Author: Team Avaantar

मयुरेश गोखले सकाळी ऑफिसमध्ये जाताना रस्त्यात वाहतूक खोळंबली होती. मेट्रो ट्रेनच्या कामामुळे हल्ली रोजच रहदारीचा सामना करावा लागतो. मेट्रोच्या व्यवस्थापनाला दोष देत रस्ता कापत जात होतो. तेवढ्यात कळलं की, रहदारीचं खरं कारण मेट्रो नसून 10 वीचे बोर्डाचे पेपर आहेत! सर्व पालकवर्ग आपल्या मुलांना परीक्षा केंद्रात सोडून बाहेर गेटवर थांबला होता… काही तिथेच कार पार्क करून कारमध्ये बसले होते. आपल्या 10 वीतल्या मुलांची अतिकाळजी घेणाऱ्या पालकवर्गाला दोष देत मग परत मी रहदारीतून मार्ग काढणे सुरू केले. आणखी थोडं पुढे गेल्यावर एक बस अगदी हळूहळू पुढे जात होती आणि तिच्यामागे गाड्यांची लांब रांग लागली होती. रहदारी खोळंबण्याचं खरं कारण आता सापडलं होतं.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकल्या आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहुयात (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार) [L1]

Read More

गजानन देवधर रेल्वेगाडीतून प्रवास करणं म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे… तो एक अनुभव असतो, आपल्या जगण्यातला एक तुकडाच असतो. अनेकदा रेल्वेच्या डब्यात बसताना खिडकीबाहेर झरणार्‍या पाऊसधारा पाहिल्या, जवळची पोळी खाताना शेजारी बसलेल्या प्रवाशाने दिलेली राजस्थानी लोणच्याची चव घेतली, अनोळखी माणसांशी चार शब्द बोलता बोलता त्या क्षणापुरते ओळखीचे झालो. धडधडत्या रुळांवर जाताना फक्त गाडीच नाही तर, जुन्या आठवणीही धावत असतात… लहानपणीच्या खिडकीच्या जागेसाठीची भांडणं, चाय-चाय असे ओरडणारे विक्रेते, पूर्वी गाडीत सोलापूरी चादरींचा लिलाव करणारे विक्रेते आणि एखाद्या काही मिनिटांच्या थांब्यातही मनात साठवून जाणारे काही प्रसंग… आज मी अशाच काही रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगणार आहे – अजूनही मनाच्या एका…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥243॥ इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥244॥ मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिवसितां न दिसे ॥245॥ बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे । तोही शक्तिसवें संचरे । मध्यमेमाजी ॥246॥ तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांकडून एखाद्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी राहतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, याकडे लक्ष द्या. वृषभ – सोपी पद्धत आणि समन्वय यामुळे कामात प्रगती कराल. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. सुसंवाद साधण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. कामातील अडथळे दूर कराल. एकंदर आरोग्य चांगले असेल. मिथुन – नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामात सुलभतेने…

Read More

दीपक तांबोळी पॅसेंजरने उतरून मी स्टेशनबाहेर आलो. डॉक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भूक लागली होती. मी स्टेशनजवळची हॉटेल्स पाहिली, पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं, त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एक-दोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता… शिवाय, मला भूकही लागली होती! माझी पावलं आपसूकच त्या हॉटेलकडे वळली. हॉटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं, पण तरीही…

Read More

हिमाली मुदखेडकर मला अजूनही आठवतोय तो दिवस… कसा विसरणार? सतरा वर्षे झाली आज! पण अजूनही ती आठवण… ती कळ शांत होत नाही… टीव्हीवरील न्यूज पाहून हात-पाय लटपटले माझे… ताबडतोब मामाला फोन लावला… तो उचलेना म्हणून मामीचा नंबर डायल केला… ती बिचारी तिच्या घरगुती कामात मग्न! तिला कशाचा सूतराम पत्ता नाही… “मामी… अगं श्रेयस कुठाय?” “सकाळीच गेलाय तो आज. लवकर जायचे होते त्याला… आज फॉरेन डेलिगेट्स यायचे होते म्हणे व्हिजिटसाठी…” ती निवांतपणे उत्तर देत होती!… आणि तिला कसं सांगू हे मला कळत नव्हतं.. आमचा श्रेयस… लहानपणापासून शेफ होण्याचे स्वप्न त्याचे… आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती त्याने… सर्वसामान्य मध्यमवर्गात जन्माला आला…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं अनेकदा लोक अशी चर्चा करतात की ‘डॉक्टर’ म्हणजे जणू एक वेगळीच स्पिशिज आहे… ते कधी आजारी पडतच नाही किंवा औषधोपचार म्हणजे पेशंटवर प्रयोगच वगैरे वगैरे.. पूर्वी लोकं खिळा टोचला तरी मरायचे आणि डास चावला तरीही! पण अनेकांच्या अथक प्रयत्नातून, वैद्यकशास्राच्या प्रगतीमुळं मानव समूह तुलनेत कितीतरी अधिक सुरक्षित झालाय. आज अशाच एका धाडसी डॉक्टरची गोष्ट सांगतो… ऐंशीच्या दशकात अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वेटिंगरूममध्ये पोटदुखीचे पेशंट मोठ्या प्रमाणात असायचे. जठराला अल्सररूपी जखम झालेली असायची, त्यामुळं काही खाल्लं तरी पोट दुखायचं आणि उपाशी राहिलं तरी पोट दुखायचं. वेदनाशामक (Painkillers) तरी किती खायचे? डॉक्टर मंडळींनी या अल्सरचं नामकरण ‘स्ट्रेस…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥ मुखींचां ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी ।आरोगूं लागे ॥230॥ जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥231॥ मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥ आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुऊनि जडी । पांजरेंशीं…

Read More

दर्शन कुलकर्णी चंपाषष्ठी / स्कंदषष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि प्रगती दोन्ही घेऊन येणारा असेल. अनेक दिवसांपासून पूर्ण न झालेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा, राग आज तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो. संयम राखला तर दिवस तुमच्या बाजूने असेल. वृषभ – हा दिवस वृषभ राशीसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी दिलासा देईल. आज महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या मनःस्थितीत असाल. जुन्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा सहकाऱ्याकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. घरात शांती आणि समाधान राहील. मोठी खरेदी करण्याचा मोह होऊ…

Read More