Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
हिमाली मुदखेडकर कोणते नाते म्हणू हे, ना टाळणे ना गुंतणे का तरी माझे तुझे हे, सोबतीने चालणे… इयत्ता सहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघी पहिल्यांदा भेटलो. तिच्याच घरी तिच्या घराची वास्तुशांत होती. मी आजीसोबत गेले होते. माझ्यापेक्षा दोनच वर्षानी मोठी होती ती… पण घरातील सगळी कामे अशी काही चटाचट करत होती की, मी पाहातच राहिले! स्वयंपाकघरापासून ते आला-गेला पाहुण्याचे आगतस्वागत… पूजेची तयारी… कुणाला काही हवे नको… सगळे एक हाती सांभाळले होते तिने. “रजनीSSS…हे कुठे ठेवलंय…?” “रजे… त्या अमुक माणसाला किती पैसे द्यायचे?” “रजनी डाळ कोणत्या डब्यातून घ्यायची?” “पूजेची पान-सुपारी कुठे ठेवली आहे?” “पंचपाळे भरून ठेवले का?” “दाराला तोरण लावले का?”…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
विवेक वैद्य सुशीलाला रात्री अचानक थंडी वाजू लागली. तिने एसी बंद केला तसा अमोल उठला आणि विचारले… “का गं? काय झाले?” “काही नाही रे, एसी नको वाटतो.” “Ok” कूस पालटून तोही झोपला आणि तिही. सकाळी अमोल उठलेला तरी सुशीला झोपलेलीच! त्याने कपाळावर हात लावला तर, गरम वाटले. तो ताडकन उठला. भराभर स्वतःचे आवरून त्याने मस्त आले टाकून चहा केला. तिला उठवले आणि क्रोसिनची गोळी आणि चहा दिला… मग भराभरा कालची घासलेली भांडी आवरली. कामवाल्या बाईला फोन करून लवकर यायला सांगितले, त्याच वेळेस शेजारच्या काकूंकडे येणाऱ्या स्वयंपाकी बाईलाही आली की, पाठवायला सांगितले. मग पुन्हा येऊन सुशीलाचा ताप बघितला… तिला बरे वाटले…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा आइकें प्राणाचा हात धरूनि । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादरेहूनि । हृदया आली ॥271॥ ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥ जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ॥273॥ हें असो ते कुंडलि । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥274॥ शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नवीन व्यवसाय करार होतील. कोणाशी तरी वाद किंवा भांडण होण्याचा धोका असेल. ज्यांना हितचिंतक मानता तेच लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मानसिक आणि शारीरिक थकवा येईल. घाईघाईत निर्णय घेताना चूक होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च सामान्य राहील. वृषभ – गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील का, याबद्दल साशंकता राहील. तथापि, निराधार शंकांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. मिथुन – व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. रिअल इस्टेट…
संगीता भिडे (कमल महाबळ) काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी काही जाऊनि बैसती प्रभुपदी, पापापदा वारी ते एखादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते। कोणी पर्वत आपुल्या शिरी धरी हेमप्रभा शीतला कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला कोणाला वनदेवता वरितसे मोहात जी नाहते एखाद्यामधुनि परंतु जळती ज्वाला नदी वाहते । झाडे जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते! चाले खेळ असा जगात, बहुदा सौख्यात सारे जरी एखादा पडतो तसाच चुकुनी, दुःखार्णवी यापरी पाही कोण अशा हताश…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन् खमंग चकली बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा ते आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ॥256॥ तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥257॥ हो कां जे शारदियेचिये वोले । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥258॥ तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ॥259॥ वृद्धाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा…
दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. व्यापाऱ्यांना आज व्यापारात काहीअंशी घाटा होऊ शकतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. जोडीदाराचे भरभक्कम पाठबळ मिळेल. वृषभ – एखाद्या मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिके मिळतील. वाद, संघर्ष टाळा, अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबातील एका सदस्याच्या आजारपणामुळे आर्थिक चिंता येऊ शकते. कुटुंबातील गरजांना पूर्ण करताना तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत. परंतु, आज तुम्ही स्वतःसाठी वेळ घालवू…
नितीन फलटणकर भाग – 2 केतन घाई-घाईने घरात येतो… सायंकाळचे पाच वाजलेले… दाराच्या मागेच बूट काढून डेस्कवर चावी आणि गळ्यात लटकणारी लॅपटॉप बॅग ठेवतो. आज घरात कुणीच नसते.. केतकी ऑफिसवरून परतलेली नाही. किरणही अजोळी गेलेला. आज त्याचा मूड चांगला आहे. तो तसाच कपडे चेंज करून बरमुडा टी-शर्ट अडकवून थेट किचनमध्ये घुसतो. सातच्या सुमारास दार वाजतं. केतकी आलेली… तो फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून ती अर्धी रिकामी करतो आणि केतकीकडे पहातो. तिच्या हातात एका बाजूला लटकवलेली पर्स तर दुसऱ्या हातात भाज्यांनी भरलेली एक जड पिशवी असते. ती फक्त डोळे मोठे करून केतनकडे पाहाते. तसा केतनला इशारा कळतो. तो पाण्याची बाटलीचे झाकण न…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 175
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 514
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
