Author: Team Avaantar

डॉ. विवेक वैद्य तो ऑफिसमधून आला आणि सोफ्यावर बसला. तशी घाईघाईने त्याची बायको एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्याचवेळी मोबाईलवर “हे आले आहेत. नंतर करते फोन…” म्हणाली. “काय ग कोणाचा फोन?” “माझ्या आईचा होता!” “काय म्हणतात सासूबाई?” “काय म्हणतील? वहिनीशी रोज भांडणं होतात. कंटाळून गेली आहे अगदी. आता जरा अतिच झाले आहे… दादाही काही बोलत नाही वहिनीला…” “असं? चहा घेऊ आणि जाऊन येऊ तुझ्या माहेरी!” “आत्ता? पन्नास किलोमीटरवर आहे माहेर… जवळ आहे का?” “कार आहे आपल्याकडे… तासभराचा रस्ता…” हेही वाचा – …अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला! आपला नवरा सीरियसली बोलतो आहे का, की असंच? तेच तिला कळेना. त्याच्या…

Read More

अध्याय सातवा ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये । मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥12॥ जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं ॥53॥ हें जाले तरी माझां ठायीं । परी ययामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नींचां डोहीं । जागृति न बुडे ॥54॥ नातरी रसाचीचि सुघट । जैशी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥55॥ मग तया काष्ठाचां ठायीं । सांग पां बीजपण असे काई । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसें ॥56॥ पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – काही अपूर्ण कामे आज पूर्ण होतील. अनावश्यक धावपळ टाळणे चांगले. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. कामात योग्य सोयीसुविधा मिळाल्याने वातावरण सकारात्मक राहील. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये योग्य सल्ला आणि पर्याय यांचा समावेशही असेल. वृषभ – कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आशा आणि उत्साह यामुळे कामाचा उरक वाढेल. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे गिफ्ट म्हणून मिळू शकतात. हा आनंदाचा आणि उत्साहाचा काळ असेल. मिथुन – कामातून लहान-मोठा नफा मिळाल्याचा आनंद होईल. महत्त्वाची कामे पूर्ण…

Read More

अजित गोगटे भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. सरकारनेच 1989 मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल, याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. मात्र, भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे, असेच म्हणावे लागेल. रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल आणि मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याची कमाल क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. रेल्वे प्रशासनाला ही कमाल क्षमता केंद्र सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते. प्रवाशांची आणि…

Read More

भाग – 5 तिचं लक्ष आता त्याच्या खांद्यावरून लटकणाऱ्या केळ्याच्या लोंगराकडे गेलं… “इतक्या सकाळी तुम्ही ही केळी आणायला गेला होता?” मग त्याच क्षणी पाठीवर असलेल्या बॅगकडे पाहून विचारलं, “…आणि ही पाठीवर बॅग कसली आहे?” तिच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांनी तो थोडा वैतागला. त्याने तिरकस कटाक्ष टाकत तिच्याकडे पाहिलं. कपाळावर सौम्यशी आठी उमटली… शिवा शांतपणे म्हणाला, “नदीवर गेलो होतो, येताना दिसली ही केळी. वाटलं, तुलाही भूक लागली असेल म्हणून घेऊन आलो.” त्याच्या स्वरात एक साधेपणाचं, नि:स्वार्थतेचं सौंदर्य होतं. तो पाठीवरची ती मोठी बॅग काढत म्हणाला, “ही पखाल आहे. पाणी भरण्यासाठी वापरतात.” “पखाल!” तिच्या ओठांवर नवा शब्द अलगद टेकला. नकळत तो तिच्या…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये इडली आणि डोशाबरोबरच कटलेट आणि केक बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा! (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय सातवा ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ॥42॥ मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा । तैं तयाचा उपेगु बरवा । देखशील ॥43॥ परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांचां ठायीं तप । तें स्वरूप माझें ॥44॥ बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ते मी ॥45॥ भूतांचां ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥46॥ एर्‍हवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसें । परी धर्मासि वेखासें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आनंदाचा असेल. मात्र आज कागदपत्रांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. कोणताही नवीन उपक्रम हाती घेण्यापूर्वी कायदेशीर बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. वृषभ – आजची सुरुवात चांगली होईल. दिवसाच्या पूर्वार्धात व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवण्याची संधी मिळेल. एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर, आज ती जिंकू शकता. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत करावी लागेल. कौटुंबिक आघाडीवर आजचा दिवस शुभ असेल. मिथुन – इतरांच्या भावना ओळखून त्यानुसार वागलात तर मोठे आत्म-समाधान मिळेल. अधूनमधून इतरांचेही ऐकण्यात काहीच गैर नाही. ऑफिसमध्येही, कठीण समस्या सोडवण्याची टीमवर्क…

Read More

मयुरेश गोखले रात्री 2 वाजता तहान लागली म्हणून श्रीरंग पाणी प्यायला उठला… त्याला झोप लागत नव्हती. शेवटी कंटाळून तो गॅलरीत आला. रातकिड्यांचा आवाज आणि मधूनच दूरून येणारे गाड्यांचे आवाज सोडून सगळीकडे शांतता होती. तो आकाशात चांदण्या बघत बसला आणि मनात विचार सुरू झाले… कॉलेजमध्ये असताना रात्री अभ्यास करायला मित्राच्या घरी जायचा, तेव्हा त्याची या चांदण्यांशी ओळख झाली होती. आपली पण अशीच एक सुंदर चांदणीसारखी मैत्रीण असावी, असा विचार करत किती वेळ तो चांदण्यांकडे बघत बसायचा. म्हणतात ना की “किसी चीज को शिद्दत से चाहो तो… वगैरे” त्याचप्रमाणे त्याला पण खरंच त्याच्या मनासारखी एक सुंदर मैत्रीण मिळाली. दोघांचं ट्युनिंग खूप छान…

Read More

आराधना जोशी कोकमाच्या सारासाठी साहित्य भातासाठी साहित्य पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी तयारीसाठी लागणार वेळ – साधारणपणे 20 मिनिटे पाककृती करण्यासाठी – 40 मिनिटे एकूण वेळ – एक तास कृती भाताची पेज आणि वाफाळता भात कोकमाचे सार हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More