Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जुलै 2025, वार : गुरुवार भारतीय सौर : 12 आषाढ शके 1947, तिथि : अष्टमी 14:06, नक्षत्र : हस्त 13:49 योग : परीघ 18:34, करण : बालव 27:17 सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या 27:18, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचा ताण थोडासा थकवा आणू शकतो. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय नवीन उंची गाठू शकतो.…
अजित गोगटे प्रसार माध्यमांना लोकशाहीतील ‘चौथा स्तंभ’ म्हटले जाते. याचे कारण असे की, या माध्यमांच्या अस्तित्वालाच मुळात सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्वाचे पायाभूत अधिष्ठान असते. हल्लीच्या काळी व्यापारीकरण तसेच सातत्याने उन्नत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या माध्यमांची व्याप्ती खूप वाढली असली आणि त्यांचे स्वरूप आमूलाग्र बदललेले असले तरी त्यांच्या अस्तित्वाची मूळ तात्विक बैठक पूर्वीचीच आहे. माहिती आणि विचारांचे सशुल्क वितरण-प्रसारण करणे, असे या व्यवसायाचे स्वरूप असते. माहितीचा स्रोत आणि माहितीचा उपभोक्ता यांच्यामधील दुवा म्हणजे ही माध्यमे. या व्यवसायाचे वेगळेपण असे की, या दोन्ही टोकांशी माध्यमाचे नाते केवळ पुरवठादार आणि ग्राहक / उपभोक्ता एवढेच नसते. ही माध्यमे या दोहोंचे प्रतिनिधित्वही करतात. स्रोतांकडून माहिती घेताना…
आराधना जोशी सध्या प्रसिद्ध होण्यासाठी काय काय फंडे अवलंबले जातात. खरंतर, प्रसिद्धी या शब्दामागे चांगल्या अर्थाने समाजात नाव होणं, हा अर्थ अभिप्रेत असतो. मात्र, ‘निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी’ असंच चित्र आजकाल दिसत आहे. 12 वर्षं एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बीएमएम अर्थात पत्रकारिता शिकवत होते. दोन वर्षांपूर्वी तो पेशा मी सोडला. पण त्यावेळी एक लक्षात आलं की, पत्रकारितेचं प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के विद्यार्थ्यांना झटपट प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करायचं असतं. वृत्तवाहिनीत काम करताना आपल्याला ‘कॅमेरासमोर काम करायची इच्छा असल्याचं’ हे विद्यार्थी सतत बोलून दाखवायचे. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला आपण चारचौघांमध्ये उठून दिसावं, समाजात आपली वेगळी ओळख असावी, असं वाटत…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 11 आषाढ शके 1947, तिथि : सप्तमी 11:57, नक्षत्र : उत्तरा 11:06 योग : वरीयान 17:45, करण : विष्टी 24:59 सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, त्या व्यवसायाशी संबंधित अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. पैशाशी संबंधित…
चंद्रशेखर माधव स. प. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतानाची राजमाची येथील घटना. साल सुमारे 1995 किंवा 1996 असावं. आम्हा तीन मित्रांचा राजमाचीला जाण्याचा बेत ठरला. शनिवारी निघायचं आणि रविवारी संध्याकाळी घरी परत यायचं असा प्लॅन आखला. जाणारे आम्ही तिघेच होतो, त्यामुळे निघतानाच उशीर वगैरे होण्याची शक्यता नव्हती. सकाळी सकाळी लोणावळा लोकल पकडली. लोणावळ्याला उतरल्यावर चालायला सुरुवात केली. जून-जुलैच्या आसपासचे दिवस होते. पाऊस खूप पडत होता. साधारण संध्याकाळ 4 वाजेपर्यंत राजमाची गावात पोहोचलो. पोहोचल्यावर तिथे गावातच एक घरात मुक्कामाची सोय करुन घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोन्ही किल्ले पाहण्याकरिता बाहेर पडलो. आमचा यजमान चांगला होता. आम्ही किल्ल्यावर जातोय म्हणण्यावर आमच्यासोबत त्याने…
सीए रसिका महाबळ परिचय भारत सरकार दरवर्षी नागरिकांकडून प्रत्यक्ष कर (आयकर – Income Tax) स्वरुपात उत्पन्नाचा एक भाग गोळा करते, ज्याचा वापर सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी होतो. करदात्यांनी स्वतःहून आपली आर्थिक माहिती सरकारला सादर करावी, यासाठी ‘आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)’ हे माध्यम आहे. प्रथमच रिटर्न भरणाऱ्यांना प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते, म्हणूनच हा लेख त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर आहे. आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा एक फॉर्म आहे, ज्याद्वारे आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर/ इन्कम टॅक्स विभागाला सादर करता. यात वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती, खर्च, सूट (exemptions), वजावट (deductions), कर आणि अधिभार…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 10 आषाढ शके 1947 तिथि : षष्ठी 10:20, नक्षत्र : पूर्वा 08:53 योग : व्यतिपात 17:17. करण : गरज 23:54 सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह 15:50 सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. भावंडांच्या मदतीने धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. व्यावसायिकांसाठी…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशातील नक्षत्रांचा वापर केला असेल, असा अंदाज येतो. आतापर्यंत तीन लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती पाहूया. मघा : या नक्षत्राची चांदणी फारच प्रखर असल्यामुळे हे नक्षत्र लगेच ओळखता येते. पुष्य नक्षत्राच्या थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास आकाशात एक टपोरी चांदणी दिसेल. व्यवस्थित निरीक्षण केल्यास त्या तारकासमुहाच्या चांदण्यांना धरून एक विळ्याची आकृती तयार होईल. या विळ्याची मूठ म्हणजेच मघा नक्षत्राची चांदणी आहे. या नक्षत्रास…
दिप्ती चौधरी मुंबईच्या रस्त्यांवरचे भटके मांजर म्हणून सुरू झालेला आमचा प्रवास आता बंगलोर आणि ह्यूस्टन मार्गे ऑस्टिनला येऊन स्थिरावला आहे. आम्हाला आमचे जुने जीवन आठवते, तेव्हा भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप खूप फरक जाणवतो. अमेरिकेत प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खुल्या दिलाने स्वीकारले आहे. आम्ही खिडकीत बसलो असताना बाहेरून जाणारे बहुतेक जण आम्हाला टाटा करूनच पुढे जातात. आमच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने बघतात, अशी नजर आम्हाला आमच्या गत आयुष्यात फार अभावानेच बघायला मिळाली होती. इथे बहुतेक जणांनी प्राणी पाळले आहेत आणि ते सगळे कुटुंबाचाच प्रिय भाग असतात. भावनिक आधार देणारे पाळीव प्राणी किंवा सर्व्हिस डॉग म्हणून सुद्धा प्राणी वापरले…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 09 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 30 जून 2025, वार : सोमवार, तिथि : पंचमी 09:23, नक्षत्र : मघा 07:20 योग : सिद्धी 17:19, करण : कौलव 21:45 सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 कुमार षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामात चांगले परिणाम मिळतील. कामाचा आणि वर्तनाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 243
- अवांतर 172
- आरोग्य 91
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 183
- मैत्रीण 16
- ललित 505
- वास्तू आणि वेध 357
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
