Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! एक सीरियल करत होते… ‘नामकरण’. माझ्या रीमा दिदीची ती सीरियल होती. त्यात जेव्हा माझा ट्रॅक सुरू झाला, तेव्हा दिदी या जगात नव्हती. त्यावेळी दिवाळीची धामधूम सुरू होती. साफसफाई, फराळ, खरेदी आणि शूटिंग सुद्धा…! त्यात मला ताप भरला. टेम्परेचर अगदी 3-3 असायचं. पण शूट तर करावच लागणार होतं. अर्थात, ते करतच होते मी. एकेदिवशी शूट संपवून मी घरी आले. आमच्या गल्लीत खूप गर्दी झाली होती. काय झालं असावं, ते कळेच ना! मला वाटलं की, दिवाळी आधीचे काही इव्हेंट्स सुरू असावेत… मी रिक्षातून खाली उतरले आणि एक मुलगा समोर दिसला. “काय रे, दिवाळी…
वेद बर्वे भारतीय पोस्टाची 50 वर्षं जुनी रजिस्टर्ड पोस्टसेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार, अशी बातमी फ्लॅश झाली आणि साहाजिकच त्या लाल-काळ्या पत्रपेटीसोबत असलेल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आताचे सगळे ‘मिस्ट्री बॉक्स’ किंवा ‘मॅजिक बॉक्स’ ज्याच्यासमोर फिके पडतील, अशा त्या ‘पोस्ट बॉक्स’मधून, केवळ शब्दांचाच नाही तर, भावनांचाही प्रवास घडताना अनुभवायला मिळणं, हे खरोखरच आमच्या पिढीचे भाग्य म्हणावे लागेल. Early 90’s मध्ये, मी माझ्या आजोबांना (आईच्या वडिलांना) नियमितपणे पत्रव्यवहार करताना पाहिलं आहे. कालांतराने घरी लॅण्डलाइन फोन आला, मात्र आजोबांची पत्र लिहिण्याची आवड आणि हौस काही कमी झाली नाही. टेलिफोनिक संभाषणापेक्षा लिखाणातून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, असं ते म्हणत. बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या…
ॲड. कृष्णा पाटील भाग – 2 व्यवसायात तोटा झाल्यानं हरी नाना, आशिष यांच्यासह सर्व कुटुंब पुण्याहून गावाकडं परतलं. थोडी जमीन विकत घेऊन शेती करायला सुरुवात करूया, असा विचार त्यांचा होता. त्यासाठी ते पुण्यात मोक्याच्या ठिकाणी असलेला आपला प्लॉट विकणार होते. त्याला साधारणपणे एक कोटी रुपये किंमत येईल, असा त्यांचा अंदाज होता. दत्ता भाऊ काळके आणि बबन मामा साळवी या दोघांच्या मध्यस्थीने भटाच्या मळ्यातली देसाईंची जमिनीचा सौदा करण्याचा विचार हरी नाना आणि आशिषचा सुरू होता. या चार एकर जमिनीचा साधारण 85 ते 90 लाखांपर्यंत सौदा होणार होता. पुण्याचा प्लॉट विकायला दोन-तीन महिने अवधी असला तरी, देसाई सौदा पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥17॥ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् ।।18।। तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपती देख | महाबाहु ||151|| तेथ अर्जुनाचा सुतु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 16 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 14:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 14:00 योग : विष्कंभ 06:41, प्रीति 29:38; करण : गरज 26:24 सूर्य : कर्क; चंद्र : धनु 20:10; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अपेक्षित लाभ मिळवून देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार जातकांना एखादी चांगली…
अजित गोगटे पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांनी अनुकूल बातमी द्यावी, यासाठी त्यांना रोख रक्कम भरलेल्या कागदी लिफाफ्याच्या स्वरूपात राजरोस लाच देणे हे मुंबईच्या पत्रकारक्षेत्रात एकेकाळी कसे निंद्य मानले जात नसे, त्याविषयीचा अनुभव मी आज सांगणार आहे. ही घटना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे. त्यावेळी मी `दै. लोकसत्ता`मध्ये नोकरीला होतो. त्या काळात कल्याणजवळील मोहने येथे (रेल्वे स्टेशन आंबिवली) ‘नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ (NRC) कंपनीचा मोठा कारखाना होता. दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांची तेथे कामगार संघटना होती. कामगारांच्या मागण्यांवरून कारखान्यात दीर्घकाळ धुसफूस सुरू होती. कंपनीने टाळेबंदी केली. अशा परिस्थितीत त्यावर्षीच्या स्वतातंत्र्यदिनी कामगारांनी, पोलिसांनी परवानगी नाकारूनही, बंद कारखान्याच्या गेटवर सभा घेतली. प्रक्षोभक भाषणांनी वातावरण तापले. दंगल…
सतीश बर्वे प्रिय आईस, तू आज जिथे असशील तिथे देवबाप्पा नक्की पोहोचवेल माझं पत्र, याची खात्री आहे मला. विरेंदरबरोबर सुरू केलेल्या संसाराला 40 वर्ष पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासून मी गृहिणी म्हणूनच वावरले माझ्या सासरी. आज तुझी दोन्ही नातवंडे कॉलेजला आहेत. त्या दोघांचं आणि विरेंदरचे रोजचं टाइमटेबल पूर्ण करताना नाकीनऊ येतात माझ्या. तुझी सतत आठवण येते मला आजकाल आणि जीवाची घालमेल होते. कळत नकळत किती वेळा तुझ्या अवतीभोवती असण्याचा फायदा आम्ही करून घेतला, याचा विचार केला की, डोळे भरून येतात माझे. आई, तू देखील आमच्या लहानपणी घराची आवश्यकता म्हणून नोकरी करायचीस. पहाटे उठून स्वयंपाक करून ऑफिस गाठायचीस. मी आणि कौस्तुभ दादा…
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण पाठीवर आणि पोटावर करण्याची आसने पाहिली. आसन हे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते, तशीच योग विद्या सुद्धा अत्यंत आवश्यक असते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे पाहूयात. मकरासन मकरासन करताना पोटावर झोपून दोन्ही हात हनुवटीवर लावायचे आणि पायात थोडेसे अंतर ठेवायचे. नंतर ते गुडघ्यामध्ये दुमडायचे आणि दीर्घ श्वास घेऊन पाय कमरेच्या खालच्या भागावर लावायचे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. मेरूदंड मजबूत होतो, पाठदुखी दूर होते. शिवाय, सायटिकासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक आहे. शलभासन हे आसन करण्यासाठी पोटावर झोपायचे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ||14|| की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥139॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण |…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 15 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 14:08; नक्षत्र : मूळ 12:59 योग : वैधृती 07:16; करण : कौलव 26:22 सूर्य : कर्क; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव आणला जाईल. मात्र त्याचवेळी नवीन कामाची जबाबदारीही तुमच्याकडे सोपवण्यात येईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात…
