Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 9, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, गणित विषय, गणिताचा अभ्यास, खेळगटातील शिक्षण, खेळगटातील गणित शिक्षण, खेळगट गणित विषय, प्ले ग्रुप गणित,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रश्मी परांजपे

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील गणित या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.

    वास्तविक, गणित हा अवघड विषय म्हणूनच प्रसिद्ध आहे. काही अंशी ते खरंही आहे. विशेषतः, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील गणित विषय अवघड वाटू शकतो. पण खरं पाहिलं तर गणित हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. गणित विषयातील संकल्पना सुरुवातीपासूनच स्पष्टरीत्या समजावून सांगितल्या आणि विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या तर, गणित विषयासारखा सोपा विषय नाही. यावरूनच गणित विषयाचे प्रगतीपुस्तकातील सर्वाधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून महत्त्व अधोरेखित होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी बालपणापासूनच लागायला हवी… आणि बालशाळेतील शिक्षिकांनी या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे आवश्यक बनते.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण

    आता या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील गणित शिक्षण या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित माहिती घेणार आहोत. खेळगटात गणित हा विषय गणित म्हणून न शिकवता निरनिराळ्या गाण्यांतून आणि खेळांतून शिकवला जातो.

    गाण्यातून गणित शिक्षण

    सुरुवातीला 1 ते 10 अंकांवरच भर देण्यात येतो. म्हणजे 1 ते 10 अंक ओळीने म्हणण्यास शिकवले जाते आणि मुलांकडून सरावही करून घेतला जातो. गाण्यातून हे अंक शिकवल्यास मुलांना गंमत वाटते. वानगीदाखल खालील उदाहरण देता येईल :

    एक डोके बाळाला

    दोन पाय माणसाला

    तीन पाय तिवईला

    चार पाय गायीला

    पाच बोटे हाताला

    सहा पाय मुंगीला

    सात वाती समईला

    आठ काड्या छत्रीला

    नऊ बुक्के नव्याला

    दहा गोळ्या दशकाला

    या गाण्यातून अंकांबरोबरच वेगवेगळे शब्द मुलांच्या शब्दसंग्रहात भर टाकतात.

    खेळातून गणित शिक्षण

    खेळातून अंक शिकवताना मुलांचे दोन गट तयार करून पहिल्या गटास एक मग दुसर्‍या गटास दोन नंतर पहिल्या गटास तीन… अशा पद्धतीने दहापर्यंत अंक म्हणण्यास सांगतात. हा खेळ सोपा दिसला तरी, मुलांना सुरुवातीला जरा अवघडच जातो, पण सरावाने जमू लागतो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील भाषा शिक्षण

    गणित शिक्षणपद्धतीचे फायदे

    गाण्यातून, विशेषकरून खेळातून अंक शिक्षणाबरोबर मुलांना पुढील फायदे देखील आपसूकच मिळतात :

    • पाठांतर
    • लक्षपूर्वक ऐकण्याची सवय
    • एकाग्रता साधणे

    अशा शिक्षण पद्धतीतूनच मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यास साहाय्य लाभते.

    पुढील लेखात आपण शिशुगटातील गणित शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.


    (लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान दिले. तसेच, लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाईल – 9881943593

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 500
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn