Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेFebruary 16, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, शालेय शिक्षण, गणित विषय, गणिताचा अभ्यास, शिशुगटातील शिक्षण, शिशुगटातील गणित शिक्षण, शिशुगट गणित विषय, ज्युनिअर केजी गणित,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण खेळगटातील गणित शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण या लेखात शिशुगटातील गणित शिक्षणाबाबत जाणून घेणार आहोत. खेळगटात मुले गाण्यातून तसेच खेळातून 1 ते 10 अंक जाणून घेऊन तोंडी म्हणायला शिकतात. शिशुगटात पहिल्या महिन्यात या अभ्यासाची उजळणी केली जाते. नंतर या अभ्यासाचे दृढीकरण करण्यात येते आणि हाच शिशुगटात गणित शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.

    अंक अभ्यास दृढीकरण

    शिशुगटात गणित अभ्यासाच्या दृढीकरणासाठी खालील पद्धतींचा अवलंब केला जातो.

    1. मुलांना 1 ते 10 यातील एकामागोमाग एक अंकावर बोट ठेवून अगोदर सामूहिक आणि नंतर वैयक्तिक पद्धतीने अंक ओळखण्याचा तसेच म्हणण्याचा सराव करून घेण्यात येतो.
    2. मुलांना 1 ते 10 अंक ओळीने म्हणण्याचा सराव झाल्यानंतर अधला मधला अंक फळ्यावर लिहून वाचायला शिकवले जाते. मुलांकडून असे अंक वाचन सामूहिक आणि नंतर वैयक्तिक पद्धतीने करून घेण्यात येते.
    3. मुलांना विविध वस्तू मोजण्यास शिकवतात. असे करताना 1 ते 10 म्हणण्याचा आपसूकच सराव होतो. वस्तू मोजताना सुरुवातीला 1 ते 5 आणि नंतर 6 ते 10 अंक अशी पद्धत अवलंबिली जाते.
    4. मुलांना नंतर जितक्या वस्तू मोजल्यात तो अंक ओळखण्यास शिकवतात. समजा तीन वस्तू असतील तर तीन अंक कोणता याचा विचार मुलांच्या मनात सुरू होतो आणि तीन अंक ओळखल्यावर मुलांच्या मेंदूत त्याचे दृढीकरण होते. या प्रक्रियेस “चित्र – अंक चिन्ह समन्वय” असे म्हणतात.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण

    लेखी गणित शिक्षण

    वरील अंक दृढीकरण तोंडी पद्धतीनुसार करताना अंक लिखाणही शिकवले जाते.

    अंक लिखाण

    1. मुलांना एकदम अंक लिहिण्यास कधीच सांगू नये. तर, यासाठी मुलांना उभी रेष, आडवी रेष, गोल, अर्ध गोल काढण्यास शिकवले जाते आणि त्यासाठी सराव करून घेण्यात येतो.
    2. सराव पक्का झाल्यावर मुलांना 1 ते 10 अंक लिहिण्यास जमू लागते. अंक लिखाणात देखील सुरुवातीला 1 ते 5 आणि नंतर 6 ते 10 अंक अशा पद्धतीने लिहिण्यास शिकवले जाते.

    साधारणपणे शिशुगटात मुलांकडून वस्तू मोजून अंक लिहिणे अपेक्षित आहे. वस्तू मोजणे आणि संख्या अंकात लिहिणे या दोनही क्रिया वरकरणी सोप्या वाटत असल्या तरी शिशुगटातील मुलांचे वय लक्षात घेता, त्या अवघडच असतात. परंतु सततच्या सरावाने हे साध्य होते.

    अभ्यासक्रमातील गणिताचा हा भाग लहानसा वाटत असला तरी शिशुगटातील मुलांसाठी तो वर्षभर पुरा पडतो. शिशुगटातील तोंडी आणि लेखी अंक शिक्षण आणि अभ्यास दृढीकरण मुलांच्या गणित शिक्षणाचा पाया मजबूत करते. थोडक्यात सांगयचे झाल्यास, 1 ते 10 अंक मुलांच्या मनात ठसवल्यास मुलांना ते पक्के समजतात आणि यामुळेच पुढील अंक शिक्षण सुकर होते.

    पुढील लेखात आपण बालगटातील गणित शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील भाषा शिक्षण


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हाट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रश्मी परांजपे

    रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

    Related Posts

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    By Team AvaantarMay 20, 2026

    डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील…

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 312
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 435
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 662
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026
    Most Popular

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.