Author: Team Avaantar

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! एकेरात्री मी आणि राजेश म्हणजे माझा नवरा, पृथ्वी थिएटरला एक नाटक बघायला गेलो होतो. तिथे पोहोचायला जरा उशीरच झालेला, पण सुदैवानं नाटक सुरू झालं नव्हतं. तिथे गेल्यावर पाहिलं तर पार्किंग फुल्ल! मग काय गाडी जरा लांबच पार्क केली अन् नाटकाला जाऊन बसलो. खूप छान नाटक होतं. कॉमेडी नाटक आणि सर्व कलाकार उत्तम काम करणारे. मस्त एन्जॉय केलं. नाटक संपल्यावर बाहेर आलो. जरा लांबपर्यंत चालावं लागलं… बाकीचे लोक निघून गेले होते.  गाडीपर्यंत आलो आणि घात झाला… गाडीचा टायर पंक्चर झाला होता. खूप रात्र झाली होती, त्यामुळं आजूबाजूला कोणीही नव्हतं. बरं, गाडी नवीन…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जुलै 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 03 श्रावण शके 1947; तिथि : प्रतिपदा 23:22; नक्षत्र : पुष्य 16:00 योग : वज्र 07:27, सिद्धी 29:30; करण : किंस्तुघ्न 11:57 सूर्य : कर्क; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 जरा जिवंतिका पूजन महालक्ष्मी स्थापना आणि पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सामान्य असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु प्रत्येक अडचणीसह आयुष्यात काहीतरी…

Read More

चित्रा आचार्य भारतात पाऊल ठेवण्याआधी जवळपास दोन महिने डेबी ईमेलवर चॅटिंग करत होती. गप्पा कसल्या खरंतर शंका आणि विशेषकरून भारताविषयी कुशंकाच जास्त होत्या त्यात. मी जमेल तितकी तिच्या शंकांना उत्तरं देत होते. कुठला पोषाख करू… काय खाऊ, काय नको… एक ना अनेक! तशी आमची तीन दिवसांची सोबत राहणार होती. मजल दरमजल करत डेबी शेवटी एकदाची पोहोचली भारतात. महाकाय अमेरिकेच्या एका टोकापासून इथवर यायला तीस तास लागलेच तिला… भारतात फिरायला आलेल्या पर्यटकांना जेट लॅगचे कौतुक करत बसणे शक्य होत नाही, तितका वेळही नसतो. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही दक्षिण मुंबईतील विविध इमारती त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा आस्वाद घेत पालथ्या घातल्या… आमची सहल मस्त सुरू होती,…

Read More

ॲड. कृष्णा पाटील वायरच्या पिशवीतून भीमराव पाटलांनी कोर्टातून आलेली नोटीस काढली आणि शानबाग वकिलांच्या टेबलवर ठेवली. रिकामी पिशवी बाजूला ठेवून ते समोरच्या खुर्चीवर रेलून रुबाबात बसले. शानबाग वकिलांनी भीमराव पाटलांकडे निरखून पाहिले.‌ केसांना कलप केल्यामुळे डोक्यावरचे काळेभोर केस चकाकत होते. हातातल्या चारी बोटात सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. पान खाल्ल्यामुळे तोंड लालभडक झालेलं होतं. त्यांचा चेहरा मात्र मग्रूर दिसत होता. जणू समोरचा माणूस आपल्यापुढे झुकण्यासाठी जन्माला आला आहे, असा आविर्भाव वाटत होता. शानबाग वकिलांनी नोटिशीवर नजर टाकली – “शुभांगी भयंकर तापट स्वभावाची आहे. माझं तेच खरं आणि सर्वांनी त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, ही तिची धारणा आहे. थोडं जरी मनाविरुद्ध काही घडलं तर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जुलै 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 2 श्रावण शके 1947; तिथि : अमावास्या 24:40; नक्षत्र : पुनर्वसु 16:43 योग : हर्षण 09:50; करण : चतुष्पाद 13:31 सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन 10:58; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दर्श अमावास्या दीप पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. संपत्तीमध्ये वाढ होईल. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल.…

Read More

अजित गोगटे व्यावसायिक पदाचा व्यक्तिगत लाभासाठी उपयोग (दुरुपयोग) न करणे, हेही पत्रकारितेच्या नीतिमूल्यांपैकी एक मूल्य आहे. इतर मूल्यांप्रमाणे या मूल्याचे पालन न करणारेही बरेच असतात. मात्र,, काही ‘वजनदार’ पत्रकारांनी या मूल्याचे अगदी कमालीचे अवमूल्यन करून स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केल्याचीही उदाहरणे आहेत. पत्रकारितेतील कौशल्याऐवजी सरकार दरबारी असलेल्या ‘वजना’मुळे असे पत्रकार नावलौकिक मिळवितात. असे पत्रकार आपल्या पदाचा वापर सरकार दरबारी अडकलेली कामे करून देणारे ‘दलाल`‘ म्हणून करतात. अनेक वर्षांच्या अनुभवाने त्यांची पत्रकार ही ओळख ‘दलाल’ या ओळखीत  मिसळून गेलेली असते. यापैकी काही बहाद्दर ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि ज्याचे काम करायचे अशा दोघांकडून ‘दलाली’ घेतात. काही गडबड झाली तर अडचणीत…

Read More

केतकी दातार “’आई’ अशी हाक जेव्हा तान्हुल्याच्या तोंडून एखादी स्त्री ऐकते तेव्हा तिला अगदी जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. जेव्हा स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो, असं म्हणतात. या बाळामुळेच ती आई बनते. तिचं जीवन परिपूर्ण बनतं. अशा या आईची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे,” असं म्हणून मीनाताईंनी आपलं भाषण संपवलं. पार्ल्यातील टिळक मंदिराचे सभागृह माणसांनी खचाखच भरलं होतं. ‘आई’ हा विषयच इतका संवेदनाशील, हळवा… आणि त्यात मीनाताईंची रसाळ वाणी! यामुळे श्रोतृवर्ग खूपच मंत्रमुग्ध झाला होता. आभार प्रदर्शनाच्या औपचारीक कार्यक्रमानंतर बरीचशी लोक निघून गेली. मीनाताई स्टेजवरून उतरल्यावर अनेकांनी त्यांना गराडा घातला. काहीजण त्यांची स्वाक्षरी घेत होते, तर काहीजण अभिनंदन…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील भागात मी योगबद्दल माहिती दिली होती. म्हणजे योग केल्याने आपल्या जीवनावर काय काय परिणाम होतो. योग केवळ व्यायाम नाही तर, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे… योग म्हणजे शरीर, मन आणि श्वास यांचं एकत्रित आणि संतुलित कार्य… योग केल्याने मानसिक शांती मिळते, शरीर निरोगी आणि लवचिक बनते तसेच श्वासनक्रिया नियंत्रित राहते, एकाग्रता वाढते, झोप चांगली लागते. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र जोडणारा मार्ग आहे. योगमध्ये अनेक प्रकार आहेत. पण त्यातही प्राणायाम हे प्रमुख म्हणता येईल. प्राणायाम म्हणजे श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पद्धत.. हे केल्याने आपला श्वास मोकळा होतो आणि मन शांत राहतं…. प्राणायाम रिकाम्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जुलै 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 1 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 26:28; नक्षत्र : आर्द्रा 17:54 योग : व्याघात 12:33; करण : विष्टी 15:32 सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17 पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. आपल्या वेळेची किंमत समजून घ्या.…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 25 वर्षांपूर्वीची घटना आहे…. मी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होतो. आम्हाला समाजशास्त्र विषयाला शिकवणारे एक प्राध्यापक होते. आम्हाला त्यांचा आदर होता आणि त्यांच्याशी खूप जवळीकही होती. सरांमुळेच आम्हाला ट्रेकिंगची गोडी लागली. सुरुवातीला छोटे-छोटे एक-दोन ट्रेक केल्यानंतर सरांनी आम्हाला हरिश्चंद्रगडला दोन रात्र, तीन दिवसांचा ट्रेक करण्याबद्दल सुचवलं. आम्ही लगेच तयार झालो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा एक वर्ष मागे असलेले दहा ते पंधरा मुलं-मुली असा एक गट येणार होता. आम्ही तीन मित्र – मी, रमेश, सोहन – आणि सरांच्या परिचयातील एक 30 ते 32 वयाची स्त्री, असे आम्ही चार जण जरा मोठे होतो. त्याकाळी धरण बांधलेले नव्हतं. त्यामुळे खुबी फाटा…

Read More