Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील भाषा शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील भाषा शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेDecember 29, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, शाळाप्रवेश, भाषा अभ्यास, संवादाची भाषा, बालगट, भाषा शिक्षण, मौखिक भाषा, लिखित भाषा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची शिशुगटासंबंधित सविस्तर माहिती घेतली. आता या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची बालगट या वर्गासंबंधित माहिती घेणार आहोत.

    खेळगटात आणि शिशुगटात सुरु झालेले शिक्षण बालगटात अधिकाधिक विकसित होत जाते. बालगटातील भाषा शिक्षणासाठी खालील दोन पद्धती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

    • मौखिक भाषा
    • लिखित भाषा

    1.  मुलांना विविध चित्रे दाखवून त्यांचे वाचन करण्यास शिकवतात. चित्रवाचन म्हणजे चित्रात काय काय दिसते याचे वर्णन करणे. यासाठी घर, शाळा, बाग, जंगल आणि तत्सम चित्रे यांचा उपयोग करण्यात येतो.

    2.  मुलं आईवडील तसेच इतर कुटुंबीय यांच्याबरोबर बाहेर जातात. उदाहरणार्थ दुकान, भाजी मंडई, सर्कस, सहल, देऊळ इत्यादी. तिथं काय काय पाहिलं, हे मुलांना विचारून सांगायला शिकवले जाते. हे सर्व सांगताना मुलांना पूर्ण वाक्यात बोलण्याची सवय लावावी.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील भाषा शिक्षण

    3.  शिशुगटातील मुले मुळाक्षरे काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उभ्या, आडव्या, तिरक्या रेषा तसेच अर्ध गोल, पूर्ण गोल इत्यादी शिकून गटवार मुळाक्षरे काढण्यास शिकलेली असतात. आता बालगटात मुलांना मुळाक्षरे ओळीने काढायला शिकवले जाते, जसे की,

    क, ख, ग, घ…

    च, छ, ज, झ…

    4.  सर्व मुळाक्षरे शिकल्यावर मुलांना अ, आ ते अ: शिकवतात.

    5.  मराठीतील सर्व अक्षरे शिकवल्यानंतर मुलांना शब्द शिकवले जातात. सुरुवातीस दोन अक्षरी.. नंतर तीन आणि तद्नंतर चार अक्षरी एकेरी शब्द शिकवले जातात, जसे की,

    पळ, बघ, नळ

    कमळ, दगड, बबन

    चटकन, पटकन, लवकर

    6. मुलं मुळाक्षरे काढण्यास आणि शब्द लेखन करण्यास शिकल्यावर त्यांच्याकडून लेखनाचा सराव करून घेतला जातो.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण

    7.   मुलांना लेखनाची सवय लागल्यावर वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून लेखन शिक्षण त्यांच्या मनावर पक्के ठसवले जाते. यासाठी शब्द आणि चित्र यांच्या जोड्या लावायला शिकवले जाते, जसे की शब्द कमळ आणि त्याचे चित्र, बदक आणि त्याचे चित्र.

    8.  एखादे अक्षर देऊन मुलांना शब्द सांगायला शिकवले जाते.

    9.  मुलांना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढील शब्द तयार करायला शिकवतात, जसे की, बदक… कप… पळ.

    शब्दांची कार्डे बनवून हा खेळ मुलांकडून खेळून घेतला जातो. शिक्षिका आपल्या कल्पनेतून विविध खेळ मुलांना शिकवू शकतात… तसेच या आणि अशा सर्व खेळांमधून मुलांच्या शब्दसंग्रहात वाढ होत जाते.

    बालगटातील मौखिक भाषा व लिखित भाषा यांतून मुलांचे भाषा शिक्षण विकसित होण्यास सुरुवात होते.

    क्रमश:

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    आनंददायी शिक्षण

    September 3, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026 शैक्षणिक

    संगणकाच्या साथीने सर्वोत्तम अध्यापन

    August 17, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    आनंददायी शिक्षण

    By Team AvaantarSeptember 3, 2026

    डॉ. किशोर महाबळ अगदी लहान वयापासून प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने आजूबाजूच्या आई-वडील, ताई-दादा आणि अन्य…

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    संगणकाच्या साथीने सर्वोत्तम अध्यापन

    August 17, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    गणपती बाप्पाच्या मनातलं…

    September 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका

    September 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 433
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 581
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.