Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥30॥ आतां अठरा पर्वी भारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥31॥ म्हणोनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मी वायां । गर्व कां करूं ॥32॥ अहो गूळासाखरे मालेयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥ एक जाणोनियां बोलती । एक ठायेंठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥34॥ हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्य नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें ।…
दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ टीम अवांतर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1920 रोजी पुणे येथे झाला. 1923 साली वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला; परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यामुळे पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव त्यांनी लावले. मराठी सातवी झाल्यावर 1929मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीला एका खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्या पुण्यातील हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन 1937मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. त्यानंतर…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे. माझ्या लेकीने एकदा मला विचारलं, “आई, उषा कशी आहे गं?” मी ओरडलेच तिला… “अगं त्या काय तुझ्या वयाच्या आहेत का? किती मोठ्या आहेत, वयाने, मानाने! अरे तुरे करतेस त्यांना? मी पण त्यांना ‘अहो, उषा ताई’ म्हणते.” यावर लाडकी लेक म्हणते कशी, “आई, उषा तुझ्या आईपेक्षा एक दोन वर्षांनी लहान असेल म्हणून काय मी तिला आजी म्हणायचं का? बरं, तुझी मैत्रीण म्हणून मी तिला मावशी पण नाही म्हणणार. कारण ती आजी मटेरियल किंवा मावशी मटेरियल नाहीये. She is so cooool… आणि मी तिला उषा म्हणते,…
पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली, पण तेव्हाचं पुणं आणि काल परवा पाहिलेलं पुणं यात काहीच साम्य नाही आढळलं. दुपारी जेवायला बाहेर पडल्यावर ऊन, रखरखाट आणि शुष्कपणा यांनी जीव अगदी नकोसा केला आणि हेच का ते आल्हाददायक पुणं हा प्रश्न पडून गेला. रात्री स्टेशनजवळच्या एका हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. हॉटेलचं नाव सांगणं अप्रस्तुत… पण छान, सुंदर आणि सुबक हॉटेल. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये अस्तित्व असलेल्या एका साखळीचा भाग! आठव्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. खिडकीतून खाली दिव्यांची आरास फार छान दिसत होती. रस्ता अगदी वाहता होता. आंघोळ करून, आवरून, साधारण नऊ वाजता आम्ही…
सतीश बर्वे मी खरं म्हणजे त्याला विसरूनच गेलो होतो. पण तसं होणं देवाच्या मनात नव्हतं बहुतेक… आज सकाळी ध्यानीमनी नसताना त्याचा ईमेल आला मला, ज्यात त्याने माझे आभार तर मानले होतेच. शिवाय Happy Journey. Take Care. या माझ्या शुभेच्छांचा त्याने खास उल्लेख करत, त्या त्याला घरी पोहोचेपर्यंत कशा आधार देत गेल्या याची मजेशीर गोष्ट त्याने लिहिली होती, त्या मेलमध्ये! गेल्या आठवड्यातील गोष्ट. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कॉफी शॉपमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक मुलगा एकटाच बसला होता, विमनस्क अवस्थेत… त्यादिवशी बऱ्याच फ्लाइट काही कारणाने उशिराने सुटणार होत्या, म्हणून बहुतेक कॉफी शॉपमध्ये गर्दी होती. मी नाईलाजाने त्या मुलाच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. त्याने…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥16॥ मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघवियाचि क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥17॥ ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥18॥ तैसी ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोविये गावों । ऐसें केलें ॥19॥ जे बोलणियाचां रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥20॥ होती देहबुद्धि एकसरी । आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥21॥ तैसें एकैक…
दर्शन कुलकर्णी सोमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर टीम अवांतर प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर यांचा जन्म 16 मार्च 1936 रोजी पुण्यात झाला. पंडित रवीशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णादेवी आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. त्यांचे भारतातील प्रांतोप्रांतीच्या लोकसंगीतांवर आधारित अनेक वाद्य अल्बम्स प्रकाशित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांनाही संगीतही दिले. हे सर्व कलात्मक चित्रपट होते, ज्यांना भावपूर्ण आणि आशयानुरूप संगीत देऊन भास्कर चंदावरकर यांनी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून ठसा उमटवला. घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा,, ये रे ये रे पावसा, जेतेगिरी ही नाटकं त्यांनी संगीतबद्ध केली.…
शोभा भडके भाग – 18 “ए बाय… पोरी, झालं माझं जेवण… लई मदत केलीस बघ तू!” साठच्या आसपास वय असलेली आजी आरुच्या जवळ येत म्हणाली. “आजी तुमचं जेवण पोटभर झालं ना? मग झालं तर… आणि हे बघा जवळ जवळ सगळी भाजी विकली. आता ही थोडीशी राहिली, ती मी घेते. आता तुम्ही घरी जा आणि आराम करा,” आरु त्या टोपलीतली भाजी एका पिशवीत भरत म्हणाली. “खरंच गं पोरी, लई गुणाची हायास बगं. सुखी रहा… तुला लई चांगला नवरा मिळू दी…” ती आजी आरूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. “आजी नवरा तर मिळालाय, पण… चांगला आहे की नाही, ते नाही माहीत…” ती समोरून…
सुधीर करंदीकर शाळा, कॉलेज सोडून बरीच वर्षं सरतात… तेव्हाच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाइल नंबर नसतात. त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेटही नसते. त्यातल्या कुणाची अचानक 50 वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच, त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण, चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, अनेकांना ‘मुलांना’ टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा हा माझा अनुभव… नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरूडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे…
माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि बनवण्याची पद्धत पाहिली तर, आपल्याला आपल्या घरच्या पदार्थांची आठवण येईल. फलाफल आणि दक्षिण भारतात लोकप्रिय असलेल्या ‘मसाला वडा’मध्ये (Chana Dal Vada) कमालीचे साम्य आहे. फलाफलमध्ये ‘छोले’ वापरतात, तर मसाला वड्यामध्ये ‘चणा डाळ’ वापरली जाते. दोन्ही कडधान्येच आहेत. वड्यांमध्ये डाळ न शिजवता फक्त भिजवून, जाडसर वाटून त्याचे गोळे तळले जातात. फलाफलमध्ये काबुली चणे भिजवून आणि थोड शिजवून मग ते वापरतात. फलाफलमध्ये कोथिंबीर आणि लसूण असते, तर आपल्या वड्यांमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, आले आणि हिरवी मिरची असते. उत्तर भारतात बनवले जाणारे राम लाडू (मूग डाळीचे वडे) किंवा साध्या…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
