता, त्यामुळे त्यांचा वापर सर्जनशील कामासाठी करा. मात्र कोणतेही नवीन काम आज सुरू करू नका; चांगल्या वेळेची वाट पहा. आज धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. वृषभ – आजचा दिवस चांगला असेल. घरातील सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यांमध्ये रस घ्याल. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी खास करायचे असेल तर, हा योग्य काळ आहे. तथापि, राग आणि खर्च यावर नियंत्रण ठेवा.…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… ‘आठवते का?’… ‘विसरलीस का?’… बरोब्बर आजचा एपिसोड आहे आठवणींचा! आठवणी – बालपणीच्या, तरुणपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि हळूहळू वार्धक्याकडे प्रयाण करतानाच्या… छोट्या मोठ्या, विस्मरणात गेलेल्या घटना सुद्धा! एका खूप मोठ्या माणसाची आठवण… ते एका मोठ्या पक्षाचे खूप मोठे नेते होते. माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना दादा आणि त्यांच्या पत्नीना वाहिनी म्हणायचे. दोघेही एवढे मोठे असून सुद्धा खूप साधे… अगदी साधारण म्हटलं तरी चालेल! दादा तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांना नावानिशी ओळखतात. काही काळ मी आणि माझा नवरा त्यांच्या कॉन्टॅकमध्ये बराच काळ होतो. अचानक तीन-चार वर्षे सरली आणि पुन्हा एकदा दादांच्या भेटीला मी गेले.…
यशःश्री जोशी बाजारात सध्या ताजे, रसरशीत आवळे मोठ्या प्रमाणात येत आहेत. थंडीत रात्रीच्या जेवणासाठी याच आवळ्यापासून तयार केलेले गरमागरम रसम आणि भात हा बेत एकदा करून बघा. आवळ्याचे सूप म्हणून देखील या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 20 मिनिटे हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा…
पराग गोडबोले साडेपाचचा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणे तो दहा मिनिटं snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. पाच चाळीसला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखेपिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून… नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, ‘किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.’ पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं, पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता… चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना… तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन… हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जया सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥ विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरि मग काय कीजेल । एकलेया ॥116॥ दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥117॥ आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥118॥ इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि…
दर्शन कुलकर्णी सोमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस शुभ आणि सकारात्मक राहील. तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. आज अनेक संधी मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळू शकतो. वृषभ – करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाची संधी मिळू शकते. व्यवसायातून चांगला फायदा होईल. राजकारणात सहभागी असलेल्यांना एक महत्त्वाची संधी मिळू शकते. आज काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा, पथ्ये पाळा. मिथुन – दिवस शुभ राहील. नवीन ध्येय साध्य करण्यासाठी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 175
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 515
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
