Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
पराग गोडबोले काल बायको गेली तिच्या सख्यांबरोबर जिवाचं अलिबाग करायला आणि रविवारी सकाळी मी आणि लेक दोघेच घरात! ‘धुडगूस घालू नका, पसारे करू नका, मोलकरीण येईल तिच्याकडून काम करून घ्या, अंथरूणांच्या घड्या घाला, मशीन लावून कपडे नीट वाळत घाला…’ अशा असंख्य सूचनांचा भडिमार करत एकदाची ती गेली. शनिवारी तिला तिच्या मैत्रिणींच्या ताब्यात दिलं, डोंबिवली स्टेशनवर आणि मी सुटकेचा निश्वास सोडला, अर्थात तिच्या नकळत! पूर्वी फोन नव्हते, तेव्हा एक बरं होतं. एकदा दृष्टीआड झाली की, परत येईपर्यंत छान मोकळीक असायची, डोक्याला फार ताप नसायचा… हल्ली सतत, केव्हा फोन वाजेल किंवा व्हिडीओ कॉल येऊन कपडे कसे वाळत घातलेत ते दाखव, ओटा आवरलाय…
अध्याय आठवा येरी जीवभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥27॥ म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥28॥ ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥29॥ अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥4॥ आतां अधिभूत जे म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥30॥ तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥31॥…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज आत्मविश्वासाने भरलेले असाल. कामाच्या बाबतीत जलद निर्णय घ्याल आणि बहुतांश निर्णय बरोबर असतील. ऑफिसमध्ये तुमचे कठोर परिश्रम दिसून येतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मन हलके आणि मजबूत होईल. वृषभ – आजचा दिवस स्थिरता आणि विश्रांतीचा आहे. संयमाने तुमचे काम करा. आज कौटुंबिक मार्गदर्शन मिळेल, एखाद्या कायदेशीर खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने येईल. आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्या. नातेसंबंधांवरील विश्वास वाढेल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन – दिवस व्यग्र राहील. संभाषणे, बैठका यामुळे तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येऊ शकतात. अनपेक्षित खर्च…
स्नेहा सुतार भाग – 2 संध्याकाळचे 4:50 वाजले. आजचं सगळं काम तर आवरलंय. आता स्वतःला पण आवरूया म्हणून ती उठली. दुपारपासूनची मीटिंग चांगली झाली. कितीतरी नोट्स झाले मीटिंगमधून. सतत डोकं कामात राहिलं की, बरं असतं. तो थोडावेळ तरी डोक्यातून बाजूला राहतो! अधूनमधून डोकावला तरी पुन्हा कामावर फोकस करता येतो. माणसात असली की, तिला हे जमतं आणि म्हणूनच कदाचित ती माणसात जात नसावी जास्त! तिला सवय झालीये आता त्याच्या विचारात विरघळून जायची. ‘त्याने असं का म्हटलं?’, ‘तो असा का वागला…?’ आणि गम्मत म्हणजे सगळं ठीक असलं त्यांच्यात की, हा त्रास नसतो जाणवत. उलट, आता सगळं बस! हा असाच वागणार, याला माझं…
शोभा भडके भाग – 9 सुधा सियाजवळ जाऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला… तसं ती उठून आईच्या मांडीवर डोक ठेऊन झोपली आणि परत रडायला लागली… “शांत हो बाळा… मला कळतंय बाळा, तुला किती त्रास होतोय ते… मी एक आई म्हणून कमी पाडले गं, मला माफ कर…” – सुधा. “आई असं नको गं म्हणू! तुझी काहीच चूक नाही. हे माझं नशीबच होतं, त्यात कोणाचा दोष नाही… पण आई आता मला माझ्या मनासारखं जगायचंय गं! मला माहीत आहे शिव जे काही करतोय ते माझ्यासाठीच; पण आई… ” – सिया. “शुss काही बोलू नकोस… आणि कसलाच विचार करू नकोस! नशीब म्हणतेस ना…
माधवी जोशी माहुलकर मला साबुदाण्याच्या उसळीसोबत / खिचडीसोबत उपवासाची बटाट्याची भाजी आवडते. माझी आई ही भाजी नेहमी एक तर बटाट्यांच्या पातळ चकत्या तर कधी उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी करून तुपाच्या फोडणीत हिरवी मिरची आणि दाण्याचे कूट, थोडं तिखट, चवीपुरती साखर आणि मीठ, लिंबाचा रस घालून चकत्या किंवा बटाट्याच्या फोडी खमंग होईपर्यंत परतून घ्यायची. मीपण आईप्रमाणेच ही भाजी नेहमी करत असते, परंतु आज बेबी पोटॅटोची दह्यातली ही भाजी करून पाहिली आणि या उपवासाच्या भाजीतला हा ट्विस्ट मस्त जमला. बेबी पोटॅटो दह्यात मॅरिनेट करून ते खमंग शिजवल्यानंतर त्यांची चव आणि रुपडेच पालटले! साबुदाण्याच्या उसळीसोबत छोटा बटाटा खायला मजा येत होती! साहित्य हेही वाचा…
मेष या आठवड्यात कामाची खूप गडबड होईल. यासाठी वेळेचे नियोजन गरजेचे आहे. नवीन जबाबदारीमुळे नोकरदारांचा काम समजून घेण्यात जास्त वेळ जाईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यावसायिक वर्गाने नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा; व्यवसायात जास्त गुंतवणूक करू शकाल. कुटुंबात मंगलकार्य ठरेल; त्याच्या तयारीत महिला उत्साहाने सहभागी होतील. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींबरोबर सहलीचा बेत आखतील. वृषभ या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नोकरदारांची बदली झाली असेल तर, नवीन कामात रुळायला वेळ लागेल; दिशाभूल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गासाठी भांडवलाची सोय होईल, त्यामुळे कामाला गती येईल. पैसे जपून वापरा; ज्या कामासाठी घेतले आहेत, त्यासाठीच खर्च करा. पाहुणे गेल्यामुळे महिलांना घर सुने…
अध्याय आठवा श्रीभगवानुवाच – अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ॥3॥ मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥15॥ एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें । परि गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥16॥ जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ॥17॥ आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥18॥ ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥ मग गगनी जेविं निर्मळे । नेणों कैंची एक…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – कथा शिवदासची, रंगली मुंबईत! दिनविशेष ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वि. स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1998 रोजी सांगली येथे झाला. खांडेकरांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ या टोपण नावाने कविता तर ‘आदर्श’ या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले रमणीरत्न हे त्यांचे नाटक अप्रकाशित आहे. ‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा 1923मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह तर, हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी. 1936 साली प्रकाशित झालेला वायुलहरी हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होता. खांडेकरांचे…
डॉ. किशोर महाबळ अनेक शाळांमध्ये राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) पथक असते. ज्या शाळांमध्ये असे पथक नसेल त्या शाळांनी असे पथक शाळेत असावे, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. या पथकातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास पोषक अशा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. पथकातील विद्यार्थ्यांना दर रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर, विशिष्ट क्रीडांगणावर व्यवस्थितरित्या परिधान केलेला विशिष्ट गणवेष घालून कवायतीसाठी पोहोचावे लागते. अत्यंत कडक शिस्तीत कवायत आणि पथसंचलन तसेच, छात्रसेना प्रमुखाच्या सर्व आदेशांचे विनातक्रार, काटेकोरपणे पालन करावे लागते. पाऊस, थंडी किंवा उष्ण हवामान असले तरीही संपूर्ण शैक्षणिक वर्षात दर रविवारी कवायतीसाठी जावेच लागते. याशिवाय वर्षातून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या दहा दिवसांच्या हिवाळी शिबिरात भाग घ्यावा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 245
- अवांतर 173
- आरोग्य 91
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 359
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
