Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल? (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. विवेक वैद्य मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यावेळेची गोष्ट. साल 1985. सरांबरोबर ओपीडीत होतो, त्यावेळेस रिसेप्शनिस्टने निरोप दिला, ‘डॉक्टर विवेक, तुमचा फोन.’ यावेळेस कोणाचा फोन बाबा? घरी तर कालच बोलणे झाले होते! “हॅलो…?” “हॅलो, डॉक्टर विवेक?” “बोलतोय” “अरे, मी अज्या बोली हायनू. अजय पाटील…” “अज्या! आज कसं काय आठवण काढी भो…” “अरे, आम्ही मुंबई येयल शेतसं. कामना वास्ते. कुठे काई जॉब व्हई तर सांग.” “आम्ही म्हणजे? आखो कोण येएल शे तुना संगे?” “शिवदासबी शे संगे.” “अरे, पण एकदम कसं काय उनात? आणि राव्हानी खावानी सोय?” “मामा शे डोंबीवलीमा. त्यानाकडे उतरेल शेतस…” “बरं. तुम्ही कालदिन अठे या. मग तपास…
अध्याय आठवा अर्जुन उवाच : किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥1॥ मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें । जें म्यां पुसिले । ते निरूपिजो ॥1॥ सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥2॥ अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे । हें उघड मी परियेसें । तैसें बोला ॥3॥ अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥2॥ देवा आधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं । हें अनुमानासि कांही । दिठी न भरे ॥4॥ आणि नियता अंतःकरणी…
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कठोर परिश्रमांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामुळे कोणत्याही सक्रिय विरोधकांवर मात करण्यास मदत होईल. आज अनोळखी लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो. मात्र अशा काही अनावश्यक समस्या उद्भवू शकतात, ज्या नफ्यावर परिणाम करतील. अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वृषभ – आज विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अतिउत्साह आणि घाई यामुळे अपयश येऊ शकते. काही आर्थिक आणि कौटुंबिक दबावांचा सामना करावा लागेल. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली बातमी मिळू शकते. काही जुन्या मित्रांना भेटू शकता. जोडीदार आणि संतती यांच्याशी संवाद साधा, सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तब्येतीकडे लक्ष द्या. मिथुन – कुटुंबाकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल,…
हिमाली मुदखेडकर जानेवारीचा महिना सुरू झाला की, चंद्रपुरच्या वरोऱ्याचे दिवस आठवल्याशिवाय राहात नाही. Electrolux कंपनीच्या क्वार्टर्समध्ये तेव्हा आम्ही राहात होतो. रस्त्याच्या दुतर्फा इटालियन आर्किटेक्चर पद्धतीने बांधलेल्या छोटेखानी सदनिकांची ही इलेक्ट्रॉलक्सची कॉलनी खूप छान पद्धतीने बांधलेली होती. दर चार क्वार्टरमध्ये एक सुंदर लॉन मेन्टेन केलेले होते. शिवाय, घरांच्या भोवताली आंबा, पेरू, जास्वंद, लिंबू, कढीपत्ता अशी झाडे लावलेली होती. यातील एका लेनमधील क्वार्टर्समधून आम्ही दहा-पंधरा नवविवाहित जोडपी राहात होते. ज्याचे त्याचे कुंकवाचे धनी न्याहारी करून कंपनीत गेले की, मग आम्ही सगळ्या जणी लॉनवर किंवा एखादीच्या अंगणात एकत्र जमत असू. गप्पटप्पा, गमतीजमती खूप चालत. जानेवारी महिन्यात एखाद्या शनिवारचा किंवा रविवारचा बेत ठरायचा. आदल्या…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल, जाणून घ्या टिप्स – हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा… हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
अध्याय सातवा एर्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोंलों लाहाती ॥198॥ परि तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥ कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥200॥ तेविंचि अर्था चाड मज आहे । ते सांगताही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥201॥ ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविंचि माजि शिरवुनी । आर्ती आपुली ॥202॥ कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदी शिंव । एर्हवीं कृष्णहृदयासि खेंव ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात चांगला नफा मिळेल, भौतिक सुखसोयी वाढतील. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देऊन, त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर फायदा होईल. गैरसमाजातून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. कायदेशीर खटले जिंकू शकता. विद्यार्थ्यांचा दिवस आनंदी असेल, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. वृषभ – भागीदारीत एखादा प्रकल्प सुरू कराल, ज्यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण कराल, ज्यामुळे इतर प्रकल्पांमध्ये पुढे जाता येईल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. महत्त्वाच्या कामात काही बदल होतील, त्याचे सकारात्मक परिणाम आनंद देतील. घर किंवा कार्यालय यांचे नूतनीकरण करण्याचा विचार होऊ शकतो. मिथुन – नोकरीच्या…
डॉ. किशोर महाबळ शिक्षण, शिक्षणाचा आशय, शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाकडून अपेक्षा, यश याबद्दल आईवडिलांची मते, विचार आणि दृष्टिकोन काय आहे, यावर ते आपल्या मुलांना कसे शिक्षण देतील, हे ठरते. शिक्षणातून काय साध्य व्हावे असे आजच्या पालकांना वाटते? काही अपवाद वगळता बहुसंख्य पालकांना आपल्या मुलाने फक्त डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावेसे वाटते. त्यांची ही इच्छा ते आपल्या मुलाच्या मनावर लहानपणापासूनच ठसविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मुलांनाही हळूहळू तेच उत्तम वाटू लागते. चांगल्या वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे, हेच असंख्य मुलामुलींच्या शालेय शिक्षणाचे, मग एकमेव उद्दिष्ट होते. या प्रवेशासाठी आवश्यक त्या परीक्षांमध्ये खूप गुण मिळविणे आवश्यक असते. त्यासाठी अशा परीक्षांमध्ये भरपूर…
मयुरेश गोखले सन 1500 ते 1700 या दरम्यानच्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे तसेच काही चांगली बातमी मिळाली किंवा कोणी खूप मोठे कार्य केले तर त्याचा सन्मान म्हणून 21 तोफांची सलामी देत असत. आजच्या जगातही मला असे काही थोर पुरुष सापडले आहेत जे 21 तोफांची सलामी घेण्यास पात्र आहेत. आपल्यालाही या थोर पुरुषांची मी ओळख करून देतो. तुम्हाला कधी ते भेटले तर त्यांचे अभिनंदन करायला विसरू नका! पहिला थोर पुरुष म्हणजे आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून आपली बायको, पोरं यांना गाडीपाशी उभं करून हे महाशय जवळच्या पानटपरीवर सिगरेट, गुटखा…
