Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज योग्य ती ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमच्यात दिसेल. व्यापारात आजचे नफ्याचे प्रमाण बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कामाच्या बाबतीत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. विद्यार्थी दिवसभर मोबाइलवरच असतील, ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. वृषभ – प्रलंबित देणी आल्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस पाहुणचार घेतला तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुमचा फायदा होईल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि जोडीदारामध्ये काही कारणांनी कुरबुरी सुरू होत्या त्या आज संपतील. मिथुन – आरोग्याची काळजी घेणे अत्यंत…
स्नेहा सुतार भाग – 3 बसमध्ये चढल्यावर तिला मीटिंगच्या ठिकाणी पाण्याची बाटली विसरल्याचं आठवलं. पुन्हा बसमधून खाली उतरून तिने बेकरीत जाऊन दहा रुपयांची नोट पुढे केली आणि ‘बिसलेरी’ म्हणून ती तशीच उभी राहिली. काऊंटर पलीकडे कानात बाळी घातलेल्या गोरेल्या पोऱ्याने ‘ठंडा या नॉर्मल मॅडम?’ विचारलं तेव्हा नजर वर करून तिने ‘नॉर्मल’ म्हटलं आणि त्याने नवीन पॅकेजमधली एक बाटली काढून तिला दिली. हातात बॉटल आल्याबरोबर तिने कुणाकडे न बघता सरळ बस गाठली आणि तशीच मागची सीट पकडली. सर्वांपासून अलिप्त. सलीलचा गळा पुन्हा इअरफोनमधून गायला लागला… “बंध मनाचे जुळले…” बस अजून बहुतेकशी रिकामीच. बॅगमधून वेटवाइप्स काढून तिने हात चांगले पुसून घेतले. पिशवीत…
शोभा भडके भाग – 10 सकाळी नेहमीच्या वेळेत उठून शिवने आपलं आवरलं आणि तयार होऊन ऑफिसला जायला निघाला. त्याने आकाशला कॉल करून आजच्या कामाच्या डिटेल्स मागून मीटिंगची तयारी करायला सांगितली. ब्लेझर अंगावर चढवून, तो हातात वॉच घालत होता, तोच दारावर टकटक झाली… आणि त्यापाठोपाठ सिया आत आली… “दि… ये ना…” शिव तिच्याजवळ जात तिला आत घेऊन आला. खरंतर, त्याला तिच्याशी बोलायचं होतं रात्रीच! पण तिला वेळ द्यायला हवा, असा विचार करून त्याने बोलणं टाळलं होतं. पण आता ती स्वतःहूनच आली होती… तसं तर त्याला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती, पण या वेळेला दीपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं… “हां बोल ना दि, काही…
माधवी जोशी माहुलकर मिसळीचे वरण किंवा मिश्र डाळींचे वरण हे महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्याच भागात घरोघरी बनत असेल. तूर, मूग, मसूर, उडीद, चणाडाळ आणि असेल तर चवळीची डाळ असे मिश्रण असलेले खमंग तसेच आले-लसूण पेस्ट, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तमालपत्र, दालचिनी वापरून केलेले मसालेदार वरण ज्वारीच्या भाकरीसोबत भुरके मारून खाताना किती खातोय ते समजतच नाही. आज मी खूप दिवसांनी हे वरण केले; कारण नागपूरमध्ये सध्या थंडीने परत एकदा जोर पकडला आहे, त्यामुळे अशा वातावरणात हे तडकेदार वरण आहारात असलं तर सहजच शरीरात उर्जा निर्माण होते. थंडीमध्ये असे गरम पदार्थ चालून जातात. हे वरण थोडे पातळसरच करावे, त्यामुळे तुम्हाला ते बाऊलमध्ये घेऊन सूप…
अध्याय आठवा यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥11॥ सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणियेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥100॥ चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥ तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ॥102॥ म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ।।103॥ आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि ।…
दर्शन कुलकर्णी दर्शअमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – दिवाळी पहाट अन् फोन कॉल… दिनविशेष प्रसिद्ध गायक कुंदनलाल सेहगल टीम अवांतर प्रसिद्ध गायक आणि चित्रपट अभिनेते कुंदनलाल सेहगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सेहगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांना घेता आले नाही.…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. साधारणपणे 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान महिलांमध्ये menopause अर्थात रजोनिवृत्तीचा काळ येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, त्यावेळी स्त्रीची मासिक पाळी कायमची थांबते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होणारी ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया, हा आजार नाही. सलग बारा महिने मासिक पाळी आली नाही म्हणजे menopause असे समजले जाते. Menopause च्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे शरीरात आणि मनात अनेक बदल जाणवतात. प्रत्येक महिलेला वेगळी वेगळी लक्षणे जाणवू शकतात, काही सामान्य लक्षणे अशी आहेत – रजोनिवृत्ती (menopause) हा आजार…
डॉ. विवेक वैद्य झोपलेलो होतो आणि फोन खणखणला. (पूर्वी लँडलाइन खणखणायचा, आता मोबाईल किणकिणतो. असो.) “हॅल्लो…” झोप मोडल्याने मी वैतागलेलो. “सुप्रभात.” समोरून आवाज येताच माझी झोप खाडकन् उडाली. हे आमचे चुलतकाका. “अरे, अभ्यंगस्नान झाले की नाही?” “नाही. आत्ताच उठतोय…” मी ओशाळून म्हणालो. “अरे, नरकात जाशील. दिवाळीच्या दिवसात झोपतोय कसला?” मी घाबरून बाहेर बघितलं. अजून अंधारच होता. लवकर उठायचे म्हणून अलार्म लावला होता, तोही अजून वाजला नव्हता. बापरे! काका काय तीन वाजताच उठले की काय? “नाही… ते मुलं रात्री उशिरा आले गावी दिवाळीसाठी, म्हणून उशीर झाला.” “मुले उठली का नाही?” “नाही. ते प्रवास करून आले, थकले असतील.” “विवेक, तू काहीच वळण…
डॉ. किशोर महाबळ सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संगणकाच्या माध्यमातून माहितीच्या महाजालात म्हणजे इंटरनेटमध्ये प्रवेश करता येतो आणि अक्षरशः कोट्यवधी विषयांची माहिती, संकल्पना, सिद्धांत, विचार, ज्ञान, कल्पना यांचे ज्ञान मिळविणे आता कोणालाही सहज शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सुविधेची उपयोग करणारी व्यक्ती अशाच सुविधेचा उपयोग करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तीशी, संस्थेशी, लोकांच्या गटाशी काही क्षणांत सहजगत्या संपर्क साधू शकते. तसेच, इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्तीव्यक्तींमध्ये, गटागटांमध्ये, संस्थांमध्ये आणि राष्ट्राराष्ट्रांमध्ये क्षणार्धात हव्या तेवढ्या माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होऊ लागले आहे. आता कोणत्याही विषयाचे मर्यादित स्वरूपात का होईना, पण ज्ञान मिळविणे हे कोणालाही सहजगत्या शक्य होऊ लागले आहे. या इंटरनेट क्रांतीमुळे…
अध्याय आठवा कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद् य: । सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥9॥ जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥86॥ जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें । जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ॥87॥ जें सर्वांतें यया विये । सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥88॥ देखें वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर जेथ न सरे । जें देहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ॥89॥ सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं ॥90॥ प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्…
